पाच हजारांची लाच स्वीकारताना महीला अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

पाच हजारांची लाच स्वीकारताना महीला अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

नासिक::- सिन्नर येथील  उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, सिन्नर येथील परीरक्षण भूमापक आलोसे प्रतिभा दत्तात्रय करंजे यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.

             तक्रारदार यांनी मनेगाव ता. सिन्नर येथे सिटी सर्वे नंबर १९७, १९८, १९९ असे तिन प्लॉट पत्नीचे नावे खरेदी केले होते. त्यावरील जुने मालकाचे नाव कमी करून तक्रारदार यांचे पत्नीचे नवीन नाव लावण्यासाठी तक्रारदार यांनी उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय सिन्नर येथे अर्ज केला होता. सदर नवीन नावाची नोंदणी व जुने नाव कमी करण्यासाठी आलोसे प्रतिभा करंजे यांनी रुपये ५०००/- लाचेची मागणी करून ती स्विकारली असता त्यांना त्यांचे कार्यालयात रंगेहात पकडण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
          सापळा अधिकारी, विश्वजीत जाधव पोलीस उप अधिक्षक, सहाय्यक सापळा अधिकारी परशुराम कांबळे, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पो. हवा. प्रकाश डोंगरे, पो हवा. संतोष गांगुर्डे, पो. हवा. प्रणय इंगळे, म पो. कॉन्स्टेबल श्रीमती शितल सूर्यवंशी यांनी  श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक, नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधीक्षक,  ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।