सर्पदंशाने होणारे मृत्यू टाळण्यासाठी विशेष प्रशिक्षण शाळेचे आयोजन

सर्पदंशाने होणारे मृत्यू टाळण्यासाठी विशेष प्रशिक्षण शाळेचे आयोजन
                                                                                                       
         नाशिक (जिमाका वृत्तसेवा)::- सर्पदंशामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे, योग्य निदान आणि तातडीचे वैद्यकीय उपचार याबाबतची माहिती आरोग्य कर्मचारी यांना असणे आवश्यक आहे. यासाठी ICMR-NIRRCH मुंबई, ग्रामीण आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र वणी, उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिक व आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने   वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी १८ व १९ जुलै २०२५ रोजी रावसाहेब थोरात सभागृह, जिल्हा परिषद, नाशिक येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. दावल साळवे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
           या कार्यशाळेत सर्पदशांपासून बचावासाठी घ्यावयाची खबदरारीच्या उपाययोजना, सर्पदंशाचे योग्य निदान व तत्काळ उपचार कसे करावेत, यावर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यशाळेत पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.
          जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी या कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन एमआरएचआरयु वणी चे नोडल अधिकारी डॉ. राहुल गजभिये, आरोग्य सेवा उपसंचालक नाशिक डॉ. कपिल आहेर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन !साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२५,

घरकुलाचा हप्ता मिळण्यासाठी स्विकारली लाच !ग्रामसेवकासह रोजगार सेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

जास्त भावाने बियाणे विक्री केल्यास प्रशासनाची विक्रेत्यांवर कारवाईची तयारी !