संख्याशास्त्राच्या विद्यार्थ्यांना डेटा सायन्स मध्ये प्रचंड संधी : डॉ. सर्जेराव पोवार !

संख्याशास्त्राच्या  विद्यार्थ्यांना डेटा सायन्स मध्ये प्रचंड संधी : डॉ. सर्जेराव पोवार !

पी.व्ही.पी. महाविद्यालयात संख्याशास्त्राचे अतिथी व्याख्यान 

कवठेमहांकाळ ( प्रतिनिधी)::-येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयातील बी.एस्सी. शाखेकडील अंतिम वर्षाच्या संख्याशास्त्र  विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी नुकतेच महाविद्यालयामध्ये अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिथी व्याख्याते म्हणून श्रीमती कस्तुरबा महाविद्यालय सांगली येथील संख्याशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. सर्जेराव पोवार उपस्थित होते.


याप्रसंगी बोलताना  डॉ. पोवार यांनी आय. टी. क्षेत्रातील डेटा सायन्स चे वाढते महत्व स्पष्ट करुन सोफ्टवेअर इंडस्ट्री मधील संख्याशास्त्राच्या उपयुक्ततेविषयी आणि नोकरीच्या संधींविषयी विस्तृत माहिती दिली. त्यांनी संख्याशास्त्रामधील विविध क्षेत्रातील रोजगारांच्या  संधी सांगताना सरकारी तसेच खासगी क्षेत्रांमध्ये संख्याशास्त्रामधील पदवी तसेच पदव्युत्तर पदवी धारकांना प्रचंड मागणी असल्याचे स्पष्ट केले.

व्याख्यानानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या विविध शंका प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून निरसन करून घेतल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य 
डॉ. एम. के. पाटील यांनी व्याख्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बी.एस्सी. पदवी नंतर च्या  शिक्षणासाठी चे विविध पर्याय आणि संधी विद्यार्थ्यांना माहिती व्हाव्यात तसेच भविष्यातील संख्याशास्त्रज्ञांची वाढती मागणी आणि गरज लक्षात घेता विविध क्षेत्रातील संख्याशास्त्रावर आधारित अभ्यासक्रमांची माहिती व्हावी यासाठी हे व्याख्यान आयोजित केले असल्याचे सांगितले. याप्रसंगी उपस्थित असलेल्या पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ आणि महाविद्यालयाचे वार्षिक 'वसंत'  देऊन करण्यात आले. आभारप्रदर्शन प्रा. अभिलाष पाटील यांनी केले. सदर व्याख्यानासाठी  संख्याशास्त्र विषयाचे विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यान कार्यक्रमाचे नियोजन शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदेसचिव सुदर्शन शिंदे, प्र. प्राचार्य डॉ. एम. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. विजय कोष्टी, प्रा, अभिलाष पाटील आणि  प्रा. गणेश सातपुते यांनी केले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !