पोस्ट्स

आयुष्याची सेकंड इनिंग-ज्येष्ठांचा सखा !! --परीक्षण, उद्धव भयवाळबायको हाच खरा आधार, मनातले मांडे, म्हातारे अर्क, आरोग्याशी सामना, दिर्घायुष्य एक दृष्टिकोन अशा विषयांचा लेखसंग्रह प्रत्येकाच्या संग्रहासोबतच वाचनात यावा अशा या प्रा.रमेश कुलकर्णी लिखित "आयुष्याची सेकंड इनिंग" पुस्तकाचे नामवंत लेखक परिक्षक उद्धव भयवाळ यांनी केलेले परिक्षण,,,,,,,,,,,,

इमेज
आयुष्याची सेकंड इनिंग-ज्येष्ठांचा सखा !!               --परीक्षण, उद्धव भयवाळ बायको हाच खरा आधार, मनातले मांडे, म्हातारे अर्क, आरोग्याशी सामना, दिर्घायुष्य एक दृष्टिकोन अशा विषयांचा लेखसंग्रह प्रत्येकाच्या संग्रहासोबतच वाचनात यावा अशा या प्रा.रमेश कुलकर्णी लिखित "आयुष्याची सेकंड इनिंग" पुस्तकाचे नामवंत लेखक परिक्षक उद्धव भयवाळ यांनी केलेले परिक्षण,,,,,,,,,,,, न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801      छत्रपती संभाजीनगर येथील प्रगतीशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे माजी अध्यक्ष,  राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक आणि एक प्रथितयश लेखक प्रा. रमेश कुलकर्णी यांचा "आयुष्याची सेकंड इनिंग" हा लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झालेला आहे. याआधी त्यांचा 'संवेदना' हा कवितासंग्रह आणि "कळत नकळत" हा कथासंग्रह, अशी दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.             'आयुष्याची सेकंड इनिंग' या लेखसंग्रहामध्ये एकूण वीस लेख आहेत. हे वीसही लेख ज्येष्ठांच्या आयुष्याच्या उत्तरार्धाचे विविध पैलू दाखवणारे आहेत. सर्व लेख हे आयुष्याच्या उत्तरार्धातील अनुभवांचे, आठवणीं

तलाठी व कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
तलाठी व कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !        जळगाव::- आलोसे ज्ञानेश्वर सुर्यभान काळे, वय-५० वर्ष, तलाठी, मौजे बोरखेडा बु॥, तलाठी कार्यालय, ता. चाळीसगाव, जि.जळगाव. (वर्ग-३) रा.शिवशक्ती नगर, भडगाव रोड, चाळीसगाव ता.चाळीसगाव जि.जळगाव. व आलोसे किशोर गुलाबराव चव्हाण, वय-३७, कोतवाल, मौजे बोरखेडा बु॥, तलाठी कार्यालय, ता.चाळीसगाव, जि.जळगाव, रा.श्रीकृष्ण नगर, चाळीसगाव ता. चाळीसगाव जि.जळगाव. (वर्ग-४) यांनी प्रथम ७,०००/-रू. व तडजोडीअंती ५,०००/-रु लाच स्विकारली असता पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले.           यातील तक्रारदार वय (४२), यांचे वडीलांनी त्यांनी केलेल्या मृत्यूपत्रान्वये तक्रारदार यांचे नावे बोरखेडा बु॥ येथील शेतजमीन केलेली आहे. तक्रारदार यांचे हिश्यावर एकुण ३ गट वाटणीस आलेले आहेत. सदर ३ गटांपैकी ६४/२ ही शेतजमीन तक्रारदार यांना त्यांची पत्नी प्रतिभा पाटील यांचे नावे करायची आहे जेणेकरून ते अल्पभूधारक म्हणून गणले जातील, म्हणून नोव्हेंबर-२०२१ मध्ये आलोसे क्रं.१ यांनी सांगितल्याप्रमाणे सदरचे प्रकरण सादर केलेले आहे. सदर शेती पत्नीच्या नावे करण्यासाठी आलोसे क्रं.१ यांनी यापूर्वी

"घर बंदूक बिर्याणी" पसंतीस उतरेल !

इमेज
"घर बंदूक बिर्याणी" पसंतीस उतरेल !  ७ एप्रिलला प्रदर्शित होणार ‘घर बंदूक बिर्याणी' ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801          नाशिक ( प्रतिनिधी )::- झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी फॅंड्री, सैराट, नाळ यांसारखे सुपरहिट आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आणि आता ‘घर बंदुक बिर्याणी’ हा एक वेगळा विषय ते आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.  हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दि. ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा 'घर बंदूक बिरयानी' एकाच वेळी मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होत आहे.     पत्रकार परिषदेत निर्माते नागराज मंजुळे, अभिनेते आकाश ठोसर, अभिनेत्री सायली पाटील, दीप्ती देवी तसेच झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी उपस्थित होते. ट्रेलरमध्ये पोलीस आणि डाकूंची चकमक दिसत असून, यात एका तरूणाचाही सहभाग दिसत आहे. हा पाठलाग कशासाठी आहे आणि यातून काय निष्पन्न

सर्वात्मक कलादालन हे कलाकारांसाठीहक्काचे व्यासपीठ - वसंत खैरनार !

इमेज
सर्वात्मक कलादालन हे कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ - वसंत खैरनार ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801          नाशिक ( प्रतिनिधी )::-  वाचनसंस्कृती जोपासताना कलासंवर्धनाचे काम सर्वात्मक वाचनालयाने हाती घेतले आहे. नाशिक शहरात अनेक कलादालने बंद पडलेली असताना येथील कलादालनामुळे कलाकारांसाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. लेखक तुमच्या भेटीला हा उपक्रम सर्वात्मक वाचनालयाच्या सहकार्याने या वर्षापासून इंदिरानगरमध्ये घेण्यात येईल असे प्रतिपादन वसंत खैरनार यांनी केले. जिल्हा ग्रंथालय प्रमुख सचिन जोपुळे यांनी  कलादालन या नव्या उपक्रमाचे स्वागत करून शासनातर्फे सहकार्य करण्याची ग्वाही दिली. .            इंदिरानगर येथील सर्वात्मक वाचनालयातर्फे परिसरातील कलारसिकांसाठी कलेचा आनंद मिळवण्यासाठी एका सुंदर कलादालनाची निर्मिती केली असुन या कलादालनाचे उदघाटन बुधवार दि. २२ रोजी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जिल्हा ग्रंथालय प्रमुख सचिन जोपुळे, उद्योजक वसंतराव खैरनार, चित्रकार रामदास महाले, चित्रकार भिमराज सावंत, चित्रकार  वासुदेव मराठे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रारंभी सर्वात्मक वाचनालयाच

सर्वात्मक कलादालन हे कलाकारांसाठीहक्काचे व्यासपीठ - वसंत खैरनार !

इमेज
सर्वात्मक कलादालन हे कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ - वसंत खैरनार ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801          नाशिक ( प्रतिनिधी )::-  वाचनसंस्कृती जोपासताना कलासंवर्धनाचे काम सर्वात्मक वाचनालयाने हाती घेतले आहे. नाशिक शहरात अनेक कलादालने बंद पडलेली असताना येथील कलादालनामुळे कलाकारांसाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. लेखक तुमच्या भेटीला हा उपक्रम सर्वात्मक वाचनालयाच्या सहकार्याने या वर्षापासून इंदिरानगरमध्ये घेण्यात येईल असे प्रतिपादन वसंत खैरनार यांनी केले. जिल्हा ग्रंथालय प्रमुख सचिन जोपुळे यांनी  कलादालन या नव्या उपक्रमाचे स्वागत करून शासनातर्फे सहकार्य करण्याची ग्वाही दिली. .            इंदिरानगर येथील सर्वात्मक वाचनालयातर्फे परिसरातील कलारसिकांसाठी कलेचा आनंद मिळवण्यासाठी एका सुंदर कलादालनाची निर्मिती केली असुन या कलादालनाचे उदघाटन बुधवार दि. २२ रोजी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जिल्हा ग्रंथालय प्रमुख सचिन जोपुळे, उद्योजक वसंतराव खैरनार, चित्रकार रामदास महाले, चित्रकार भिमराज सावंत, चित्रकार  वासुदेव मराठे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रारंभी सर्वात्मक वाचनालयाच

ब्रह्माकुमारी पूनम दीदी स्वामिनी पुरस्काराने सन्मानित !श्र ी स्वामीनारायण कॉलेजमध्ये पुरस्कार सोहळ्याचे आयोजन !

