वर्ग ३ अधिकाऱ्यासह खाजगी इसम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

वर्ग ३ अधिकाऱ्यासह खाजगी इसम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

     नासिक::- आलोसे मंडळ अधिकारी वर्ग -३ पांडुरंग हांडू कोळी, सावरगाव ता. येवला व आरोपी खाजगी इसम विठोबा जयराम शिरसाठ, ठाणगांव ता. येवला या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले. 

         तक्रारदार यांचे आईचे नांव लक्ष्मी मुक्ती या शासकीय योजने अंतर्गत वडीलांचे सातबारा उताऱ्यावर नांव लावण्यासाठी लोकसेवक पांडुरंग कोळी यांनी १५०००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती ९०००/- रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य करून लाचेची रक्कम त्यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम विठोबा जयराम शिरसाठ यांनी स्वीकारली असता त्यांना पंच साक्षीदारांचा समक्ष ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
             सापळा अधिकारी मीरा आदमाने, पोलिस निरीक्षक, सापळा पथक पो. ना. प्रवीण महाजन, पो.ना किरण अहिरराव, पो. ना. प्रमोद चव्हाणके चालक पो. ना. परशराम जाधव यांनी  श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी, अप्पर पोलिस अधिक्षक, नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !