मन सुदृढ व आरोग्य चांगले रहाण्यासाठी एखादा छंद, कलेत मन गुंतवावे ! आयएमएच्या महिला विभागातर्फेरविवारी वारली चित्रशैली कार्यशाळा !

मन सुदृढ व आरोग्य चांगले रहाण्यासाठी एखादा छंद, कलेत मन गुंतवावे  !

आयएमएच्या महिला विभागातर्फे
रविवारी वारली चित्रशैली कार्यशाळा !

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801.

        नाशिक ( प्रतिनिधी )::- मन सुदृढ व आरोग्य चांगले रहाण्यासाठी एखादा छंद, कलेत मन गुंतवावे असा सल्ला डॉक्टर्स नेहमीच देतात. त्यासाठी प्रशिक्षण घेतले तर उत्तम 
कलानिर्मिती करता येते. स्वतः आनंद मिळवून तो इतरांपर्यंत पोहोचवता येतो. याच उद्देशाने इंडियन मेडिकल असोसिएशन ( आयएमए ) नाशिक शाखेच्या महिला विभागातर्फे जगप्रसिद्ध वारली चित्रशेैली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

    रविवार दि.३० एप्रिल रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ पर्यंत ही कार्यशाळा होईल.
आयएमए हॉल, शालिमार येथे होणाऱ्या या कार्यशाळेत १० वर्षांवरील मुलीमुली व सगळ्या वयोगटातील स्त्रीपुरुष  कलाप्रेमींना सशुल्क सहभागी होता येईल.

वरिष्ठ पत्रकार व वारली चित्रशैली अभ्यासक संजय देवधर मार्गदर्शन करणार आहेत. सहभागी सर्वांना आवश्यक साहित्य, मराठी - इंग्रजी नोट्स व सर्टिफिकेट देण्यात येईल. येतांना पेन्सिल, पाण्यासाठी बाउल, जुना रुमाल व पॅड आणावे. प्रवेशासाठी दि.२७ पर्यंत आयएमए कार्यालयात नावनोंदणी करावी. कार्यशाळेत जास्तीतजास्त सभासद व त्यांच्या कुटुंबियांनी सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ, सचिव डॉ.माधवी मुठाळ, प्रकल्प संयोजक डॉ. निकिता पाटील व समन्वयक डॉ. पूर्ती नेहते, डॉ. स्नेहल जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संजय देवधर ९४२२२७२७५५ व आयएमए च्या  २५०२७८७ क्रमांकावर संपर्क साधावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !