पोस्ट्स

एप्रिल, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आश्रम शाळा मुख्याध्यापक रक्कम टाकून पळून गेले !

इमेज
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आश्रम शाळा मुख्याध्यापक रक्कम टाकून पळून गेले ! नाशिक::- ततानी ता. बागलाण जि. नाशिक येथील शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यापक जितेंद्र खंडेराव सोनवणे यांस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत ताब्यात घेत असताना कार्यालयाच्या दुसऱ्या दरवाज्यातून पळून गेले.         तक्रारदार हे रोजंदारी शिक्षक असून त्यांचा घरघंटी असून धान्य दळून देण्याचं काम करतात. आश्रमशाळेला धान्य दळून दिल्याच्या कामाचे ८७८४०/- बॅंक खात्यावर जमा केल्याचे मोबदल्यात बक्षीस म्हणून ८०००/-  रुपये व  मार्च-२५, एप्रिल-२५ या महिन्याच्या दळण्याचे बिल मंजूर करून देण्यासाठी १३००/- रुपये अशी एकूण ९३००/- रुपये लाचेची मागणी करुन ८०००/- रुपये स्वीकारण्याची तयारी पंच नंबर १ यांचे उपस्थितीत केली. सदरची ८०००/- रुपये रक्कम यांनी त्यांचे कार्यालयात तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली व लाचेची रक्कम मोजत असताना काहीतरी संशयाने त्यांनी लाचेची रक्कम टेबलवर ठेवून तक्रारदारही कार्यालयाचे बाहेर येऊन इशारा करण्यासाठी येत असताना सोनवणे यांनी कार्यालयाच्या बाहेरच्या दुसऱ्या घटने पळून ग...

वर्ग एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
वर्ग एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ! नासिक ::- विसरवाडी ता. नवापूर, जि. नंदुरबार येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुवैद्यकीय अधिकारी (श्रेणी-१, वर्ग-१) आलोसे हर्षल गोपाळ पाटील लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.         तक्रारदार यांची गाय मयत झाली होती, मयत गाईचा विमा असल्याने शव विच्छेदन करणे गरजेचे होते, तक्रारदार यांच्या गाईचे शवविच्छेदन पोस्टमार्टम करून देण्याच्या मोबदल्यात आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडून शासकीय फीचे १५०/- रुपये गुगल पे द्वारे घेतले, यानंतर आलोसे यांनी तक्रारदाराकडून ४००/- रुपये लाचेची पंचांसमक्ष मागणी केली व तडजोडी अंति ३००/- रुपये लाच मागणी करून आज दि. १५ एप्रिल २०२५ रोजी गुगल पे द्वारे सदर लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. याबाबत विसरवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शेतकऱ्याची लेक झाली न्यायाधीश..!

इमेज
शेतकऱ्याची लेक झाली न्यायाधीश..! मविप्र विधी महाविद्यालयातील शिवानी फडोळचे यश नाशिक :  एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कु. शिवानी रामनाथ फडोळ या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीने कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर दिवाणी न्यायाधीश परीक्षेत गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक पटकावला आहे. याबद्दल मविप्र पदाधिकारी, संचालक मंडळ, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य, सर्व शिक्षणाधिकारी आणि शिक्षकांनी शिवानीचे कौतुक केले आहे.             महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सन २०२२ च्या दिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकची कु. शिवानी रामनाथ फडोळ हिने गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक मिळविला आहे. शिवानीने मविप्रच्या मखमलाबाद येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातून शालेय शिक्षण घेतले असून, मविप्रच्याच विधी महाविद्यालयातून सन २०१६-२०२१ या दरम्यान शिक्षण घेतले आहे. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील लेकीने मिळविलेले हे देदीप्यमान यश असून निकालाबाबत सर्वांनी आनंद व्यक...

जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
जिल्हा आरोग्य अधिकारी  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !                 प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठीच्या प्रस्तावासाठी ३००००/- रुपयांची लाच मागणी करण्यात आली. तक्रारदार जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा परिषद जळगाव येथे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांची सेवांतर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पालघर येथे प्रतिनियुक्ती झालेली आहे. त्यांना प्रतिनियुक्तीचे ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठीचा प्रस्ताव डॉ. सचिन भायकर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांना सादर करण्यासाठी आलोसे डॉ. जयवंत जुलाल मोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव, यांनी डॉ. सचिन भायकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, यांचे नावे ३००००/- रुपयांची लाच मागणी केलेबाबत तक्रारदार यांनी काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. सदर तक्रारीची पडताळणी केली असता तीस हजार रुपयांची लाच मागणी करून तडजोडी यांनी तक्रारदार यांच्याकडून १५०००/- रुपये लाच रक्कम आलोसे मोरे यांनी स्वतः स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल कर...