पोस्ट्स

कर्मवीरांच्या त्यागामुळेच मविप्रचा वटवृक्ष बहरला : बाळासाहेब क्षिरसागर! करंजगाव जनता विद्यालयात समाजदिन साजरा !! न्यूज मसाला सर्विसेस संपर्क: 7387333801. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस कर्मवीरांच्या त्यागामुळेच मविप्रचा वटवृक्ष बहरला : बाळासाहेब क्षिरसागर करंजगाव जनता विद्यालयात समाजदिन साजरा          नासिक::-कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्यापासून ते स्वर्गीय डॉ.वसंतराव पवार यांच्यापर्यंत सर्वच कर्मवीरांनी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या उत्कर्षासाठी योगदान दिले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील लाखो विद्यार्थी मविप्रच्या शाखांमध्ये शिक्षण घेत आहे. शंभर वर्षांपूर्वी रोपटे लावलेल्या मविप्रचा वटवृक्ष कर्मवीरांच्या त्यागातुनच बहरला आहे, असे प्रतिपादन जि.प अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. गोदाकाठच्या करंजगाव मविप्र जनता विद्यालयात  त्यांच्या अध्यक्षतेखाली समाजदिन उत्साहात साजरा करून कर्मवीरांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर मविप्र तालुका संचालक प्रल्हाददादा गडाख, शालेय समिती अध्यक्ष भास्करदादा राजोळे, पंचायत समिती सदस्य शहाजी राजोळे, सरपंच अनिता भगूरे, मा.सरपंच खंडू बोडके-पाटील, धोंडूमामा भगूरे, सुरेशबापू राजोळे, राजेंद्र राजोळे, नंदू राजोळे, सोमनाथ राजोळे, देवकर भाऊसाहेब

न्यूज मसाला अंक दि. १३ आॅगस्ट २०२०,. संपादकीय- पत्रकार महापूरावर लिहीता लिहीता वाहून गेला ! इतर बातम्यांसह सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !! 7387333801, न्यूज मसाला संपर्क भ्रमणध्वनी !!!

इमेज
संपादकीय पत्रकार महापुरावर लिहीता लिहीता वाहून गेला ! समृद्ध मराठी भाषेतील म्हणी, "दिव्याखाली अंधार" "आई जेवू घालेना, बाप भिक मागू देईना" "वैद्याचं पोरगं पांगळं"       अर्थ सर्वसामान्यांसाठी खूप काही सांगून जातो मात्र पत्रकारिता क्षेत्रात या म्हणी फक्त वापर म्हणून वापरायच्या असतात  काय ? जगाला प्रकाशाकडे नेणारा पत्रकार इतका उपेक्षित असू शकतो हे आजच्या परिस्थितीने त्याला त्याचे अस्तित्व दाखवून दिले, अरे बाबा आधी तुझ्या बुडाखाली अंधार असताना तू जो प्रकाश दाखवतो त्यावर किती विश्र्वास ठेवावा ?     माध्यमांचे मालक यांनाच प्रती आईबाप मानणारी पत्रकार जमात इतकी "निर्बुद्ध" असू शकते की मालक आई जेवू घालेना आणि मालक बाप भिक मागू देईना तरीही शांत बसू शकतो यापलीकडे त्याच्या हाती कोणताही निर्णय घेऊ शकण्याची शक्ती नसणे ही शोकांतिकाच आहे.       सामाजिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारा वैद्य-पत्रकार आपल्या स्वत:च्या कुटुंबासाठी एका पांगळ्या जबाबदारीचा बाप गणला जावा यांसारखे दुर्देव काय ?        माध्यमांनी जाहीराती मिळविण्याचा जो बाजार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !! न्यूज मसाला सर्विसेस संपर्क- 7387333801.

इमेज
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण!  - डॉ मुरहरी सोपानराव केळे निर्माते बाळासाहेब कर्णवर - पाटील आणि सूर्यकांत कडाकने यांच्या "पुण्यश्लोक प्रॉडक्शन्स"द्वारे दिग्दर्शक दिलीप भोसले दिग्दर्शित "पुण्यश्लोक अहिल्यादेवी" या हिंदी आणि मराठी चित्रपटाची विशेष चर्चा निर्माण झाली होती. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि इतर मान्यवरांच्या हस्ते या चित्रपटाच्या मुखचित्राचे प्रकाशन झाल्याने राजकीय वर्तुळातही  चित्रपटाविषयी विविध चर्चा रंगू लागल्या होत्या. २० मान्यवर तज्ज्ञ, लेखक-साहित्यिकांच्या सहकार्याने डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांनी अल्पावधीत कथानक पूर्ण करून पुढील कार्याला गती दिली आहे. "पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा" दुर्लक्षित इतिहास जगभरातील प्रेक्षकांना परिचित व्हावा यासाठी निर्माते बाळासाहेब कर्णवर - पाटील आणि दिग्दर्शक दिलीप भोसले यांनी डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांच्या मार्गदर्शनाखाली खास, (महाराष्ट्र,गुजरात , राज्यस्थान,कर्नाटक,गुजरात, ) संशोधनासाठी २० मान्यवर तज्ज्ञ लेखक - साहित्यिकांना आमंत्रित करून लेखन कार्याची सुरुवात

करंजगाव येथे आज दि.१० विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण ! आमदार अनिल कदम यांच्या हस्ते, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या उपस्थितीत !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !! न्यूज मसाला सर्विसेस संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक 7387333801.

