तलाठी व कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

तलाठी व कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
       जळगाव::- आलोसे ज्ञानेश्वर सुर्यभान काळे, वय-५० वर्ष, तलाठी, मौजे बोरखेडा बु॥, तलाठी कार्यालय, ता. चाळीसगाव, जि.जळगाव. (वर्ग-३) रा.शिवशक्ती नगर, भडगाव रोड, चाळीसगाव ता.चाळीसगाव जि.जळगाव. व आलोसे किशोर गुलाबराव चव्हाण, वय-३७, कोतवाल, मौजे बोरखेडा बु॥, तलाठी कार्यालय, ता.चाळीसगाव, जि.जळगाव, रा.श्रीकृष्ण नगर, चाळीसगाव ता. चाळीसगाव जि.जळगाव. (वर्ग-४) यांनी प्रथम ७,०००/-रू. व तडजोडीअंती ५,०००/-रु लाच स्विकारली असता पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले.

          यातील तक्रारदार वय (४२), यांचे वडीलांनी त्यांनी केलेल्या मृत्यूपत्रान्वये तक्रारदार यांचे नावे बोरखेडा बु॥ येथील शेतजमीन केलेली आहे. तक्रारदार यांचे हिश्यावर एकुण ३ गट वाटणीस आलेले आहेत. सदर ३ गटांपैकी ६४/२ ही शेतजमीन तक्रारदार यांना त्यांची पत्नी प्रतिभा पाटील यांचे नावे करायची आहे जेणेकरून ते अल्पभूधारक म्हणून गणले जातील, म्हणून नोव्हेंबर-२०२१ मध्ये आलोसे क्रं.१ यांनी सांगितल्याप्रमाणे सदरचे प्रकरण सादर केलेले आहे. सदर शेती पत्नीच्या नावे करण्यासाठी आलोसे क्रं.१ यांनी यापूर्वी देखील  तक्रारदार यांच्याकडून एकुण ७,०००/-रुपये घेतलेले आहे. तरी देखील सदर काम न झाल्यामुळे तक्रारदार आलोसे क्रं.१ यांना तलाठी कार्यालयात जावून भेटले असता त्यांनी तक्रारदार यांच्या नावे असलेली शेतजमीन पत्नी सौ. प्रतिभा पाटील यांचे नावे करण्याच्या मोबदल्यात प्रथम ७,०००/-रुपये व तडजोडीअंती पंचासमक्ष ५,०००/-रू आलोसे क्रं.१ यांच्यावतीने आलोसे क्रं.२ यांनी तक्रारदार यांचेकडे करून लाचेची मागणी केली व सदर मागणी केलेली लाच रक्कम आलोसे क्रं.१  यांनी पंचासमक्ष आज दि.२३/०३/२०२३ रोजी स्वतःस्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव चे पोलिस उप अधीक्षक, सापळा पर्यवेक्षण अधिकारी शशिकांत पाटील,  पोलिस निरीक्षक, सापळा व तपास अधिकारी श्रीमती.एन.एन.जाधव, पोलिस निरीक्षक, याच्यासह सापळा पथक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे तसेच कारवाई मदत पथक स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक,  एन.एस.न्याहळदे, अप्पर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !