पोस्ट्स

अनोख्या जगव्यापी गणेशकाव्य उपक्रमाची घोषणा ! "मराठी साहित्य व कला सेवा" आणि "राष्ट्रकुट" यांचा उपक्रम ! मोफत नांव नोंदणी १८ सप्टेंबर २०२३ पर्यंत !!

इमेज
अनोख्या जगव्यापी गणेशकाव्य उपक्रमाची घोषणा ! "मराठी साहित्य व कला सेवा" आणि "राष्ट्रकुट" यांचा उपक्रम ! मोफत नांव नोंदणी १८ सप्टेंबर २०२३ पर्यंत !! गुरुदत्त वाकदेकर यांजकडून, न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक     मुंबई::- "मराठी साहित्य व कला सेवा" संस्था ४ मे २०१६ पासून कार्यरत आहे. अनेक साहित्यिक स्पर्धा, संमेलन आणि उपक्रम विनाशुल्क राबविले आहेत. त्यामधून अनेकांन‍ा अधिक सक्षमपणे लिहिण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ लाभले. संस्थेशी जोडलेल्या अनेकांची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्रभर होत असलेल्या साहित्यिक, सांस्कृतिक तसेच कला क्षेत्रातल्या कार्यक्रमांची माहिती सर्वदूर पोहचण्यासाठी ही संस्था आपलं निस्वार्थ योगदान देत आहे.       "राष्ट्रकुट" चांगले वाचन -- चांगली प्रेरणा. . . ह्या ब्रिदवाक्यासह समाजात सकारात्मक विचार पोहचणारं महाराष्ट्रातलं सुप्रसिद्ध मासिक तसेच युट्युब वाहिनी. मागील दोन वर्षांत जगभरातल्या विविध देशांमध्ये ज्यांचा वाचकवर्ग तशीच दर्शकसंख्या आहे. ज्यातून वैविध्यपूर्ण माहिती आणि विचारांचा झरा सातत्याने वाहत असतो. त्यामु

सहकाराचे चारित्र्य अबाधित ठेवणे नागरी सहकारी बँकांचे कर्तव्य-खा. सुरेश प्रभू

इमेज
सहकाराचे चारित्र्य अबाधित ठेवणे नागरी सहकारी बँकांचे कर्तव्य-खा. सुरेश प्रभू             नाशिक (प्रतिनिधी) : भविष्यात सहकार क्षेत्राला उज्वल दिशेकडे नेण्यासाठी सहकारातील मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करण्याची गरज असून सहकार क्षेत्राने सर्वस्पर्शी जाणिवेतून काम करण्यासाठी एकत्रित विचारातून विकासाच्या संकल्पना रूजवाव्यात. त्यासाठी काळाबरोबरच बदलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे तितकेच महत्वाचे आहे. तंत्रज्ञान, मार्केटिंग याबरोबरच सहकाराचे चारित्र्य अबाधित ठेवणे व संस्थेचा विकास यांचा समतोल राखणे संस्थेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व ठरेल. समाजाचा विकास करण्यासाठी ग्राहकांशी वैयक्तिक पातळीवर नाते जोडून बँकांनी ग्राहकाभिमुखता जपावी. सहकार ही उद्याच्या काळाची गरज आहे ती अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी आत्मपरिक्षण करण्याबरोबरच सहकारातील सात्विकता जपावी. सहकार हे उद्याच्या जगाचे प्रभावी माध्यम असेल असे प्रतिपादन माजी रेल्वे मंत्री, भारत सरकार तथा चेअरमन-न्यू ड्राफ्ट पॉलिसी (को-ऑप.), सहकार मंत्रालय, भारत सरकारचे खा. सुरेश प्रभू यांनी केले.               दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् अ

सृजनाच्या वाटा : परिचयाचा उत्कृष्ट नमुना !

