जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

जिल्हा आरोग्य अधिकारी  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
        
       प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठीच्या प्रस्तावासाठी ३००००/- रुपयांची लाच मागणी करण्यात आली. तक्रारदार जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा परिषद जळगाव येथे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांची सेवांतर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पालघर येथे प्रतिनियुक्ती झालेली आहे. त्यांना प्रतिनियुक्तीचे ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठीचा प्रस्ताव डॉ. सचिन भायकर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांना सादर करण्यासाठी आलोसे डॉ. जयवंत जुलाल मोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव, यांनी डॉ. सचिन भायकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, यांचे नावे ३००००/- रुपयांची लाच मागणी केलेबाबत तक्रारदार यांनी काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. सदर तक्रारीची पडताळणी केली असता तीस हजार रुपयांची लाच मागणी करून तडजोडी यांनी तक्रारदार यांच्याकडून १५०००/- रुपये लाच रक्कम आलोसे मोरे यांनी स्वतः स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल, मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड !

डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)