पोस्ट्स

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !   नाशिक (साक्री-धुळे)::- तालुका कृषी अधिकारी मनसीराम तुळशीराम चौरे, तालुका कृषी कार्यालय साक्री व कंत्राटी डाटा ऑपरेटर रिजवान रफिक शेख यांना ७०००/- रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात घेण्यात आले.           तक्रारदार यांच्या नावे मौजे पन्हाळी पाडा, ता. साक्री, जि. धुळे येथे शेतजमीन असून सदर शेतजमिनीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जमा झालेल्या अनुदानाच्या रकमेच्या मोबदल्यात दोन्ही आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे १००००/-  रुपयांची मागणी केली केल्याची तक्रार आज १ सप्टेंबर रोजी दूरध्वनी द्वारे दिली होती. सदर माहितीवरून पोलीस निरीक्षक श्रीमती पद्मावती कलाल यांनी साक्री येथे जाऊन तक्रारदार यांची भेट घेऊन तक्रार नोंदवून घेऊन सदर तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता तक्रार यांच्याकडे १००००/- रुपये लाचेची मागणी केली होती, त्यानंतर सापळा कारवाईदरम्यान आलोसे एक व दोन यांनी तक्रारदार यांच्या...

डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)

इमेज
डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने ....  (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत) रसायनशास्त्राच्या अनेक शब्दांमध्ये अतिशय उत्तम शब्द आहेत.. त्यामध्ये उत्प्रेरक असा शब्द देखील आहे. प्रा. डॉ. कैलास कापडणीस सर यांची भूमिका नेहमीच विद्यार्थ्यांसाठी एक चांगला शिक्षक म्हणून कॅटलिस्ट सारखी राहिलेली आहे. समाजात काही विशिष्ट लोकांचा ओरा Aura काही वेगळाच असतो त्यामध्ये बागलाण तालुक्यातील द्याने येथील भूमिपुत्र असलेले प्रा. डॉ. कैलास कापडणीस सर येतात. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना जसं पावसात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आणि पेरते व्हा  असा सल्ला देणारा चातक पक्षी प्रमाणेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वप्रथम कमी वयात प्राध्यापक  म्हणून निवड झालेले प्रा. डॉ. कैलास कापडणीस सर हे नाव सर्वांना सुपरिचित आहे.  अभ्यास केंद्रित व्यक्तिमत्व असलेले प्रा. डॉ. कापडणीस सर यांचा नावलौकिक संपूर्ण विद्यापीठ आणि विद्यापीठ अंतर्गत असलेले नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये यांना सुपरिचित आहे. एख...

सहाय्यक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
सहाय्यक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !  नासिक (जळगाव)::- मनोज जगन्नाथ मोरे, सहायक अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, पाचोरा उपविभाग २,म.रा. वि. वि.,कार्यालय, जळगाव ( वर्ग २) यांस लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.         तक्रारदार यांचा सोलर फिटिंग चा व्यवसाय आहे. त्यांनी एकूण ३ प्रकरणे तयार करून ऑनलाईन द्वारे आलोसे यांच्या कार्यालयात सबमिट केले होते. सदर तीन ही प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून देण्यासाठी ३००० प्रमाणे एकूण ९००० व यापूर्वी एकूण २८ प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून दिली आहे त्याचा मोबदला म्हणून  लाच मागत असल्याने तक्रारदार यांनी काल लाप्रवी जळगाव येथे तक्रार दिली होती.  तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून काल व आज दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी अतिरिक्त कार्यकारी अभियंता म. रा. वि. वि. पाचोरा २ कार्यालय येथे पडताळणी दरम्यान आलोसे यांनी तीन प्रकरणांचे प्रत्येकी ३००० प्रमाणे रेग्युलर प्रमाणे ९००० ची मागणी केली तसेच यापूर्वी एकूण २८ प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढली आहे त्याचे तुम्ही वन टा...

विस्तार अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
विस्तार अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ! नासिक (धुळे)::- शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी दत्तात्रेय नांद्रे, पंचायत समिती धुळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.        तक्रारदार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदे, ता.जि. धुळे येथे प्रभारी मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहेत. दि.०७.०८.२०२५ रोजी आलोसे यांनी सदर शाळेस भेट दिली असता विद्यार्थ्यांची पट संख्या कमी असल्याने तक्रारदार यांचा वरिष्ठांना प्रतिकुल अहवाल सादर न करण्याच्या मोबदल्यात व शाळेस समग्र शिक्षा योजने अंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या मोबदल्यात स्वतः करीता व शिक्षण अधिकारी प्राथमिक श्रीमती कुवर यांचेकरीता १०,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी तक्रार दिली होती.    सदर तक्रारीची दि.११.०८.२०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता आलोसे यांनी स्वतःकरीता व शिक्षण अधिकारी श्रीमती कुवर यांचेकरीता १०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन स्विकारण्याचे मान्य केले होते.   त्यानंतर आज दि.१२.०८.२०२५ रोजी सापळा आयोजित केला असता सापळा कारवाई दरम्यान आल...

दोन लाखांची लाच स्वीकारताना उप अभियंता व कनिष्ठ अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
दोन लाखांची लाच स्वीकारताना उप अभियंता व कनिष्ठ अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ! नासिक::- जिल्हा परिषद अंतर्गत दिंडोरी पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता (वर्ग -१) योगेश नारायण घारे व कनिष्ठ अभियंता मनीष कमलाकर जाधव यांना काल २१६०००/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.          तक्रारदार  हे शासकीय कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी सावरपाडा, तालुका दिंडोरी येथे जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शिवार पाडा येथील यापूर्वी केलेल्या कामाचे बक्षीस स्वरूपात तसेच सध्याच्या प्रलंबित असलेले कामाचे बिल मंजूर करून देण्याचे मोबदल्यात लाच म्हणून २१६०००/- रुपये रकमेच्या लाचेची पंचा समक्ष आलोसे क्रमांक एक यांनी मागणी करून आलोसे क्रमांक दोन यांनी अनुक्रमांक एक यांचे  लाच मागणी व स्वीकारण्यास  प्रोत्साहन दिले आहे.     सदर लाचेची रक्कम  २१६०००/- रु. ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, दिंडोरी पंचायत समिती दिंडोरी कार्यालयात स्वीकारताना आलोसे क्रमांक एक यांना काल दि. ८ऑगस्ट २०२५ रो...

सर्पदंशाने होणारे मृत्यू टाळण्यासाठी विशेष प्रशिक्षण शाळेचे आयोजन

इमेज
सर्पदंशाने होणारे मृत्यू टाळण्यासाठी विशेष प्रशिक्षण शाळेचे आयोजन                                                                                                                  नाशिक (जिमाका वृत्तसेवा)::- सर्पदंशामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे, योग्य निदान आणि तातडीचे वैद्यकीय उपचार याबाबतची माहिती आरोग्य कर्मचारी यांना असणे आवश्यक आहे. यासाठी ICMR-NIRRCH मुंबई, ग्रामीण आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र वणी, उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिक व आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने   वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी १८ व १९ जुलै २०२५ रोजी रावसाहेब थोरात सभागृह, जिल्हा परिषद, नाशिक येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहि...

घरकुलाचा हप्ता मिळण्यासाठी स्विकारली लाच !ग्रामसेवकासह रोजगार सेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
घरकुलाचा हप्ता मिळण्यासाठी स्विकारली लाच ! ग्रामसेवकासह रोजगार सेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !           नासिक (जळगाव)::- तक्रारदाराकडून २३/०६/२०२५ रोजी आलेल्या तक्रारीची पंचांसमक्ष  पडताळणी केली असता मंजूर असलेल्या घरकुलाचा दुसऱ्या हप्ता  मिळावा व गट नंबर नमुना आठ मिळावा यासाठी सहा  हजाराची मागणी केली आहे.      रोजी तक्रारदार यांच्याकडून मांडकी आणि अंतुरली बुद्रुक तालुका भडगाव जिल्हा जळगाव येथील लोकसेवक ग्रामसेवक सोनिराम धनराज शिरसाठ  व मांडकी ता. भडगाव जि. जळगाव येथील रोजगार सेवक जितेंद्र लक्ष्मण चौधरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.  ६०००/- रुपयांची मागणी करून तडजोड अंती ५०००/- रुपये पंचा समक्ष ५०००/-रुपये स्वीकारताना रंगेहात मिळून आले आहेत.         यातील तक्रारदार यांच्या मंजूर असलेल्या घरकुलाच्या दुसरा हप्ता मिळावा व गट नंबर नमुना आठ मिळावा यासाठी सहा हजाराची मागणी केलेली होती व आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडून सहा हजार रुपयांची लाचेची मागणी करीत असल्याब...

जास्त भावाने बियाणे विक्री केल्यास प्रशासनाची विक्रेत्यांवर कारवाईची तयारी !

इमेज
जास्त भावाने बियाणे विक्री केल्यास प्रशासनाची विक्रेत्यांवर कारवाईची तयारी ! नासिक::- जिल्ह्यात खरीप हंगामास नुकतीच सुरुवात झाली असून शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात बियाण्याची खरेदी करण्यात येत आहे. यासाठी प्रशासनाने सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की, बियाणे खरेदी करत असताना विक्रेत्याकडून पक्क्या बिलाची मागणी करावी व त्या बिलाप्रमाणेच रक्कम अदा करावी. सदर बिल पावती जपून ठेवावी. जो विक्रेता बियाणे एमआरपी पेक्षा जास्त किंमतीत विक्री करत असेल, तसेच पक्के बिल देत नसेल त्याची तक्रार तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी, पंचायत समिती तसेच जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय नाशिक, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद, नाशिक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे किंवा तक्रार निवारण कक्ष व्हाट्सअप क्रमांक ७८२१०३२४०८ यावर संदेश पाठवावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद यांनी केले आहे.          नाशिक जिल्ह्यातील सर्व बियाणे विक्रेते यांना आवाहन करण्यात आले आहे की कोणीही बियाणे निर्धारित एमआरपी पेक्षा जास्त दरात वि...

गटविकास अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
गटविकास अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !     नासिक (अहिल्या नगर)::- तक्रारदार हे सेवानिवृत्त ग्रामसेवक असून त्यांच्यावर गटविकास अधिकारी (वर्ग -१) सुधाकर श्रीरंग मुंडे, पंचायत समिती राहुरी, अहिल्यानगर, यांच्या अहवालावरून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अहिल्यानगर यांनी निलंबनाची कारवाई केली होती, त्यानंतर तक्रारदार हे सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे वरील दोषारोप पत्राचा अहवाल गट विकास अधिकारी यांनी पाठवायचा होता तो अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने पाठविण्याकरिता आलोसे यांनी १००००/- रुपये लाचेची स्वतः मागणी करून स्वतः तक्रारदार यांच्याकडून लाच रक्कम स्वीकारलेली आहे.         या संदर्भात तोफखाना  पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

दाखला देण्याकरिता लाच स्वीकारताना अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
दाखला देण्याकरिता लाच स्वीकारताना अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ! नासिक(धुळे)::- तक्रारदार यांच्या वडिलांच्या नांवे मौजे सोंडले, ता. जि. धुळे येथील शेतजमीन सुलवाडे जामफळ प्रकल्पात संपादित केल्याने तक्रारदार यांनी प्रकल्पग्रस्त दाखला मिळणेकरिता उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) धुळे यांचेकडे २८ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्ज केला होता. सदरचा अर्ज चौकशीकरिता तहसीलदार शिंदखेडा यांच्यामार्फतीने आलोसे छोटू पाटील, मंडळ अधिकारी भाग तामथरे ता.शिंदखेडा यांचेकडे देण्यात आला होता. तक्रारदार यांनी १८ जून रोजी आलोसे यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांचा अर्जाच्या चौकशीचा अहवाल तहसीलदार शिंदखेडा यांच्याकडे पाठविण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती २०००/-रु.लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. सदर तक्रारीची १९ जून रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती २०००/-रु लाचेची मागणी करून आज दि. २०जून रोजी आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडून २०००/-रु लाचेची रक्कम स्विकारल्याने त्यांना पंचासमक्ष रंगेहात प...