वर्ग एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

वर्ग एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

नासिक::- विसरवाडी ता. नवापूर, जि. नंदुरबार येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुवैद्यकीय अधिकारी (श्रेणी-१, वर्ग-१) आलोसे हर्षल गोपाळ पाटील लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.

        तक्रारदार यांची गाय मयत झाली होती, मयत गाईचा विमा असल्याने शव विच्छेदन करणे गरजेचे होते, तक्रारदार यांच्या गाईचे शवविच्छेदन पोस्टमार्टम करून देण्याच्या मोबदल्यात आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडून शासकीय फीचे १५०/- रुपये गुगल पे द्वारे घेतले, यानंतर आलोसे यांनी तक्रारदाराकडून ४००/- रुपये लाचेची पंचांसमक्ष मागणी केली व तडजोडी अंति ३००/- रुपये लाच मागणी करून आज दि. १५ एप्रिल २०२५ रोजी गुगल पे द्वारे सदर लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. याबाबत विसरवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रक्तातही भ्रष्टाचार? कथित बनावट ब्लड प्लाझ्मा रॅकेट उघडकीस आल्याच्या वृत्ताने संपूर्ण देशातील रक्तदाते, रुग्ण, डॉक्टर आणि समाजमन हादरले !

आवाहन - बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत.स्थापन केलेल्या काम वाटप समितीच्या माध्यमातून १० लाखांपर्यंतची कामे विना निविदा देण्यात येणार !

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा १५वा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२६,