लंडन पॅलेस बॅंक्वेट हॉलमध्ये सनातन वैदिक धर्मसभेतर्फे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन !Srimad Bhagwat story organized by Sanatan Vedic Dharma Sabha at London Palace Hall !

लंडन पॅलेस बॅंक्वेट हॉलमध्ये सनातन वैदिक धर्मसभेतर्फे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन !
Srimad Bhagwat story organized by Sanatan Vedic Dharma Sabha at London Palace Hall !
         नाशिक ( प्रतिनिधी ) : सनातन वैदिक धर्मसभा, नाशिक तर्फे पुरुषोत्तम अधिक मासात सर्व भागवत भक्तांना उत्तम फलप्राप्ती व्हावी, या उद्देशाने शनिवार दि. ५  ते १५ ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ४ ते ७ या दरम्यान श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेचे प्रमुख कथाकार विश्वविख्यात आचार्य महामण्डलेश्वर स्वामी विद्यानंद सरस्वती हे आहेत. तपोवनातील लंडन पॅलेस बॅक्वेट हॉलमध्ये हा सोहळा होणार आहे.   

           याप्रसंगी पत्रकार परिषदेत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी सांगितले की, धर्म शास्त्रानुसार प्रत्येक तीन संवत्सरांनंतर (तीन वर्षांनंतर)  पुरुषोत्तम मास येतो. या पुण्यप्रद महिन्यात जप, तपश्चर्या आणि दान केल्याने अनंत पुण्य प्राप्त होते. या महिन्यात श्री कृष्ण स्मरण , श्रीमद भागवत कथा श्रवण  तसेच श्रीराम कथा श्रवण याचे विशेष महत्त्व आहे. या महिन्यास लोकपरंपरेनुसार अधिकमास, पुरुषोत्तम मास असे संबोधले जाते, पुरुषोत्तम महिन्यात श्रीमद् भागवत कथा श्रवण केल्याने मोठी फलप्राप्ती होते. त्यामुळे भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा. दान, धर्म आणि उपासनेचे महत्त्व या महिन्यात अधिक मानले जाते. व्रत, दान-पूजा, यज्ञ-हवन आणि ध्यान केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला सहस्त्रपटींने पुण्यफळ मिळते, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. म्हणून सर्वांनी तन, मन, धनाने सहभागी व्हावे असे त्यांनी सांगितले.
      सर्व भक्तांना लाभ मिळण्याकामी अन्नदान स्वरुप, पोथी यजमान संकल्प, ब्रह्मसेवा, संतसेवा व इतर सेवा या उद्देशांने सहकार्य स्वरूप दान करावे असे आवाहन धर्मसभेचे अध्यक्ष यज्ञविद्यावाचस्पति भालचंद्रशास्त्री शौचे गुरुजी, धर्मसभेचे पदाधिकारी यांनी केले. आचार्य  महामण्डलेश्वर स्वामी विद्यानंद सरस्वती हे गुजरातच्या आदिवासी भागात (सद् गुरुधाम, बरुमाल, धरमपूर)  सदैव आदिवासी कल्याणार्थ कार्य करीत असतात.  आजपर्यंत स्वामीजींनी संपूर्ण भारतात नव्हे संपूर्ण जगामध्ये अनेक ठिकाणी विश्‍वकल्याणार्थ श्रीमद् भागवत कथेचे निरुपण केले आहे.
       या संताच्या अमृतवाणीतून श्रीमद् भागवत कथेचे श्रवण करणे हि एक पुरुषोत्तम मासातील अद्भूत पर्वणी नाशिककरांना मिळणार आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महंत सुधीरदास पुजारी, पुरोहित संघ अध्यक्ष सतीश शुक्ल,महंत भक्तिचरणदास महाराज, भागवताचार्य अतुलशास्त्री भगरे, यज्ञविद्यावाचस्पति भालचंद्रशास्त्री शौचे  (धर्मसभा अध्यक्ष), महंत पीठाधीश्वर अनिकेतशास्त्री देशपांडे ,महंत रामकृष्णदास लहवितकर, मकरंदशास्त्री गर्गे, वेदमूर्ती  हेमंतशास्त्री धर्माधिकारी, वेदमूर्ती प्रफुल्ल गायधनी गुरूजी, ऍड.भानुदास शौचे (धर्मसभा,उपाध्यक्ष), चंद्रशेखर क्षीरसागर (धर्मसभा सचिव), वेदोपासक अजित गर्गे (कोषाध्यक्ष) यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।