भगवान श्री चक्रधर स्वामी जयंती उत्सवाचे ४ व ५ सप्टेंबर रोजी आयोजन...!

भगवान श्री चक्रधर स्वामी जयंती उत्सवाचे ४ व ५ सप्टेंबर रोजी म्हाळसाकोरे येथे आयोजन...!

       नाशिक ( प्रतिनिधी )::-  अखिल भारतीय महानुभाव परिषद पुरस्कृत नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान श्री चक्रधर स्वामी जयंती उत्सव सोहळा दि. ४ व ५ सप्टेंबर रोजी म्हाळसाकोरे (ता. निफाड ) येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच याच दरम्यान श्री दत्त मंदिर हिवरगाव येथील दत्त मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे. 

             भगवान श्री चक्रधर स्वामी जयंती उत्सव यावर्षीपासून शासकीय स्तरावर देखील साजरा करण्यात येणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक (जीआर ) महाराष्ट्र शासनाने सर्व सरकारी कार्यालयांना जारी केला आहे. त्याचप्रमाणे भगवान श्री चक्रधर स्वामी (अवतार दिन ) जयंती उत्सव दि. ४ व ५  रोजी जय शिवशंकर गार्डन रिसॉर्ट (सिन्नर रोड ) म्हाळसाकोरे येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 
      बुधवार दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय विद्यालयीन व महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धा होणार असून दुपारी ३ वाजता म्हाळसाकोरे गावातून  मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री महंत अचलपूरकर बाबा यांचे कीर्तन तसेच भजन व भक्तीगीत गायन कार्यक्रम होणार आहे.

     गुरुवार दि. ५ सप्टेंबर रोजी पहाटे देवास मंगल स्नान, श्रीमद्भगवद्गीता पाठ पारायण व नामस्मरण, सकाळी ९ वाजता श्री दत्त मंदिर उद्घाटन , कलशारोहण मूर्ती स्थापना सोहळा हिवरगाव (सिन्नर रोड ) येथे होणार आहे. त्यानंतर धर्मसभा स्थळी ध्वजारोहण आचार्य प्रवर महंत नागराजबाबा (महानुभाव आश्रम छत्रपती संभाजीनगर ) यांच्या हस्ते होणार असून सकाळी १० वाजता धर्मसभा आयोजित करण्यात आली आहे. सभाध्यक्ष म्हणून आचार्य प्रवर महंत राहेरकर बाबा (तरडगाव जि. सातारा ), आचार्य प्रवर महंत सुकेणेकर बाबा शास्त्री हे उपस्थित राहणार आहेत. तर व्याख्यान सत्रात आचार्य प्रवर महंत सातारकर बाबा बिडकर, चिंतनी प्रमुख सुदाम राज शास्त्री कोठी ( जालना ) हे प्रमुख व्याख्याते उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार मुकुंद बाविस्कर लिखित 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज' या पुस्तकाचे प्रकाशन संत - महंत व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.     
       या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, खासदार भास्करराव भगरे, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार दिलीप बनकर, आमदार माणिकराव कोकाटे माजी आमदार अनिल कदम, बाळासाहेब क्षिरसागर, शितल सांगळे, सुरेश कमानकर, दिंगबर गिते, गणेश गिते, शहाजी राजोळे, प्रकाश ननावरे, दत्ता गायकवाड, प्रकाश घुगे, राजेंद्र जायभावे, डॉ. किरण देशमुख, दत्तात्रय आव्हाड आदी उपस्थित राहणार आहेत.
     या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन अर्जुनराज आप्पा सुकेणेकर, बाळकृष्ण नाना सुकेणेकर, गोपीराज शास्त्री सुकेणेकर, गोविंदराज बाबा अंकुळनेरकर, राजधरदादा सुकेणेकर व प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांच्यासह संत महंतांनी केले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !