जिल्हास्तरीय भव्य भित्तीचित्रे स्पर्धेचे आयोजन !

    जिल्हास्तरीय भव्य भित्तीचित्रे स्पर्धेचे आयोजन ! 

         नासिक::-पर्यावरण जनजागृती व संवर्धन करण्यासाठी प्रबोधन व्हावे यादृष्टीने विद्या सहयोग सोशल वेल्फेअर अँड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने जिल्हास्तरीय भव्य भित्तीचित्र स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेच्या घोषणापत्राचे अनावरण शिवराज्याभिषेक सोहळा व जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने आज दि.०६ जून रोजी शिवारांयांचे पूजन करून शिवस्मारक आडगाव या ठिकाणी अनावरण करण्यात आले.

पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीबाबत लहानांपासून मोठ्यांपर्यंत जनजागृती करणे व होणाऱ्या दुष्परिणामांना वाचा फोडण्यासाठी भित्तिचित्र स्पर्धेच्या माध्यमातून हा एक आगळा वेगळा उपक्रम नाशिक जिल्हा स्तरावर राबवण्यात येत आहे. १५ जून २०२२ पर्यंत सर्व स्पर्धकांनी आप आपले चित्र तयार करून "श्रीसाई कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट", आडगाव. ४२२००३ या ठिकाणी पोस्टाद्वारे किंवा स्वतः आणून द्यावयाचे आहे.

या स्पर्धेसाठी दोन गट तयार करण्यात आलेले आहेत. दोन्ही गटाला सारखेच बक्षीस देण्यात येणार आहे.
पहिला गट - शालेय गट (पाचवी ते दहावी ) 
दुसरा गट- खुला गट  ( दहावी पासून पुढे )
दोन्ही गटांना प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ असे बक्षिसांचं वाटप होणार आहे, प्रथम बक्षीस २५००/- रुपये, द्वितीय बक्षीस २०००/- तृतीय १०००/- व उत्तेजनार्थ ५०० /-  सन्मान चिन्ह देऊन सत्कार समारंभ आयोजित करून बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील स्पर्धकांना आवाहन करण्यात आले आहे की पर्यावरणाच्या बाबतीत सजग होऊन मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

स्पर्धा आयोजनात मोलाचे सहकार्य राजेश शिंदे, संतोष माळोदे, पूजा शिंदे यांचे लाभले. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमेश शिंदे सर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे, तसेच अधिक माहितीसाठी ९८३२१३८२०८ या क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती आयोजकांनी दिली. यावेळी संजय शिंदे, पोपट शिंदे, संदीप लभडे, भास्कर मालसाने, रंगनाथ मुळुख, संजय देशमुख, संतोष हळदे, सुनील मते, ऍड दीपक मते, गणेश माळोदे, युवराज माळोदे, किरण शिंदे, पप्पू मुळुख, आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !