कर्तव्यावर असताना दावचवाडीचा भूमिपुत्र शहीद ! उद्या होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! न्यूज मसाला परीवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली, जयहिंद, जयहिंद !!!!

संतोष गिरी यांजकडून,
न्यूज मसाला सर्विसेस,
कर्तव्यावर असताना दावचवाडीचा भूमिपुत्र शहीद !
उद्या होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नासिक::- छत्तीसगड येथे १११ बटालियनमध्ये सेवेत असलेल्या आणि निफाड तालुक्यातील दावचवाडी येथील भूमिपुत्र राजाराम चिंधूबाबा कुयटे शहीद झाले आहेत.  कर्तव्यावर असताना गुरुवारी रात्री त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते.
           याबाबत माहिती अशी की, छत्तीसगड येथे १११ बटालियनमध्ये सेवेत असलेल्या राजाराम चिंधूबाबा कुयटे कर्तव्यावर असताना गुरुवारी (दि. ९)  रात्री साडेअकराच्या सुमारास ह्रदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ४९ होते. उद्या शनिवार दि.११, सकाळी दावचवाडी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. राजाराम कुयटे यांना बालपणापासूनच देशसेवा करण्याची आवड होती. रानवड येथे त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. तर बारावीपर्यंतचे शिक्षण पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयात झाले. त्यानंतर लगेचच ते देशसेवेत रूजू झाले. राजाराम कुयटे यांनी गावातील मुलांना देखील देशसेवेचे धडे दिले होते.
राजाराम यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ असा परिवार आहे.
**********************************
न्यूज मसाला परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली !
जयहिंद, जयहिंद
***********************************
चार दिवसांपूर्वी कुटुंबियांशी झाले होते बोलणे !
राजाराम यांनी चार दिवसांपूर्वीच आपल्या कुटुंबाला संपर्क साधत ख्याली खुशीली विचारली होती. त्यानंतर गुरुवारी रात्री राजाराम शहीद झाल्याची बातमी येताच कुयटे परिवारासह दावचवाडी गावावर दू:खाचा डोंगर कोसळला.
पोलिसांचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर
दावचवाडीचे भूमिपुत्र राजाराम कुयटे यांचे निधन झाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी अंत्यविधीची तयारी सुरू केली. मात्र, दुपारी दोन वाजेपर्यंत पिंपळगाव पोलीस ठाण्यातील एकही अधिकारी अथवा कर्मचार्याने गावाला भेट दिलेली नव्हती. त्यामुळे पिंपळगाव पोलिसांचा बेजबाबदारपणा यानिमित्ताने समोर आला.
************************************
जवान राजाराम कुयटे यांना बालपणापासूनच देशसेवा करण्याची आवड होती. लहान मुलांना देखील देशसेवेचे धडे त्यांनी दिले होते. त्यांच्या निधनाने आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
- योगेश कुयटे, माजी सरपंच, दावचवाडी
*************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल, मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड !

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)