इमेज
ब्रह्माकुमारी पूनम दीदी स्वामिनी पुरस्काराने सन्मानित ! श्री स्वामीनारायण कॉलेजमध्ये पुरस्कार सोहळ्याचे आयोजन !  न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801         नाशिक (प्रतिनिधी) ::- येथील श्री स्वामीनारायण कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यकर्तृत्व करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा स्वामिनी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.        यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या प्रभू प्रासाद, म्हसरूळ येथील जिल्हा राजयोग सेवा केंद्रातील राज योगिनी ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांचा अध्यात्मिक क्षेत्रामध्ये अतुलनीय सेवा करत असल्याबद्दल स्वामिनी पुरस्काराने सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देत गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वेदश्री थिगळे, डॉ. सिंधू काकडे, सुनीता पाटील, लेखिका अलका कुलकर्णी, कथक गुरु स्वाती लाहेरी, आणि किरण मोजे या उपस्थित होत्या.          यावेळी समाजसेवा- संगीता जाधव, आरोग्य- वृषाली गडकरी, सिटी लिंक बस चालक मीना लांडगे, बस वाहक करुणा पाटील, बालरोग तज्ञ सुलभा पवार, नवजीवन वृद्धाश्रमच्या संचालिका मेघा जगता

सैन्य दलाच्या शिध्यामध्ये भरड धान्यांचा समावेश ! शेतीमालासाठी केंद्र सरकारचा सकारात्मक आणि स्तुत्य उपक्रमाची नांदी !

इमेज
सैन्य दलाच्या शिध्यामध्ये भरड धान्यांचा समावेश ! शेतीमालासाठी केंद्र सरकारचा सकारात्मक निर्णय ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801    नवी दिल्ली (२२)::- संयुक्त राष्ट्रसंघाने वर्ष २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केल्याच्या निमित्ताने भरड धान्याच्या  वापराला चालना देण्याच्या उद्देशाने, भारतीय सैन्यदलाने सैनिकांना दिल्या जाणाऱ्या शिध्यामध्ये भरड धान्याचा  समावेश केला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे तब्बल अर्ध्या शतकांनंतर, सैन्यांना देशी आणि पारंपारिक धान्यांचा पुरवठा सुनिश्चित होईल. जो गव्हाच्या पिठाच्या पुरवठ्यामुळे बंद करण्यात आला होता.           या निर्णयामुळे भरड धान्य आता सर्व श्रेणींच्या सैनिकांच्या रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग बनेल.          या संदर्भात सन २०२३-२४ पासून सेवेत भरती होणार्‍या सैनिकांसाठी  पात्र रेशनमध्ये कडधान्यांच्या (तांदूळ आणि गव्हाचे पीठ) २५  टक्क्यांपेक्षा जास्त नसलेले भरड धान्य  खरेदी करण्यासाठी सरकारची मंजुरी मागण्यात आली होती . खरेदी आणि वितरण हे उपलब्ध असलेल्या पर्यायांचा विचार करून आणि मागणी केल्याच्या प्रमाणावर आधारित असेल. बाजरी, ज्

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याणकेंद्र इमारतीचा पायाभरणी समारंभ !

इमेज
राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याणकेंद्र इमारतीचा पायाभरणी समारंभ ! गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर देशभरामध्ये संघटन क्षेत्रात मानबिंदू ठरेल अशा राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याणकेंद्र इमारतीचा पायाभरणी समारंभ न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801      मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, हा राज्यातील विविध खात्यांतील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या ७० खातेनिहाय संघटनांची शिखर संघटना आहे. राज्यसेवेतील सुमारे दीड लाख राजपत्रित अधिकाऱ्यांचे समान प्रश्न, शासन-प्रशासनाशी चर्चा विनिमयातून, सौहार्दाच्या वातावरणात सोडविण्याचे अधिकारी महासंघाचे निश्चित धोरण राहिलेले आहे.         बलाढ्य संघशक्ती असलेल्या अधिकारी महासंघाचे शक्तीपीठ म्हणजे कल्याणकेंद्र ! अधिकाऱ्यांच्या विश्रामगृह, प्रशिक्षण व इतर संघटनात्मक सोयीसुविधांकरीता देशभरामध्ये संघटनक्षेत्रात मानबिंदू ठरेल, असे आठ मजली बहुउद्देशीय कल्याणकेंद्र वांद्रे (पूर्व) येथे शासनाच्या सहकार्यातून साकारले जात आहे.          राज्य शासनाने दिलेल्या, सर्व्हे नं. ३४९, न.भू.क्र. ६२९/१२७१, गुरुनानक रुग्णालयाजवळ, न्याय सागर सो

कृषी पर्यवेक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
कृषी पर्यवेक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ! आलोसे सुधाकर विश्वनाथ सोनवणे,  वय- ५४ वर्ष, कृषी पर्यवेक्षक वर्ग 3, कृषी विभाग, मालेगाव, जिल्हा नाशिक.    नासिक::- यातील तक्रारदार पुरुष (४४) व त्यांचे भाऊ यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा स्कीम) अंतर्गत ठिबक सिंचन या बाबीसाठी लाभार्थी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. सदर योजनेच्या अटीनुसार तक्रारदार व त्याचा भाऊ यांनी त्यांचे कुटुंबाचे  शेतजमिनीवर फळबाग लागवड करून ठिबक सिंचनाचे काम केलेलं आहे. सदर ठिबक सिंचनाचे कामाचे फाईलची तपासणी करून बिले ऑनलाईन अपलोड करणेसाठी आरोपी लोकसेवक सुधाकर विश्वनाथ सोनवणे, कृषी पर्यवेक्षक वर्ग ३, कृषी विभाग, मालेगाव यांनी तक्रारदाराला प्रत्येक फाईल चे १०००/- असे रुपये २०००/- अशी पंचा समक्ष दिनांक १७ मार्च २०२३ रोजी लाचेची मागणी करून, सदर लाचेची रक्कम रुपये २०००/-पंच साक्षीदार यांचे समक्ष दिनांक २१ मार्च २०२३ रोजी स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.             लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नासिक च्या पोलिस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्य

विशेष लेखापरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात !

इमेज
विशेष लेखापरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात !     नासिक::- आलोसे किसन दिंगबर सागर (५५) विशेष लेखा परीक्षक, वर्ग २, जिल्हा विशेष लेखा परीक्षक कार्यालय, सहकारी संस्था, अहमदनगर, राहणार-लक्ष्मी कॅालनी, गट नं १८४, सातारा परिसर , जि.छत्रपती संभाजीनगर व तय्यब वजीर पठाण (४८), खाजगी लेखा परीक्षक, राहणार जवळे खुर्द तालुका नेवासा या दोघांनी ३०००००/- रूपये लाच मागितली होती, तडजोडी अंती २०००००/- रुपयांपैकी आज दिनांक २० मार्च रोजी पहिल्या टप्प्यातील १०००००/- रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.         यातील तक्रारदार (६३) राहणार नेवासा जि. अहमदनगर हे एका पतसंस्थेचे चेअरमन होते, सदर पतसंस्थेचे लेखापरीक्षण करुन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी लेखापरीक्षक यातील आरौपी लौकसेवक यांना दिले होते. आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार  व त्यांचे नातेवाईक यांचा नावावरील मुदत ठेवींची रक्कम व्याजासह अहवालात दर्शविणे साठी व लेखापरीक्षण अहवाल चांगला सादर करण्यासाठी तक्रारदार यांचे कडे ₹ ३०००००/- ची मागणी केल्याबाबत ची तक्रार तक्रारदार यांनी दिलेवरु