महाराष्ट्राला सुपरिचित असलेले नांव, निवेदक, अभिनेता, राष्ट्रीय पक्षाचे प्रवक्ते "अजित" यांच्या वाढदिवसानिमित्त !!!!!

अजित चव्हाण...
महाराष्ट्राला सुपारीचित असलेलं नाव निवेदक, अभिनेता, वक्ता भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते, अजित चव्हाण यांचा ९ नोव्हेंबर रोजी वाढदिवस, खरं तर नाशिकच्या कला विश्वातून मुंबईला नशीब आजमावण्यासाठी गेलेल्या आणि यशस्वी ठरलेल्या नावांपैकी एक हे नाव, पण हे नाव पत्रकारितेत यशस्वी ठरलं. नाशिकच्या दैदीप्यमान इतिहास असलेल्या दीपक मंडळाचा सदस्य, बाबा थिएटरच्या माध्यमातून रंगभूमी वरती काम करणारा नाशिकच्या रंगभूमीवरचा गुणी कालावंत, उत्तम निवेदक, अभ्यासू वक्ता वाचक, पुस्तक प्रेमी, बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या एका देखण्या आणि गुणी कलावंत मराठी रंगभूमीपासून थोडासा दुरावला तो पत्रकारितेमुळे, पण अजित ने नाशिकहून मुंबईला जाऊन पत्रकारितेतही आपला एक आगळावेगळा ठसा उमटवला

२००३ साली पहिला सिनेमा 'दिवस बालपणीचे' यामध्ये ज्येष्ठ अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्यासोबत नाशिकच्या आधी चव्हाण, स्मिता सारंग या जोडीने बालकलाकार म्हणून सुरुवात केली, शाळेत असतानाच रंगभूमी वरती हौशी नाटकातून भूमिका करताना राज्य नाट्य स्पर्धातूनही अजितने आपली चमक दाखवली.  नाशिकचे दोन कलाकार अभिजीत खांडकेकर आणि अजित चव्हाण दोघेही सुरुवातीला अँकर होते अजित त्या काळातल्या पहिल्या वृत्तवाहिनीत म्हणजेच झी २४ तास मध्ये तर अभिजीत हा साम टीव्ही मध्ये अँकर होता पण महाराष्ट्राचा सुपरस्टार या मालिकेतून संधी मिळाल्यानंतर अभिजीत अभिनयाकडे वळला, मराठीतला सुप्रसिद्ध स्टार झाला, अभिनेता होण्यासाठी मुंबईला गेलेला अजित मात्र पत्रकारितेत रुळला, पत्रकारितेतला स्टार झाला. मुंबई-पुण्यातल्या दिग्गज पत्रकारांच्या गर्दीत 'अजित चव्हाण' हे नाव देखील अतिशय महत्त्वाचं झालं नाशिककर म्हणून याचा अभिमानाच वाटतो. अभिनय हे आपलं पहिलं प्रेम पत्रकारितेत गेल्यानंतर गुंडाळून ठेवावं लागलं, याचं जितकं वाईट अजितला वाटत नसेल त्याहून जास्त वाईट आम्हा नाशिककरांना वाटतं. कारण एका उत्तम कलाकाराला मराठी रंगभूमी आणि मराठी पडदा, मनोरंजन विश्व  दुरावले... पत्रकारितेतही अजितने झी २४ तास च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात ओळख मिळवली, चौफेर वाचन, गाढा अभ्यास, ग्रामीण महाराष्ट्रातला भरपूर प्रवास यामुळे अतिशय अभ्यासपूर्ण निवेदन, राज्यातल्या विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दरम्यानचे चर्चात्मक कार्यक्रम महाराष्ट्रात प्रचंड गाजले. महाराष्ट्रातल्या गावागावात खेडोपाडी हा चेहरा घराघरात पोहोचला याचा नाशिककरांना अभिमान आहे. अँकर, वरिष्ठ निर्माता, जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीत कार्यकारी संपादक, अशी पत्रकारितेत यशस्वी घोडदौड करत असताना गल्ली पासून दिल्लीपर्यंत व्हाया मुंबई चौफेर जनसंपर्क महाराष्ट्राच्या जिल्ह्या -तालुक्यात जोडलेले प्रेमाचे मित्र, हे अजित चव्हाण यांनी आपल्या मित्रमंडळीसाठी गेली दोन दशकं कुठलाही स्वार्थ न ठेवता जोडलेली सर्व क्षेत्रातली माणसं पाहता खऱ्या अर्थानं दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस असं वर्णन केलं तर वावगं ठरणार नाही. घार उडे आकाशी तिचं लक्ष पिला पाशी या उक्तीप्रमाणे  मुंबई आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी कलाक्षेत्रातल्या सर्वच मंडळींशी अजितचा सातत्याने संपर्क असतो. नाशिकच्या कलाक्षेत्रातल्या विविध अडचणीसाठी देखील पत्रकारितेत असताना त्यांनी मदत केलीच आहे. आता राजकीय क्षेत्रात प्रवेशानंतरही ते सुरू आहे, पत्रकारितेनंतर आपली आवड अभिनयाकडे अजित वळेल असं वाटलं होतं परंतु