रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धेमध्ये रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मेडियम स्कूल तर मारुती स्तोत्र स्पर्धेमध्ये रचना विद्यालयाची बाजी.

रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धेमध्ये रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मेडियम स्कूल तर मारुती स्तोत्र स्पर्धेमध्ये रचना विद्यालयाची बाजी...

       नाशिक, न्यूज मसाला वृत्तसेवा::- अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या रामरक्षा आणि मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांमधील इयत्ता तिसरी आणि चौथीच्या जवळपास ५७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. वेद पुराणे, उपनिषदे, स्तोत्रे आणि महाकाव्यानी समृद्ध असलेल्या भारतीय संस्कृतीची परंपरा महान आहे. तसेच आपल्या मराठी मनासाठी मारुती स्तोत्र आणि रामरक्षा ही स्तोत्रे लहानपणापासूनच संस्कार करणारी आहे. शारीरिक व्यायामाबरोबरच मनाचा व्यायाम होण्यासाठी पुरातन काळापासून अशी स्तोत्रे प्रत्येक घरामध्ये म्हटली जात होती. कालौघामध्ये याचे प्रमाण कमी कमी होत गेले.  अखिल ब्राह्मण मध्यवर्ती
संस्थेने हे संस्कार दृढ व्हावे म्हणून रामरक्षा आणि मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धेचे आयोजन केले होते.

मराठी इंग्रजी माध्यमातील विविध प्राथमिक शाळांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. इयत्ता तिसरी आणि चौथीचे विद्यार्थी अतिशय तन्मयतेने हि स्तोत्रे सादर करीत होती.

काळाराम मंदिराच्या सभामंडपात झालेल्या रामरक्षा पाठांतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण महंत सुधीरदास पुजारी तर अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या अभ्यंकर सभागृहात झालेल्या मारूती स्तोत्र स्पर्धेचे पारितोषिक वितरण श्री. शंतनू गुणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. स्पर्धा झाल्यानंतर सर्व ५७५ विद्यार्थी तसेच शिक्षक पालक आणि उपस्थितांनी सामुहीक रामरक्षा आणि मारुती स्तोत्र म्हणून सांगता केली. या स्पर्धांच्या यशस्वीततेसाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड.अविनाश भिडे, तसेच उदयकुमार मुंगी, अनिल देशपांडे,सुहास शुक्ल, प्रवीण कुलकर्णी, उल्हास पंचाक्षरी, सचिन पाडेकर, सुहास भणगे, धनंजय पुजारी, ॲड.समीर जोशी, महेश शुक्ल यांच्यासह अमेय वैद्य, गौरी पर्वते, मीनाक्षी वैद्य, सुहासिनी बुरकुले,गौरी वैद्य, प्रसन्न पंडित, अजित कुलकर्णी,अनिल नांदुर्डीकर, अमोल लाळे, अवनी शुक्ल, अश्विनी पेशकार यांनी मेहनत घेतली या स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे.
रामरक्षा पाठांतर स्पर्धा
प्रथम पारितोषिक रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मेडियम स्कूल,
द्वितीय पारितोषिक न्यू ईरा स्कूल,
तृतीय पारितोषिक आदर्श प्रायमरी इंग्लिश मेडियम स्कूल
उत्तेजनार्थ पारितोषिक नवीन मराठी शाळा

मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धा
प्रथम पारितोषिक रचना विद्यालय,
द्वितीय पारितोषिक माधवराव लेले विद्यालय,,
तृतीय पारितोषिक शिशुविहार आणि बालक मंदिर मराठी माध्यम शाळा.
उत्तेजनार्थ पारितोषिक न्यू ईरा इंग्लिश मेडियम

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।