इमेज
सृजनाच्या वाटा : परिचयाचा उत्कृष्ट नमुना !       महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक उद्धव भयवाळ यांची साहित्याच्या प्रांतात विनोदी कथासंग्रह, बालकथासंग्रह, काव्यसंग्रह, बालकविता संग्रह, एकांकिका लेखन, लावण्या, दिवाळी अंकात लेखन आणि हिंदी भाषेतील लेखन अशी यशस्वी घोडदौड सुरू असताना त्यांनी आता विविध लेखकांच्या पुस्तकांचे परिचयात्मक लेखांचा संग्रह प्रकाशित करणे अशी भरारी घेतली आहे. कारण नुकताच त्यांचा 'सृजनाच्या वाटा' हा परिचय आणि प्रस्तावनांचा लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे. शॉपिझेन डॉट इन या नामांकित प्रकाशन संस्थेने अत्यंत आकर्षक, देखण्या स्वरूपात तो संग्रह प्रकाशित केला आहे. मुखपृष्ठ, कागद, छपाई, अक्षरांचा आकार, इत्यादी बाबतीत अत्यंत सुस्वरूपात हा संग्रह वाचकांच्या भेटीला येत आहे, हा संग्रह हाती घेतल्याबरोबर वाचक या पुस्तकाच्या प्रेमात पडतील हे निश्चित !         अंतरंगात लेखकाची लेखणी वाचकांना खिळवून ठेवण्यासाठी समर्थ नि सशक्त आहे. या संग्रहात एकूण सव्वीस लेख आहेत. ज्यात अठरा लेख हे परीक्षणात्मक आहेत, सहा लेखांना भयवाळ ह्यांनी दिलेल्या प्रस्तावनांचा समावेश केला आहे आणि दोन पुस्तकांच

जिल्हास्तरीय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग या क्रीडा प्रकारात लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालयाचे निर्विवाद वर्चस्व !

इमेज
जिल्हास्तरीय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग या क्रीडा प्रकारात लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालयाचे निर्विवाद वर्चस्व !         नासिक::- मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे पार पडलेल्या बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग या क्रीडा प्रकारात सर्व वजनी गटात लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश प्राप्त केले. बेल्ट रेसलिंग मास रेसलिंग या क्रीडा प्रकारातील वजनी गटातील विजेते पुढील प्रमाणे  ४० कि. गटात प्रेम धुळे   ५० कि. गटात तेजस बोरसे ५५ कि. गटात विक्रम कुंदे ६० कि. गटात कृष्णा कुंभारकर ६५ कि. गटात ओम निकम ७० कि. गटात मकरंद कुमावत ७० कि. गटात प्रशिक जाधव +७० कि. गटात ऋषिकेश शिंदे ४० कि. गटात धर्मराज खोडे +५० कि. गटात यश निरभवणे तसेच महिला विजेत्या खेळाडू पुढीलप्रमाणे ३५ कि. गटात जयश्री गायकवाड ४० कि. गटात प्रतीक्षा गवळी ४० कि. गटात रक्षा कानडे ४५ कि. गटात फौजीया शेख ५० कि. गटात वेदश्री कुलकर्णी ५० कि. गटात ममता शिर्के  ५५ कि. गटात मैत्री अहीरे ५५ कि. गटात आदिती मते +५५ कि. गटात अक्षदा तालखे  हे सर्व खेळाडू विजयी झाले असून सर्वांची

दहीहंडीच्या आडून नेत्यांचा मतांचा जोगवा !