दीड वर्षांपूर्वी सर्वांना अनपेक्षित धक्का देत राज्याच्या सक्रिय राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षासारख्या प्रमुख पक्षात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अजितने प्रवेश केला. भारतीय जनता पक्षानही अजित चव्हाण यांचा सन्मान करत त्यांना राज्याच्या प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती दिली. कुठलीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसताना एका प्रमुख राष्ट्रीय राजकीय पक्षांमध्ये अजित यांच्यासारख्या तरुण महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या चेहऱ्याचा केलेला हा सन्मान म्हणजे आश्चर्याचा सुखद धक्का होता. एक प्रकारे तरुणाईचा सर्वसामान्यांमध्ये आलेल्या एका तरुण लोकप्रिय चेहऱ्याचा केलेला हा सन्मान नाशिककरांना सुखावणारा ठरला. विरोधी पक्षांमध्ये असताना अजित चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून आपली विचारांवरची निष्ठा सिद्ध केली. तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर टीका करताना अजित यांच्या मधला एक आक्रमक पत्रकार ते राजकीय नेता, अभ्यासू टीकाकार पाहायला मिळाला. आपले राजकीय गुरू भाजपचे संघटन मंत्री, विधान परिषदेचे आमदार, श्री श्रीकांतजी भारतीय यांचे नेतृत्वाखाली तर्पण फाउंडेशन च्या माध्यमातून १८ वर्षे वयावरील अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे श्री अजित चव्हाण हे संचालक आहेत. त्या माध्यमातून सामाजिक काम संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे. आपल्या विनयशील, अभ्यासू, लाघवी, व्यक्तिमत्वाने सर्वसामान्यांशी थेट जोडल्या जाणाऱ्या, सर्वसामान्यांचे प्रश्नासाठी आक्रमक होऊन थेट भिडणाऱ्या या तरुण नेतृत्वाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला एक आश्वासक चेहरा सापडलाय आणि त्याचा राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा फायदा होईल यात शंका नाही. मात्र नाशिककर म्हणून कला विश्वात काम करणारे संघटक म्हणून अजित यांच्या रूपाने आम्हाला एक हक्काची व्यक्ती आता राजकीय क्षेत्रात देखील गवसली आहे. खरंतर माझा आणि अजितचा व्यक्तिगत संबंध हा अतिशय बंधुत्वाचा आहे. पण आम्हाला जोडणारा एक महत्त्वाचा धागा म्हणजे 'सद्गुरू शंकर महाराज'  शंकर महाराजांचा निस्सीम भक्त असणारे अजित राजकीय नेत्यांच्या गर्दीत वेगळं भासणारं आमचं वाटणारं, आमचं हक्काचं ठिकाण आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना एकच सांगायचे, त्यांचं आपलं पहिलं प्रेम अभिनय हे विसरू नये, येत्या काळामध्ये 'प्लॅनेट मराठी' या आघाडीचे ओटीपी प्लॅटफॉर्म वरती अजितचा नवीन कार्यक्रम सुरू होतोय हे ऐकून निश्चितच आनंद वाटला, पण उत्तम अभिनेता असलेला एक अजित हा एक संवेदनशील लेखक देखील आहे. राजकीय, सामाजिक काम करताना आपला कला विश्वातला वावर असाच अबाधित ठेवावा. येत्या वर्षात अभिनय क्षेत्रात देखील आपली चुणूक पुन्हा दाखवावी, लेखन जोमाने सुरू ठेवावं, उत्तर महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यात दिसणारी 'जागर जनस्थान' ही वाहिनी देखील त्यांनी चार वर्षांपूर्वी सुरू केली आहे. या वाहिनीच्या माध्यमातून देखील उत्तम कार्यक्रम भविष्यात उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेला पाहायला मिळावे आपल्या संपर्काचा वापर त्यांनी नाशिकच्या कलाक्षेत्रासाठी अधिकाधिक करावा या अपेक्षांसह सद्गुरू शंकर महाराज अजित चव्हाण यांना उदंड आयुष्य देवो या मनःपूर्वक शुभेच्छा!
 प्रशांत जुन्नरे
 बाबाज् थिएटर्स,
नरेंद्र पाटील, संपादक न्यूज मसाला, (७३८७३३३८०१) नासिक, कडूनही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक ! शुभेच्छा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक