राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याणकेंद्र इमारतीचा पायाभरणी समारंभ !


राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याणकेंद्र इमारतीचा पायाभरणी समारंभ !
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर देशभरामध्ये संघटन क्षेत्रात मानबिंदू ठरेल अशा राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याणकेंद्र इमारतीचा पायाभरणी समारंभ
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801
     मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, हा राज्यातील विविध खात्यांतील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या ७० खातेनिहाय संघटनांची शिखर संघटना आहे. राज्यसेवेतील सुमारे दीड लाख राजपत्रित अधिकाऱ्यांचे समान प्रश्न, शासन-प्रशासनाशी चर्चा विनिमयातून, सौहार्दाच्या वातावरणात सोडविण्याचे अधिकारी महासंघाचे निश्चित धोरण राहिलेले आहे.

        बलाढ्य संघशक्ती असलेल्या अधिकारी महासंघाचे शक्तीपीठ म्हणजे कल्याणकेंद्र ! अधिकाऱ्यांच्या विश्रामगृह, प्रशिक्षण व इतर संघटनात्मक सोयीसुविधांकरीता देशभरामध्ये संघटनक्षेत्रात मानबिंदू ठरेल, असे आठ मजली बहुउद्देशीय कल्याणकेंद्र वांद्रे (पूर्व) येथे शासनाच्या सहकार्यातून साकारले जात आहे.


         राज्य शासनाने दिलेल्या, सर्व्हे नं. ३४९, न.भू.क्र. ६२९/१२७१, गुरुनानक रुग्णालयाजवळ, न्याय सागर सोसायटीच्या बाजूला, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०० ०५१ या भूखंडावर कल्याणकेंद्राच्या बांधकामाचा शुभारंभ होत असून, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आज बुधवार दि. २२ मार्च, २०२३ रोजी सकाळी ठीक ११.३० वा. कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांचे शुभहस्ते पायाभरणी होत आहे. या प्रसंगी, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता इंजि. आर. आर. हांडे व वास्तुविशारद शशी प्रभू हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत, असे महासंघाचे ग. दि. कुलथे (मुख्य सल्लागार), विनोद देसाई (अध्यक्ष), नितीन काळे (कोषाध्यक्ष), समीर भाटकर (सरचिटणीस) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।