पोलिस व अधिकारी म्हणतात "अजून कुठे काही दिसत नाही ! "शिंदे गटाच्या गाड्या पद्धतीशीर राज्याबाहेर कशा गेल्या ? अजित पवारांनी सांगितला नेमका घटनाक्रम !
पोलिस व अधिकारी म्हणतात "अजून कुठे काही दिसत नाही !" शिंदे गटाच्या गाड्या पद्धतीशीर राज्याबाहेर कशा गेल्या ? अजित पवारांनी सांगितला नेमका घटनाक्रम ! मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून संपूर्ण महाराष्ट्रालाच धक्का दिला आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं शिवसेनेचे आमदार महाराष्ट्राबाहेर पडत होते, पण याची कुणालाच कल्पना नव्हती. शिंदे गटाच्या गाड्या राज्याबाहेर पडत असताना कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. हे सर्व कसं घडलं? याबाबत अद्याप संदिग्धता आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला आता जवळपास दहा महिने उलटली आहेत. या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. शिंदे गटाच्या गाड्या महाराष्ट्राबाहेर कशा गेल्या ? याचा नेमका घटनाक्रम अजित पवारांनी सांगितला. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, “एकनाथ शिंदे बंडखोरी करणार आहेत. याची कुणकुण आम्हाला लागली होती. या बाबी आम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या का