अजित चव्हाण यांची बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजक पदी निवड !

अजित चव्हाण यांची बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजक पदी निवड !

       नासिक::- भारतीय जनता पक्षाचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांची बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजक पदी (प्रदेशाध्यक्ष) निवड करण्यात आली आहे.

काल भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित चव्हाण यांना नियुक्तीचे पत्र देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते माधव भांडारी, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजित गोपछडे यावेळी उपस्थित होते. अनेक वर्ष आघाडीच्या वृत्तवाहिन्यांमधून वृत्त निवेदक, कार्यकारी संपादक राहिलेल्या पत्रकारिता क्षेत्रात दोन दशकाहुन अधिक काळ आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या अजित चव्हाण यांचा राज्यामधल्या विविध क्षेत्रातील प्रज्ञावंतांशी निकटचा संबंध असल्याने पक्षातील मानाच्या बुद्धिजीवी प्रकोष्ठाच्या प्रदेश संयोजक (प्रदेशाध्यक्ष) पदाची जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित चव्हाण यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रथमतःच अध्यक्षपदी खासदार, सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन, कार्याध्यक्षपदी के. के. अहिरे.

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

‘मविप्र’ च्या ठेवींचा आकडा सव्वाशे कोटींपर्यंत:- सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. मविप्र संस्थेची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत, १ हजार ८७ कोटींचे अंदाजपत्रक, वर्षभरात तीन हजार विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, मविप्र सुरु करणार वृद्धाश्रम !ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत मविप्र करणार करार !