महिन्याभरापूर्वी विवाह झालेल्या राकेशचा दुर्देवी अपघात,,,,,,,,, परिसरात हळहळ..!

महिन्याभरापूर्वी विवाह झालेल्या राकेशचा दुर्देवी अपघात,,,,,,,,, परिसरात हळहळ..!

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 
महेश‌ शिरोरे

         खामखेडा (प्रतिनिधि)::- शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असलेल्या २३ वर्षीय युवा शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली दबून जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खामखेडा येथे घडली आहे. राकेश दिनेश धोंडगे अशी मृत झालेल्या युवा शेतकऱ्याचे नाव असून महिन्याभरापूर्वी त्याचा विवाह झाला होता या ह्रदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

     मूळचे निमगोले येथील असलेले धोंडगे कुटुंब पिळकोस शिवारात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. शनिवारी दि.२२ रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी रात्री ९ वाजता दिनेश धोंडगे यांचा मुलगा राकेश हा घरून ट्रॅक्टरवर शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असताना खामखेडा येथील शेवाळे वस्तीजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीमध्ये ट्रॅक्टर पलटी  झाल्याने त्यात तो दबला गेला. या अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दबलेल्या राकेशला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.अवघ्या महिन्याभरापूर्वीच राकेशचा विवाह झाला होता पण या दुर्दैवी अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात ऐन सणासुदीच्या दिवशी घटना घडल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
   याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे, पोलीस नाईक सागर पाटील, पोलीस शिपाई सुरेश कोरडे पुढील तपास करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!