रामरक्षा आणि मारुतीस्तोत्र पाठांतर स्पर्धेत ५०० विद्यार्थी सहभागी होणार !

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या रामरक्षा आणि मारुतीस्तोत्र पाठांतर स्पर्धेत ५०० विद्यार्थी सहभागी होणार !

  नासिक, न्यूज मसाला वृत्तसेवा::-  वेद, पुराणे, उपनिषदे, स्तोत्रे आणि महाकाव्यांनी समृध्द असलेल्या भारतीय संस्कृतीची परंपरा महान आहे. आपल्या मराठी मनांसाठी मारुती स्तोत्र, रामरक्षा आणि मनाचे श्लोक हि स्तोत्रे लहानपणापासूनच संस्कार करणारी आहेत. शारीरिक व्यायामा बरोबरच मनाचा व्यायाम व्हावा म्हणून पुरातन काळापासून हि स्तोत्रे घरोघर म्हटली जात होती. आजही काही घरांमध्ये या स्तोत्रांचे पठाण होत आहे. परंतु आपल्या लहानग्यांना या स्तोत्राची गोडी लागावी तसेच त्यांनी ते सातत्याने म्हणत रहावे यासाठी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्यावतीने नाशिक शहरातील प्राथमिक शाळांमधील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मारुती स्तोत्र आणि इयता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धा रविवार दिनांक ५ मार्च २०२३ रोजी  सकाळी ९.०० ते १२.३० यावेळेत होणार असून जवळपास ५५० शालेय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे.

या स्पर्धा काळाराम मंदिर आणि अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे अभ्यंकर सभागृह अशा दोन्ही ठिकाणी होणार आहेत. स्पर्धा संपल्यानंतर लगेचच काळाराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. मोरे साहेब, विश्वस्त महंत सुधीरदास पुजारी, धनंजय पुजारी, तसेच शंतनु गुणे, संजय मोडक यांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.

       यावेळी सर्व समाजबांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ॲड. अविनाश भिडे, कार्याध्यक्ष उदयकुमार मुंगी कार्यवाह सुभाष सबनीस आणि सर्व कार्यकारी मंडळाने केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आश्रम शाळा मुख्याध्यापक रक्कम टाकून पळून गेले !

वर्ग एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !