डॉ. राजेंद्र जाधव यांची यशाला गवसणी !


डॉ. राजेंद्र जाधव यांची यशाला गवसणी !

      नाशिक:- प्रख्यात सर्जन डॉ. राजेंद्र जाधव यांनी जळगाव येथे संपन्न झालेल्या ज्येष्ठांच्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत यशाला गवसणी घातली.
     महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने जळगाव आयएमए आयोजित महास्पोर्टस स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. त्यात साठ वर्षांवरील ज्येष्ठ बॅडमिंटन गटात एकेरी आणि दुहेरीत डॉ.राजेंद्र जाधव यांनी उपविजेतेपद संपादन केले. दुहेरीत डॉ. हेमंत साठे (सोलापूर) ह्यांनी त्यांना उत्तम साथ दिली. विजेत्यांना पदक आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत राज्यभरातील ९८ डॉक्टरांनी भाग घेतला. सर्व थरातून डॉक्टरांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन !साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२५,

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।