इमेज
दहीहंडीच्या आडून नेत्यांचा मतांचा जोगवा ! गुरुदत्त वाकदेकर यांजकडून, न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक,                            मुंबई::- मुंबई आणि ठाण्यातील राजकीय नेत्यांनी निवडणुकीपूर्वी तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी दहीहंडी या धार्मिक सणाचा व्यासपीठ म्हणून वापर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी विविध दहीहंडी स्थळांना भेटी देऊन पक्षाचा प्रचार आणि प्रसार असलेली भाषणे दिली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन केले होते.           निवडणुकीपूर्वी मतांचा जोगवा मागण्यासाठी गुरुवारी ‘दहीहंडी’ या धार्मिक उत्सवाचे राजकीय गर्दी जमवण्याच्या कार्यक्रमात रूपांतर झाले. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी आघाडीतील नेत्यांनी मुंबई आणि ठाणे लगतच्या दहीहंडी स्थळांचा राजकीय दौरा केला.          मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३१ मंडळांना भेटी दिल्या, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात मंडळांना भेट दिली आणि शिवसेना (उबाठा) आदित्य ठाकरे नऊ स्थळांवर पोहोचले.  कार्यक्रम स्थळांवरील भाषणे हा सत्त

अभिनव खानदेश राज्यस्तरीय प्रेरणादायी महिला पुरस्कार कौतुकास्पद - महापौर प्रतिभाताई चौधरी

इमेज
अभिनव खानदेश राज्यस्तरीय प्रेरणादायी महिला पुरस्कार कौतुकास्पद - महापौर प्रतिभाताई चौधरी        धुळे(प्रतिनिधी)::- शहरातील वृत्तपत्र साप्ताहिक अभिनव खान्देश  च्या दिवंगत उपसंपादिका नलिनीताई सुर्यवंशी यांच्या तृतीय स्मृतीप्रीत्यर्थ महाराष्ट्र राज्यातील कर्तबगार  गृहिणींना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मानसोहळा नुकताच धुळे येथे पार पडला.              कर्तबगार पुरूषामागे स्रिचा हात असतो, मात्र काही स्त्रिया याला अपवाद आहेत, ज्या आपला प्रपंच, नोकरी व्यवसाय सांभाळून समाजात विशेष अलौकिक कार्य करीत असतात म्हणून उपसंपादिका स्व. नलिनी सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा राज्यस्तरीय प्रेरणादायी महिला पुरस्कार खूपच कौतुकास्पद ! असे उद्गार महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघ धुळे येथील समारंभात पुरस्कार प्रदान करताना काढले.            तीन सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता राज्यातील ९ गुणवंत महिलांना या पुरस्कार सोहळ्यात गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी माजी आमदार शरद पाटील, ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर, माजी न्यायमूर्ती ॲडव्होकेट जे. टी. दे

कर्करोग पीडितांसाठी २१ लाखांची देणगी देण्याचा संकल्प ! नवरात्रीमध्ये सलग सहाव्यांदा 'दांडिया क्वीन' फाल्गुनी पाठक बोरीवलीत आपल्या लोकगीतांनी करणार रसिकांना मंत्रमुग्ध !!

इमेज
कर्करोग पीडितांसाठी २१ लाखांची देणगी देण्याचा संकल्प ! नवरात्रीमध्ये सलग सहाव्यांदा 'दांडिया क्वीन' फाल्गुनी पाठक बोरीवलीत आपल्या लोकगीतांनी करणार रसिकांना मंत्रमुग्ध !! गुरुदत्त वाकदेकर यांजकडून, न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक, 7387333801         मुंबई::- 'दांडिया क्वीन' या उपाधीने नावाजलेली फाल्गुनी पाठक बोरीवली येथे 'शो ग्लिट्झ इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट' द्वारे आयोजित नवरात्रोत्सवात सलग सहाव्यांदा सादरीकरण करणार आहे. लोकांच्या मागणीला मान देऊन फाल्गुनी पाठक पुन्हा एकदा गुजराती बहुल 'बोरीवली' परिसरात आपल्या आवाजाच्या जादूने गरबा-रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहे. फाल्गुनी पाठक २०१६ पासून बोरीवलीमध्ये नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम सादर करत आहे. बोरीवली येथील कै. प्रमोद महाजन मैदानामध्ये दांडिया क्वीनच्या नवरात्रीचे आयोजन करण्यात येणार आहे.          शो ग्लिट्झ इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटने बोरीवली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत फाल्गुनी पाठक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, "गेल्या वर्षी आम्ही गरबा प्रेमींसाठी एक नवीन गाणे सादर केले होते. या व

