,,,,,,, सावधान, नाशिकमधील किटल्या गरम होऊ लागल्या आहेत !
"माझा अनुभव आहे की मंत्र्यांना अडचणीत बायको किंवा मेव्हणा नाहीतर चहापेक्षा किटली गरम असलेले खाजगी सचिव अडचणीत आणतात - "दिलखुलास" नितीन गडकरी (२६ मार्च २०२२)
,,,,,,, सावधान, नाशिकमधील किटल्या गरम होऊ लागल्या आहेत !
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असताना नाशिक जिल्ह्यातील अनेक आमदार, खासदार, नावाजलेले राजकीय पदाधिकारी यांना काहीही सोयरसुतक नसल्यासारखे चित्र निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. मात्र निवडणुकांपूर्वी सर्वात मोठा सण दिपवाळीचा जवळच आलेला असताना विविध माध्यमांतून प्रसिद्धी करण्याची संधी दवडली जात आहे. यांत सर्वच राजकारण्यांची मनोवृत्ती अशी असेलच यात दुमत असू शकते, काही याबाबत खूप जागरूकतेने कार्य करणारेही आहेत. सर्वच नव्हे पण त्यांचे चेले चपाटे ही काही कमी नाहीत, या "किटल्या" कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी आस्थापना, मोठमोठ्या खाजगी आस्थापना यांच्या कार्यालयात "खेट्या" का मारतात हा आता संशोधनाचा विषय उरलेला नाही, जे चालले आहे त्यातून सारं काही जनताजनार्धन उघड्या डोळ्यांनी पहात आहे. या "किटल्यांचा" प्रशासनावर, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावरील वाढता "दबाव" ही चिंतेची बाब आहे, खाजगीत बोलताना अनेक अधिकारी कर्मचारी यांच्या विषयी नाराजीचा सूर आळवताना दिसतात, आता याच "किटल्यांच्या" आर्थिक भरभराटीचा आलेख तपासण्याची वेळ आली आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नाशिकला दत्तक घेतलेल्या शहरातील ऐतिहासिक न्यायालयाची वास्तू उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीचे कारण देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नासिकला येण्याच्या टाळले, असा आरोप होत असून यावर शहरातील वाढती गुन्हेगारी, झालेले खून आणि मातब्बर माजी नगरसेवकांना पोलीसांकडून ताब्यात घेण्यात आले, त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटनांबद्दल प्रश्नांची सरबत्ती झाल्यावर त्यांना उत्तरे देणे भाग होते, याचमुळे त्यांनी नासिकला येण्याची तसदी घेतली नाही असेही बोलले जात आहे. मात्र फडणवीस हे आजच्या घडीला महाराष्ट्रातील एक चाणाक्ष, अभ्यासू आणि विकासात्मक दृष्टीचे नेते म्हणून गणले जातात, त्यांनी नासिकला न येता ही भले मोठे राजकारण केले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही माजी नगरसेवकांसाठी पोलिसांनी जर त्यांना गुन्हेगार ठरवले असेल किंवा त्यांचा सहभाग सिद्ध होऊ शकतो तर भाजपा अशांच्या पाठीशी असल्याचा "भास" निर्माण होण्याची वाट तरी का पहावी, कारण थोड्याच दिवसात होणाऱ्या निवडणुकीत त्याचा परिणाम व्हायला नको म्हणून टाळले असेच दिसते.
"किटल्यांबाबत" असं उघड बोलणं आजकाल जीवावर बेतायला लागले आहे असे चित्र बीडपासून संपूर्ण राज्यभरात पहायला मिळत आहे. "किटल्या" तर स्वतःला "सचिन तेंडुलकर" समजतात, कुणी "शिवा" चे अवतार, तर कुणी माझाच "अंकुश" असून प्रवासाचे अपडेट देत "फिरत" असतात, "विकासाला" भुजां मध्ये बळ लागतं, सर्वांसाठी "शुभम" च्या सदीच्छा सतत असतात म्हणून त्या दाखवत फिरणे जमतच नाही, कुणी आपलं "वैभव" दाखवत असतात, काही तर साहेबांचं काळोखातील "प्रतिक", भारतीयांचे "रुपक", तर कुणी महाराष्ट्रातील राजकीय "जाणत्या राजाचे" नाम साधर्म्याने बहुपरीचीत "बहुआयामी" आहेत मात्र कधीकाळी शेजाऱ्यांनी केलेल्या भरीव सहकार्याचा विसर पडू नये. अशा लहान मोठ्या अनेक किटल्यांची जंत्री भविष्यात राजकारण्यांना डोईजड ठरू नये इतकंच,,,,,,,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा