तीन बालकांवर यशस्वी ओपन हार्ट सर्जरी !

तीन बालकांवर यशस्वी ओपन हार्ट सर्जरी !

राज्यस्तरीय लाईव्ह कार्यशाळा आयोजनामुळे बालहृदयरोग तज्ञांची स्तुतीसुमने !

नाशिक, न्यूज मसाला वृत्तसेवा::-वरिष्ठ बालहृदयविकार तज्ञांकडून मोलाचे मार्गदर्शन मिळावे तसेच बालहृदयउपचार करताना कोणत्या पद्धतीने काळजी घेतली जावी या उद्देशाने उत्तर महाराष्टातील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये नुकतेच राज्यस्तरीय दोन दिवसीय लाईव्ह वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबईतील वरिष्ठ बालरोग व जन्मजात हृदयविकार तज्ञ डॉ. सुरेश राव यांनी उपस्थित बालरोगतज्ञ, सर्जन आणि फिजिशियन यांना मार्गदर्शन केले. दोन दिवसीय आयोजित कार्यशाळेत ३ बालकांवर यशस्वी ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली.

       मुंबईतील बालरोग व बालहृदयविकार शस्रक्रिया तज्ञ डॉ. सुरेश राव व एसएमबीटी हॉस्पीटलामधील हृदयविकार शस्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. विद्युतकुमार सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत बालहृदय विकार व कन्जनायटल हार्ट शस्रक्रिया या विषयावर लाईव्ह कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून १०० पेक्षा अधिक डॉक्टरांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे, ऑपरेशन थिएटरमधून थेट ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशनसह लेक्चर थिएटर येथे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
लहान मुलांमध्ये जन्मजात हृदयरोगाचे प्रमाण मोठे आहे. दर हजार जन्मलेल्या बालकांमध्ये जन्मत: हृदयरोग असल्याचे प्रमाण ६ ते १२ टक्के आहे. भारताच्या जन्मदराचा विचार केल्यास कन्जनायटल हार्ट डिसिज असणारी सुमारे १.५ लाखाहून अधिक बालके दरवर्षी जन्मतात असे सांगितले जाते. लहान मुलांत जे जन्मजात आजार आढळतात त्यात हृदयरोगाचा वरचा क्रमांक आहे.
     लहान मुलांचे बालहृदय विकारांचे प्रमाण अधिक असूनही तज्ञ डॉक्टरांची मात्र कमी वेळोवेळी जाणवते. ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या शहरात जाऊन याठिकाणी उपचार करावे लागतात. अशा अवघड समजल्या जाणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रात एसएमबीटी हॉस्पिटलने पुढाकार घेत लाईव्ह वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागात ठिकठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून दीड हजार पेक्षा जास्त शिबिरे आयोजित करून जास्तीत जास्त बालकांवर मोफत उपचार केले आहेत.
      दीपप्रज्वलनाने शिबिराची सुरूवात झाली. यावेळी डॉ. सुरेश राव, डॉ. हर्षल तांबे, डॉ. गौरव वर्मा, डॉ. विद्युतकुमार सिन्हा, अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगावकर, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर संतोष पवार त्यांनतर तब्बल तीन शस्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या. एक्स्प्रेस इन हॉटेल येथे दुपारच्या सत्रात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील बालरोगतज्ञांनी हजेरी लावत परिसंवादात सहभाग घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!