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस करंजगाव येथे आज दि.१० विविध विकासकामांचे भूमिपूजन व  लोकार्पण         नासिक::-निफाड तालुक्यातील गोदाघाट परिसरात निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या विशेष प्रयत्नाने करंजगाव येथे साकारलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन आज सोमवार दि १० ऑगस्टला करंजगाव ग्रामपालिका पटांगणात सकाळी १० वाजता होणार आहे. माजी आमदार अनिल कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष  नामदार बाळासाहेब क्षीरसागर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती अनुसया जगताप, उपसभापती शिवा पाटील सुरासे, गट विकास अधिकारी संदीप कराड, शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड, पंचायत समिती सदस्या कमलताई शहाजी राजोळे, भास्करदादा राजोळे, कचरू राजोळे, सागर जाधव, रमेश राजोळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.              माजी आमदार अनिल कदम यांच्या विशेष प्रयत्नाने करंजगावी प्रगतीपथावर काम सुरू असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत एक कोटी ६८ लक्ष रुपयांच्या नळपाणीपुरवठा योजनेचे भूमिपुजन यावेळी करण्यात येणार आहे.

रोटरी क्लब ऑफ नाशिक व्हिजन नेक्स्टतर्फे कोरोना योध्याना संजीवनी ! प्रभावी व सुरक्षित व्हिएलटीएम किट्सचे वितरण !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !! न्यूज मसाला भ्रमणध्वनी क्रमांक 7387333801,.

इमेज
रोटरी क्लब ऑफ नाशिक व्हिजन नेक्स्टतर्फे कोरोना योध्याना संजीवनी ! नाशिक - कोरोना योद्ध्यांनी केलेल्या बहुमूल्य अनमोल कार्याचे कौतुक सर्वत्र होत आहे. हा त्यांचा स्तुत्य उपक्रमच आहे. परंतु त्या बरोबरच या योध्यांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या व्हीएलटीएमच्या  किटचे वितरण रोटरी क्लब ऑफ नाशिक व्हिजन नेक्स्ट तर्फे होत आहे. नाशिक व नागपूरमधील वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा परिषद व महानगरपालिकांना परिषदा व महानगरपालिकांना व्हीएलटीएम या किट्सचे वितरण करून एका भव्य व उदात्त हेतूसाठी रोटरी क्लब कार्यरत आहे. सामान्यत: नाकातील आणि घशातील नमुने साठविण्यासाठी (व्हीएलटीएमच्या) व्हायरल ट्रान्सपोर्ट मिडीयम किटस काचेच्या सिलेंडरचा वापर होतो. तदनंतर हे कोविडचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात.  परंतु हे करत असतांना असे निदर्शनास आले कि, या कोरोना पद्धतीने काम करत असतांना कोरोना योध्यांना संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे.  कोरोना योध्यांची जोखीम कमी करण्याचा भाग म्हणुन ही महत्वपूर्ण व आवश्यक बाब लक्षात घेऊन व्हीएलटीएमच्या किट्स हे अत्यंत प्रभावी व  सुरक्षित आहे. कारण या किटस वापरले गेलेल्या घटका

आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रात समतोल बिघडणार असल्याने जिल्हा परिषदेने सार्वत्रिक बदली प्रक्रिया रदद केली !! न्यूज मसाला संपर्क क्रमांक 7387333801. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नाशिक- जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत असलेल्या रिक्त पदांमुळे बदली प्रक्रिया केल्यास आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रात समतोल बिघडणार असल्याने जिल्हा परिषदेने सार्वत्रिक बदली प्रक्रिया रदद केली आहे. नियमानुसार आपसी बदल्या १० ऑगस्टपर्यत करण्यात येणार आहे.                      शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार वर्ग ३ संर्वगातील सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविण्यासाठी १० ऑगस्टपर्यत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या विविध विभाग निहाय बदली प्रक्रियेचा आढावा घेतल्यावर गेल्या चार वर्षापासून पदभरती न झाल्यामुळे तसेच आरक्षण पदावरची पदोन्नतीबाबत शासनाने दिलेल्या स्थगितीमुळे मोठया प्रमाणात पद रिक्त असल्याचे निर्दशनास आले आहे. आदिवासी क्षेत्रामध्ये सध्या पदे रिक्त असून विनंती बदलीने पुन्हा आदिवासी क्षेत्रातीलच पदे रिक्त होण्याची शक्यता आहे. आदिवासी क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासकीय बदलीने बिगर आदिवासी क्षेत्रातून मोठया प्रमाणात बदल्या कराव्या लागतील. त्यामुळे बिगर आदिवासी क्षेत्रातील पदे मोठया प्रमाणात रिक्त होऊन त्या भागातील समतोल बिघड

धनगर ऐक्य अभियान -- धनगर समाज सरकारला देणार स्वतःच्या रक्ताने लिहून निवेदन - डॉ शशिकांत तरंगे ! १३ आॅगस्ट राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी दिनी देणार निवेदन !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य.. धनगर समाज सरकारला देणार स्वतःच्या रक्ताने लिहून निवेदन - डॉ शशिकांत तरंगे १३ ऑगस्ट रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना अभिवादन करून संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक तहसील कार्यालय वरती धनगर समाज बांधव धनगर ऐक्य अभियान मार्फत राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये स्व:ताच्या रक्ताने लिहून निवेदन देणार आहे     .....निवेदन मधील विषय.... धनगर समाज STआरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करा ! धनगर समाजाच्या विकासासाठी घोषित केलेल्या 22 योजनांची अंमलबजावणी करा व 1000 कोटीची तरतूद ताबडतोब करा. मेंढपाळांना संरक्षण द्या त्याच्यावर होणारे हाल्ले थांबवा. यासाठी राज्यभरातून आपल्या मागण्यांसाठी धनगर बांधव स्वतःच्या रक्ताने निवेदन लिहून मे. तहसीलदार मार्फत राज्य सरकारला निवेदन देणार आहे, यामध्ये सरकारला पंधरा दिवसाचा वेळही ही दिला जाणार आहे. अन्यथा पंधरा दिवसानंतर राज्यभर महा विकास आघाडी सरकार विरोधात धनगर समाज अतिशय उग्र आंदोलन घोषित करणार असल्याचे डॉ शशिकांत तरंगे यांनी जाहीर केले...

न्यूज मसाला दि. ६ आॅगस्ट २०२० चा प्रकाशित अंक

इमेज
न्यूज मसाला दि. ६ आॅगस्ट २०२० चा प्रकाशित अंक

शेतकरी कुटुंबातील कांचन बनली सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
शेतकरी कुटुंबातील कांचन बनली सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक !  नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (तांत्रिक) परीक्षा चा निकाल जाहीर झाला असून  निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील  कांचन शंकर आवारे हिने सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. या बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.           कांचन ही शेतकरी व सर्वसामान्य घरातील मुलगी असून तिचे शालेय शिक्षण चांदोरी येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये व त्यांनतर मेकॅनिकल डिप्लोमा हा चांदोरी येथील कर्मवीर काकासाहेब वाघ आभियांत्रिकी महाविद्यालयात पूर्ण केला, पदवी शिक्षण नाशिक येथील गोखले  महाविद्यालयात पूर्ण केले, कांचन ने  पदवी महाविद्यालयात प्रवेश घेतल्या बरोबरच स्पर्धा परीक्षा चा अभ्यास सुरू केला. महाविद्यालयातील अभ्यासिका व घरी अभ्यास करीत २०१७ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले. काही  कारणास्तव त्याचा निकाल जाहीर होण्यास विलंब झाला होता. मोठ्या प्रतिक्षेनंतर निकाल जाहीर झाला व त्यात कांचनने यशाला गवसणी घातल्याचे घोषित झाले, यांत अरुण नागरे ,महेंद्र धनाईत ,अमोल टाके यांचे मार्गदर्शन लाभले, वडील

सुमित जगताप वयाच्या २४ व्या वर्षी आयपीएस ! तालुक्यातील पहीला आयपीएस अधिकारी होण्याचा मान अन् गांवात दिवाळी साजरी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
            नासिक::- निफाड तालुक्यातील उत्तर-पूर्व पट्ट्यातील सरहद्दीवर असणाऱ्या वावी ठुशी गावचे भूमिपुत्र सुमित कैलास जगताप वय (२४) यांनी   पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत निफाड तालुक्यातील पहिला आयपीएस होण्याचा  मान मिळवत देशात  ५०७ वे  मानांकन मिळविले. तालुक्याबरोबर वावी ठुशी चे नाव  कानाकोपऱ्यात  पोहोचवल्याने तालुक्यात  तसेच गावात दिवाळी पूर्वीच दिवाळी साजरी होत असून फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत वावी ठुशीकरांनी आनंदोत्सव साजरा केला,           सुमीत जगताप यांचे प्राथमिक शिक्षण वावी ठुशी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत , काकासाहेब नगर येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात इयत्ता पाचवीचे तर इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतचे शिक्षण कळवण-मानूर येथील  शरद पवार पब्लिक स्कूल येथे होऊन इयत्ता अकरावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण नाशिक येथील अशोका कॉलेज येथे घेतले, के के वाघ शिक्षण संस्थेत केमिकल इंजीनियरिंग ची पदवी २०१७ मध्ये घेत यूपीएससीचा अभ्यास पुणे, नाशिक, दिल्ली येथे सुरू करून पहिल्याच प्रयत्नात यशाचा झेंडा रोवला. यूपीएससी परीक्षेत पूर्व मुख्य प