कसं काय पाटील बरं हाय का ? पितृपक्ष संपला, आता कोण कुणाचे "कारणं" खाऊन "राज" करणार ! फड रंगतोय नासिकचा, आज कोलांटउड्या खाणारे कालचे खरे निष्ठावंत ! सविस्तर एक-दोन रिश्टर स्केल चे धक्के अर्थात किरकोळ भूकंपांबद्दल वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

कसं काय पाटील बरं हाय का !
निवडणुकीच्या  काळात  उमेदवारांच्या कोलांटउड्या या आता जनतेला नवीन राहिलेल्या नाहीत. पक्षनिष्ठा आणि भाऊंचे  नेतृत्व भाऊंना आणि कार्यकर्त्यांना कुठे घेऊन जाईन याबाबत अनेक चर्चा निवडणुकीच्या काळात झडत असतात. विधानसभा निवडणुकीत नाशिकच्या राजकीय पटलावरही अनेक भुकंप, इच्छूकांच्या कोलांटउड्या, कार्यक़र्त्यांशी सल्लामसलत  आणि सुरु झाल्या आहेत याचा परिणाम आपल्याला दिसेलच. उमेदवारी अर्ज दाखल करायला आज आणि उद्या अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे आता या दोन दिवसांत काय उलथापालक्ष घडते ते बघणे रंजक ठरणार आहे.
मनाला न पटणार्‍या आणि स्वप्नातील देखील विचार करता येणार नाही अशा खबरी निवडणुक काळात इच्छुकांच्या आणि विद्यमानांच्या बाबतीत येऊ लागल्याने काय सांगतो भाऊ ! खरंच की काय...? अशा शब्दांत चर्चा कार्यकर्त्यांमध्ये घडतांना दिसत आहे.
नाशिकचा विचार करता मध्य, पूर्व,पश्चिम विधानसभा क्षेत्राच्या मध्य आणि पश्चिमची उमदेवारी भाजपाकडून जाहीर झाल्याने येथील अनेक इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले. त्यामुळे त्यांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरल्याचे वृत्त आहे. बैंठकीत सल्लामसलती, कार्यक़र्त्यांशी चर्चा आणि पुढील  दिशा यावर चर्चा सुरु आहे.  पक्षनिष्ठेने केलेल्या कामाची पावती अशातर्‍हेने मिळाल्याने भ्रमनिरास झालेल्या इच्छुकांकडून कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढविता येईल याची चाचपणी सुरु झाली असल्याचे समजते.  मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश  यात्रेच्याप्रसंगी मध्यच्या आ. देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे फलक सर्वत्र लावुन मोठ्या प्रमाणावर पोस्टरबाजी केली होती. त्याचवेळी त्यांचे तिकीट फायनल असल्याचे बोलले जात होते. आ. सीमा हिरेंनी देखील महाजनादेश यात्रेत शेवटपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत राहून जनतेला अभिवादन केले. त्यांच्या कामाची पावती आणि जनतेचा आशिर्वाद म्हणूनच त्यांना तिकीट मिळणार हे जवळपास निश्चित झाले होते. आ. सीमा हिरे यांच्याबाबतीत अनेक चर्चाही झडत होत्या, त्यांना तिकीट मिळणार की नाही याबाबत शंका व्यक्त होत होती. त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे प्रबळ उमेदवार पश्चिमचा मतदासंघ शिवसेनेला सुटावा म्हणून प्रयत्नशील होते, महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांचे शिवेसेनेच्या या इच्छुकाने स्वागत केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र झाले गेले गंगेल मिळाले ! त्यातच खबर आली की, पश्चिममधुन शिवसेनेचे २१ उमेदवार बंडाळीच्या तयारीत असून त्यांनी काल शहरातील हॉटेल एक्सप्रेस इनमध्ये बैंठक घेऊन पश्चिममधुन उमेदवार देण्यासाठी शड्डु ठोकले आहे. यामुळे विद्यमान आ. सीमा हिरे यांची डोकेदुखी वाढणार हे नक्की.  विद्यमान आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे यांना भाजपाने तिकीट दिल्याने मध्य आणि पश्चिमचा प्रश्न मिटला. आता प्रश्न उरला तो पूर्वचा !
नाशिक पूर्वचा विचार करता विद्यमान आ. बाळासाहेब सानप हे देखील तिकीटासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र पूर्वमध्ये अनेक इच्छुक  असल्याने पूर्वच्या तिकीटवाटपाचे रहस्य अधिक गुढ बनले आहे. शहरात चर्चा आहे ती, भाजपाच्याच एका पदाधिकार्‍याची आणि पूर्वमधून डावलल्या गेलेल्या मनसे उमेदवाराची. हे दोघेही पूर्वमधून भाजपाच्या तिकीटासाठी प्रयत्न करत आहे. भाजपाने जाहीर केेलेल्या १२६ जणांच्या पहिल्या यादीत सानपांचे नाव नसल्याने इच्छुकांना जोर चढला आहे, हे स्वाभाविकपणे होणारच होते. उडती खबर अशी आहे की बाळासाहेब सानपांना तिकीट मिळावे म्हणून पूर्वचे ३२ नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत आहेत. यामुळे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यावरील दबाव वाढणार हे निश्चित.
मनसेचा पूर्वमधील प्रबळ उमेदवार डावलला गेल्याने  तो राष्ट्रवादी आणि आणि भाजपाच्या  उंबरठ्यावर चकरा मारत आहे. मंगळवार १ ऑक्टोबररोजी त्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी दिवसभर तळ ठोकला. तर पूर्वमधील अनेक इच्छुकांनी मुंबईत पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या निवासस्थानी शक्तीप्रदर्शनही केले.
तिकीट फायनल  झाल्यानंतर उमेदवार आणि कार्यकर्ते  यांच्या भाऊगर्दीत प्रत्येक पक्षाला अंतर्गत  विरोधाचा सामना करावा  लागणार हे नक्की.
दरम्यान मनसे फॅक्टर नाशकात  किती  चालतो आणि काय कमाल करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याअगोदर नाशिककरांनी राज ठाकरेंवर भरभरुन प्रेम केले हे सर्वज्ञात आहेच. मनसेने मध्य, पूर्व, पश्चिमचे उमेदवार जाहीर केले आहे. १ ऑक्टोबरला जाहीर केलेल्या २७ उमेदवारांच्या यादीत नाशिक मध्यमधून नितीन भोसले,  पूर्वमधून माजी महापौर अशोक मुर्तडक तर पश्चिममधून दिलीप दातीर यांना उमेदवारी दिल्याने त्यांचा प्रचाररथाने वेगाने दौडायला सुरुवात केली. मात्र मनसेचे प्रबळ इच्छुक उमेदवार ऍड. राहुल ढिकले यांचा पत्ता मनसेने पूर्वमधून कट केल्याने ते काय भुमिका घेतात हे महत्वाचे ठरणार आहे. त्यांना राजकीय वारसा असल्याने परिसरात त्यांचे प्राबल्य आहे. जिल्ह्यातील १५ जागा मनसे लढवित आहे.  त्यामुळे निवडणूकीत रंगत वाढणार हे नक्की.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !