विशेष लेखापरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात !

विशेष लेखापरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात !

    नासिक::- आलोसे किसन दिंगबर सागर (५५) विशेष लेखा परीक्षक, वर्ग २, जिल्हा विशेष लेखा परीक्षक कार्यालय, सहकारी संस्था, अहमदनगर, राहणार-लक्ष्मी कॅालनी, गट नं १८४, सातारा परिसर , जि.छत्रपती संभाजीनगर व तय्यब वजीर पठाण (४८), खाजगी लेखा परीक्षक, राहणार जवळे खुर्द तालुका नेवासा या दोघांनी ३०००००/- रूपये लाच मागितली होती, तडजोडी अंती २०००००/- रुपयांपैकी आज दिनांक २० मार्च रोजी पहिल्या टप्प्यातील १०००००/- रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.

        यातील तक्रारदार (६३) राहणार नेवासा जि. अहमदनगर हे एका पतसंस्थेचे चेअरमन होते, सदर पतसंस्थेचे लेखापरीक्षण करुन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी लेखापरीक्षक यातील आरौपी लौकसेवक यांना दिले होते. आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार  व त्यांचे नातेवाईक यांचा नावावरील मुदत ठेवींची रक्कम व्याजासह अहवालात दर्शविणे साठी व लेखापरीक्षण अहवाल चांगला सादर करण्यासाठी तक्रारदार यांचे कडे ₹ ३०००००/- ची मागणी केल्याबाबत ची तक्रार तक्रारदार यांनी दिलेवरुन दिनांक १७/०३/२०२३ रोजी पंचासमक्ष केलेल्या लाच पडताळणी मध्ये आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचा कडे तडजोड अंती ₹ २०००००/- ची मागणी आरोपी क्र २ याचे उपस्थितीत केली. मागणी दरम्यान आरोपी क्र २ यांनी प्रोत्साहन दिले. तक्रारदार यांनी मागणी केलेल्या रकमेपैकी पहिल्या टप्प्यात ₹ १०००००/- देण्याची विनंती केली व सदर लाच रक्कम आज रोजी बाळूमामा ज्युस सेंटर , नेवासा फाटा येथे पंचासमक्ष स्विकारली असता आरोपी लोकसेवक क्र १ यांनी आरोपी  क्र २ यांचे उपस्थितीत स्विकारली असता दोन्ही आरोपी  यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
         पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाने, अप्पर पोलीस अधिक्षक नारायण न्याहाळदे, वाचक पोलिस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस उप अधीक्षक हरिष खेडकर, अहमदनगर, यांच्या सह सापळा पथक पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक पोलीस हवालदार हरुन शैख, चालक पोलिस हवालदार दशरथ लाड यांनी सदर कारवाई केली व आलोसेसह खाजगी लेखापरीक्षक ताब्यात घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!