जिल्हा परिषद सेस योजने अंतर्गत अनुदानित साहीत्य खरेदीसाठी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन !

जिल्हा परिषद सेस योजने अंतर्गत अनुदानित साहीत्य खरेदीसाठी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन !

       नासिक::- जिल्हा परिषद सेस योजना सन २०२३-२४ करीता ५० टक्के किंवा मर्यादित अनुदानावर ट्रैक्टर, रोटकेटर, कडबाकुट्टी यंत्र व विद्युत पंप संच या कृषि साहीत्यासाठी डिबोटी प्रणाली द्वारे शेतक-यांना पुरवठा करण्यासाठीची योजना जिल्हा परिषद कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता लाभार्थी शेतक-याने ७/१२ उतारा व खाते उतारा, विहीत नमुन्यातील अर्ज पंचायत समितीकडे सादर करावा तसेच अनुसुचीत जाती जमाती प्रबंगातील लाभार्थी असल्यास जात प्रमाणपत्राची प्रत सादर करणे आवश्यक आहे. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्वावर लाभ देण्यात येणार आहे.

            जिल्हयातील शेतक-यांनी अनुदानावर साहीत्य खरेदीसाठी तालुकास्तरावर पंचायत समिती येथे कृषि अधिकारी/विस्तार अधिकारी (कृषि) यांचेकडे संपर्क करावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्याकरीता साहीत्य अनुदानाचे दर ट्रॅक्टर साठी अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती, अल्प व अत्यल्प भुधारक व महिला लाभार्थी यांचेकरीता साहीत्य खरेदी किमतीच्या ५० टक्के किंवा रुपये १.२५ लाख त्या पैकी कमी असेल ते आणि इतर लाभार्थींना किमतीच्या ४० टक्के किंवा रुपये १ लाख यापैकी कमी असेल ते देय राहील, तसेच रोटेव्हेटर या ट्रॅक्टर चलीत औजारासाठी खरेदी किमतीच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त मर्यादा रुपये २८०००/-, कडबाकुट्टी यंत्रासाठी खरेदी किमतीच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त मर्यादा रुपये १६०००/-, व विद्युत पंपसंच (जलपरी ५ एचपी) खरेदी किमतीच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त मर्यादित रुपये ८०००/- अशी अनुदान मर्यादा आहे.
              या योजनांकरीता अर्ज हे दिनांक ०४/०९/२०२३ ते ०३/१०/२०२३ पर्यंत तालुकास्तरावर सर्व पंचायत समिती कार्यालयात स्विकारले जाणार आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!