व्हँलेंटाईन डे ऐवजी साजरा होणार AHA डे ! १४ फेब्रुवारी २०१९ ला AHA डे म्हणजे नेमके काय ? न्यूज मसालाच्या रसिकांसाठी दिनानाथजी यांचा खास व्रुत्तांत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! ५०००० वाचकांचा टप्पा पार करीत असतांना न्यूज मसाला कडून सर्वांचे आभार व सर्वांना विजयादशमी (दसरा) च्या सुवर्णमयी शुभेच्छा !!!!!

दीनानाथजी [ मनोरंजन  प्रतिनिधी ] 

सचिन पिळगांवकर दिग्दर्शित  ‘अशीही आशिकी’ च्या निमित्ताने नवीन वर्षात ‘व्हॅलेन्टाईन डे’ ऐवजी साजरा होणार ‘AHA’ डे !
        अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या ६०व्या वाढदिवसाला प्रेक्षकांसाठी एक खास भेट म्हणून त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली होती आणि खास सरप्राईज ठरलेला तो मराठी चित्रपट म्हणजेच  ‘अशी हीआशिकी’. चित्रपटाचे नाव जाणून घेतल्यावर या चित्रपटातील कलाकार कोण हे जाणून घेण्याविषयी प्रेक्षकांची कुतूहलता वाढली. चित्रपटाचे नावंच इतके यंग आणि हटके आहे की या चित्रपटासाठी कलाकारांची निवड पण तितकीच हटके असणार. तर ‘अशी हीआशिकी’ मध्ये  अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे युथफूल हिरोची भूमिका साकारणार आहे. आता अभिनयची हिरोईन कोण ? हे देखील प्रेक्षकांसाठी सुंदर सरप्राईज असेल. पण प्रेमाच्या महिन्यात अर्थात १४ फेब्रुवारीला प्रेमाचे नवे रंग, नवा अर्थ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतेय ‘अशी हीआशिकी’

‘        अशी ही आशिकी’ च्या निमित्ताने तब्बल पाच वर्षांनी सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे.दिग्दर्शनासह सचिन यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे, तसेच कथा-पटकथा-संवाद ही सचिन यांचेच आहेत. ‘अशी ही आशिकी’ चा प्रेमाचा रोमँटिक प्रवास प्रेक्षकांसाठी नक्कीच नवीन अनुभव ठरेल.
       गुलशन कुमार आणि भूषणकुमार प्रस्तुत, 'अशी ही आशिकी’चित्रपटाची निर्मिती' टी-सीरिज' आणि  'सिलेक्ट मिडिया'  यांनी केली असून सहनिर्मिती सुश्रिया चित्र यांनी केली आहे. वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मनोरंजनाचे माध्यम ठरलेली टी-सीरिज कंपनीने अनेक हिंदी सिनेमे आणि गाणी यांच्या मार्फत प्रेक्षकांची अभिरुची जाणून त्यांच्यासाठी नेहमीच मनोरंजक प्रोजेक्ट्सची निर्मिती केली आहे.
  सचिन पिळगांवकरांच्या दिग्दर्शनाच्या शैलीतून अजून सुंदररित्या खुलून दिसणार आणि प्रेमाची नव्याने उजळणी करणार  ‘अशी ही आशिकी’.

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्र्यांना महापुजेपासुन रोखण्यासाठी नासिकमधून हजारोच्या संख्येने तरूण पंढरपूरला जाणार-सकल मराठा समाज,नासिक !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

फ्युचर मेकर बद्दल वितरकांची कुठलीही तक्रार नाही-ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी , फ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक असुन लवकरच कंपनी आपले व्यवहार सुरू करणार-बापू ढोमसे, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!