रिस्क" घ्यायला जे लोकप्रतिनिधी पुढे आले आहेत ते जनतेच्या कौतुकास पात्र ठरत आहेत, हे ही नसे थोडके,,,,,,,,,,,,,. प्रशासनाकडून आॅफलाईन सभा अटी-शर्तीनुसार घेतल्या जाणार !! न्यूज मसाला सर्विसेस संपर्क 7387333801. सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

       
              कोव्हिड-१९ च्या पार्श्र्वभूमीवर संपूर्ण भारतात अनलाॅक प्रक्रीया सुरू झाली आहे. या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आॅफलाईन सभा घेण्याचा मार्ग अटी-शर्तीनुसार मोकळा झाला आहे. अनेक ठिकाणी आॅनलाईन सभा घेण्यावरून मतभेद निर्माण झाले होते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात गेल्या तीन महिन्यांपासून कलगीतुरा रंगला असल्याचे आपण सारेच बघत आलो होतो. मात्र आता कोव्हिड-१९ चां प्रादुर्भाव व त्याच्या अनुषंगाने होणाऱ्या मृत्युंच्या संख्येवर नियंत्रण तसेच संसर्ग झालेल्यांना आजारातून बरे करण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे संपूर्ण देशात अनलाॅक प्रक्रीयेने सुरूवात केली आहे.
         लोकप्रतीनिधींकडून आॅफलाईन सभांसाठी प्रशासनावर दबाव आणण्यासाठी प्रयत्न केले जात होते परंतु जनहितासाठी अशा दबावाला प्रशासन बळी पडले नाही. अनेकांकडून खडेबोल सुनावण्याचे "राजकारण" करण्यात आले. यांत प्रामुख्याने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. प्रशासनाला आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळू लागले तेव्हाच प्रशासनाकडून अटी-शर्ती नुसार मेट्रो सुरू करणे, रेल्वेच्या काही मार्गिकांवरील वाहतूक, आंतरराष्ट्रीय विमानसेवा, मायानगरी ची धडकन अर्थात लोकलसेवा, शहर बससेवा, राज्यातील आंतरजिल्हा बससेवा, आस्थापना सुरू करण्यात आल्यात. धार्मिक स्थळांबाबतही निर्णय घेतला गेला, शैक्षणिक क्षेत्रातील काही निर्णय प्रलंबित आहेत, कर्मचाऱ्यांची ३३ टक्के उपस्थितीही ५० टक्क्यांपर्यंत वाढविली. यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभांसाठी अटी-शर्तीने सभा घेण्याचा निर्णय घेतला यामुळे लोकप्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले.
         आॅफलाईन सभांसाठी आग्रह  व जनतेच्या विकासासाठी तळमळ असणाऱ्यांमध्ये भीतीयुक्त वातावरण असले तरीही जनतेसाठी अशी जीवघेणी "रिस्क" घ्यायला जे लोकप्रतिनिधी पुढे आले आहेत ते जनतेच्या कौतुकास पात्र ठरत आहेत, हे ही नसे थोडके,,,,,,,,,,,,,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

जागतिक फार्मासिस्ट दिवस विशेष एसएमबीटी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची ‘अशीही’ सामाजिक बांधिलकी !

विजयादशमीला शिवप्रताप गरूडझेप ! ‘पहिले ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी’ !!