वर्ग ३ अधिकाऱ्यासह खाजगी इसम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
वर्ग ३ अधिकाऱ्यासह खाजगी इसम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !      नासिक::- आलोसे मंडळ अधिकारी वर्ग -३ पांडुरंग हांडू कोळी, सावरगाव ता. येवला व आरोपी खाजगी इसम विठोबा जयराम शिरसाठ, ठाणगांव ता. येवला या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.           तक्रारदार यांचे आईचे नांव लक्ष्मी मुक्ती या शासकीय योजने अंतर्गत वडीलांचे सातबारा उताऱ्यावर नांव लावण्यासाठी लोकसेवक पांडुरंग कोळी यांनी १५०००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती ९०००/- रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य करून लाचेची रक्कम त्यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम विठोबा जयराम शिरसाठ यांनी स्वीकारली असता त्यांना पंच साक्षीदारांचा समक्ष ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.              सापळा अधिकारी मीरा आदमाने, पोलिस निरीक्षक, सापळा पथक पो. ना. प्रवीण महाजन, पो.ना किरण अहिरराव, पो. ना. प्रमोद चव्हाणके चालक पो. ना. परशराम जाधव यांनी  श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी, अप्पर पोलिस अधिक्षक, नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.

अजित चव्हाण यांची बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजक पदी निवड !

इमेज
अजित चव्हाण यांची बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजक पदी निवड !        नासिक::- भारतीय जनता पक्षाचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांची बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजक पदी (प्रदेशाध्यक्ष) निवड करण्यात आली आहे. काल भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित चव्हाण यांना नियुक्तीचे पत्र देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते माधव भांडारी, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजित गोपछडे यावेळी उपस्थित होते. अनेक वर्ष आघाडीच्या वृत्तवाहिन्यांमधून वृत्त निवेदक, कार्यकारी संपादक राहिलेल्या पत्रकारिता क्षेत्रात दोन दशकाहुन अधिक काळ आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या अजित चव्हाण यांचा राज्यामधल्या विविध क्षेत्रातील प्रज्ञावंतांशी निकटचा संबंध असल्याने पक्षातील मानाच्या बुद्धिजीवी प्रकोष्ठाच्या प्रदेश संयोजक (प्रदेशाध्यक्ष) पदाची जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित चव्हाण यांचे अभिनंदन केले अस

जिल्हा परिषद सेस योजने अंतर्गत अनुदानित साहीत्य खरेदीसाठी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन !

इमेज
जिल्हा परिषद सेस योजने अंतर्गत अनुदानित साहीत्य खरेदीसाठी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन !        नासिक::- जिल्हा परिषद सेस योजना सन २०२३-२४ करीता ५० टक्के किंवा मर्यादित अनुदानावर ट्रैक्टर, रोटकेटर, कडबाकुट्टी यंत्र व विद्युत पंप संच या कृषि साहीत्यासाठी डिबोटी प्रणाली द्वारे शेतक-यांना पुरवठा करण्यासाठीची योजना जिल्हा परिषद कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता लाभार्थी शेतक-याने ७/१२ उतारा व खाते उतारा, विहीत नमुन्यातील अर्ज पंचायत समितीकडे सादर करावा तसेच अनुसुचीत जाती जमाती प्रबंगातील लाभार्थी असल्यास जात प्रमाणपत्राची प्रत सादर करणे आवश्यक आहे. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्वावर लाभ देण्यात येणार आहे.             जिल्हयातील शेतक-यांनी अनुदानावर साहीत्य खरेदीसाठी तालुकास्तरावर पंचायत समिती येथे कृषि अधिकारी/विस्तार अधिकारी (कृषि) यांचेकडे संपर्क करावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्याकरीता साहीत्य अनुदानाचे दर ट्रॅक्टर साठी अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती, अल्प व अत्यल्प भुधारक व महिला लाभार्थी