उल्लेखनीय::- सगळीकडे उन्हाची तीव्रता जाणवत असतानाही तालुक्यात आजपर्यंत एकही टँकर चालू नाही, तालुक्यात कुठल्याही ग्रामपंचायतचा पिण्याच्या पाण्याच्या टँकरसाठी प्रस्ताव आलेला नाही.

उल्लेखनीय::- सगळीकडे उन्हाची तीव्रता जाणवत असतानाही तालुक्यात आजपर्यंत एकही टँकर चालू नाही, तालुक्यात कुठल्याही ग्रामपंचायतचा पिण्याच्या पाण्याच्या टँकरसाठी प्रस्ताव आलेला नाही.

निफाड तालुक्यासाठी एकूण ९५ योजना मंजूर, त्यापैकी ९० योजनांचा पाणीपुरवठा सुरू, अपूर्ण ५  योजना पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू


       निफाड::- शासकीय विभागाच्या वतीने गाव पातळीवरची विकास कामे करताना अधिकाऱ्यांनी जर तळमळीने, प्रामाणिकपणे लक्ष देऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर या योजनांना नक्कीच यश येते, या तत्वाने प्रशासनाच्या वतीने  प्रयत्न केल्यामुळे निफाड तालुक्यात जलजीवन मिशनच्या  मंजूर ९५ कामापैकी जवळजवळ ९० योजना सुरू झालेल्या आहेत अशी माहिती गटविकास अधिकारी, पंचायत समिती निफाड, यांच्याकडून देण्यात आली. पाच गावांमध्ये जलस्रोत कोरडा जाणे किंवा पाणी क्षारयुक्त  लागणे, जलस्रोताचे  ठिकाण बदलणे, जागेची राहिलेली मोजणी अशा तांत्रिक कारणांमुळे अपूर्ण आहेत त्याही लवकरच पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत .  
   जलजीवन मिशन ही योजना संपूर्ण जिल्ह्यात मंजूर करण्यात आली होती. निफाड या योजनेद्वारे द्वारे ९० गावात पाणीपुरवठा ही सुरू करण्यात आला आहे.

    पूर्वी नळ जोडणीद्वारे प्रतिदिन प्रति माणसी ४० लिटर शाश्वत पाणीपुरवठा करावा लागत असे, काळानुरूप पाणी वापर वाढल्यानेसन २०२१-२२ मध्ये जलजीवन मिशन योजना सुरू करण्यात आली. या योजनेत प्रतिदिन, प्रति माणसी 
५५ लिटर शाश्वत पाणी पुरवण्यात येत आहे. निफाड तालुक्यात ९५ कामे मंजूर झाल्यानंतर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जागेची उपलब्धता आणि  ग्रामपंचायतचे सहकार्य यामुळे ९० गावांमध्ये या योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू झालेला आहे. तर यातील ५६ पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. उर्वरित ज्या पाच गावांमध्ये ही योजना अपूर्ण आहे त्यातील काही गाव पातळीवर, तांत्रिक अडचणीमुळे योजना अपूर्ण असून यातील त्रुटी दूर झाल्यानंतर या योजना लवकरच सुरू होणार आहेत. यातील कानळद गावाला या योजनेसाठी  ग्रामपंचायतीची जी जागा देण्यात येणार आहे त्या जागेची मोजणी भूमी अभिलेख मार्फत करायची आहे, या जागेचे सीमांकन झाल्यानंतर योजनेचे काम सुरू करण्यात येणार आहे.

     उगाव ग्रामपंचायतीला योजना मंजूर झाली परंतु पाण्याचा जलस्रोत आहे तो कोरडा निघाल्याने या ग्रामपंचायतीने दुसरी जागा शोधण्याचा प्रयत्न केला व उगावं पासून ४ किलोमीटर अंतर असलेल्या निफाड येथे नदीकिनारी पाण्याच्या  जलस्रोतासाठी जागा उपलब्ध झाली असून या योजनेचा सुधारित योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. तालुक्यातील तामसवाडी येथील पाण्याच्या जलस्रोताचे पाणी क्षारयुक्त लागल्याने ते पिण्यायोग्य नव्हते, या गावातील पाण्याचा जलस्रोत बदलला असून या योजनेचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असून या योजनेचे  काम ८०% प्रगतीपथावर आहे, तालुक्यातील रेडगाव येथे मूळ जलस्रोताला पाणी कमी असल्याने पुन्हा नवीन जलस्रोतासाठी सुधारित प्रस्ताव पाठवण्यात आला होता, तो मंजूर झालेला आहे, त्यानुसार नवीन जलस्रोत घेतला असून येथील काम ६०% प्रगतीपथावर आहे. सोनेवाडी (खुर्द) येथे काम प्रगतीत होते मात्र तेथील विहिरीच्या जागेचा वाद असल्याने काम बंद आहे, त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी गटविकास अधिकारी आणि संबंधित अधिकारी, पदाधिकारी यांच्या समावेत बैठक घेण्यात येऊन लवकरच हा प्रश्न कसा सुटेल यासाठी प्रयत्न 
करण्यात येत आहे.

           निफाड तालुक्यात जलजीवन मिशन योजना राबवण्यासाठी ग्रामपंचायतीने उपलब्ध जागा उपलब्ध करून दिल्या तसेच सदर  ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रा. प. सदस्य, अधिकारी यांचे सहकार्य मिळाले, पंचायत समिती अधिकारी, प्रशासन यांनी केलेले नियोजन यामुळे ९५ पैकी ९० योजनांचे पाणीपुरवठा सुरू करण्यात यश आले, उर्वरित ५ गावातील योजनांचे काम  लवकरच पूर्ण होईल.
तुकाराम  जाधव -गटविकास अधिकारी, पंचायत समिती, निफाड )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते, बियाणे व किटकनाशके पुरवावी- सुनिल बोरकर, गुण नियंत्रण संचालक, कृषी आयुक्तालय.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आश्रम शाळा मुख्याध्यापक रक्कम टाकून पळून गेले !

भारताच्या ‘जीडीपी’ मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲंन्ड एन्टरटेन्मेंट समिट - २०२५ (वेव्हज) चे प्रधानमंत्री यांच्या हस्ते शानदार उद्घाटन