सैन्य दलाच्या शिध्यामध्ये भरड धान्यांचा समावेश ! शेतीमालासाठी केंद्र सरकारचा सकारात्मक आणि स्तुत्य उपक्रमाची नांदी !

सैन्य दलाच्या शिध्यामध्ये भरड धान्यांचा समावेश !

शेतीमालासाठी केंद्र सरकारचा सकारात्मक निर्णय !

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801

   नवी दिल्ली (२२)::- संयुक्त राष्ट्रसंघाने वर्ष २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केल्याच्या निमित्ताने भरड धान्याच्या  वापराला चालना देण्याच्या उद्देशाने, भारतीय सैन्यदलाने सैनिकांना दिल्या जाणाऱ्या शिध्यामध्ये भरड धान्याचा  समावेश केला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे तब्बल अर्ध्या शतकांनंतर, सैन्यांना देशी आणि पारंपारिक धान्यांचा पुरवठा सुनिश्चित होईल. जो गव्हाच्या पिठाच्या पुरवठ्यामुळे बंद करण्यात आला होता.


          या निर्णयामुळे भरड धान्य आता सर्व श्रेणींच्या सैनिकांच्या रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग बनेल.

         या संदर्भात सन २०२३-२४ पासून सेवेत भरती होणार्‍या सैनिकांसाठी  पात्र रेशनमध्ये कडधान्यांच्या (तांदूळ आणि गव्हाचे पीठ) २५  टक्क्यांपेक्षा जास्त नसलेले भरड धान्य  खरेदी करण्यासाठी सरकारची मंजुरी मागण्यात आली होती . खरेदी आणि वितरण हे उपलब्ध असलेल्या पर्यायांचा विचार करून आणि मागणी केल्याच्या प्रमाणावर आधारित असेल. बाजरी, ज्वारी आणि नाचणी या बाजरीच्या पिठाच्या तीन लोकप्रिय जाती प्राधान्यक्रमानुसार सैनिकांना दिल्या जातील.

     या शिवाय, बाराखाने, कॅन्टीन आणि घरच्या स्वयंपाकात भरड धान्याचा  मोठ्या प्रमाणात वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकच्या जडणघडणीत मविप्रचा मोलाचा वाटा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे दिमाखात उद्घाटन

कौशल्याचे प्रशिक्षण घेऊन महिलांनी स्वावलंबी व्हावे – हेमलता बिडकर

ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन लिमिटेडच्या आयपीओला उत्तम प्रतिसाद - आयपीओच्या पहिल्याच दिवशी २.१ पट प्रतिसाद. इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड चा आयपीओ २८ ऑगस्ट २०२६ रोजी उघडला, प्रति इक्विटी शेअर किंमत पट्टा (Price Band) ₹४०८ ते ₹४२९ निश्चित (दर्शनी मूल्य ₹१ प्रति शेअर). • प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा ₹४०८– ₹४२९ निश्चित. •बोली/इश्यू उघडण्याची तारीख – २८ ऑगस्ट २०२६ आणि बोली/इश्यू बंद होण्याची तारीख – १ सप्टेंबर २०२६. • किमान बोली लॉट ३४ इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर ३४ इक्विटी शेअर्सच्या पटीत