कर्मवीरांच्या त्यागामुळेच मविप्रचा वटवृक्ष बहरला : बाळासाहेब क्षिरसागर! करंजगाव जनता विद्यालयात समाजदिन साजरा !! न्यूज मसाला सर्विसेस संपर्क: 7387333801. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

संतोष गिरी यांजकडून
न्यूज मसाला सर्विसेस
कर्मवीरांच्या त्यागामुळेच मविप्रचा वटवृक्ष बहरला : बाळासाहेब क्षिरसागर
करंजगाव जनता विद्यालयात समाजदिन साजरा
         नासिक::-कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्यापासून ते स्वर्गीय डॉ.वसंतराव पवार यांच्यापर्यंत सर्वच कर्मवीरांनी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या उत्कर्षासाठी योगदान दिले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील लाखो विद्यार्थी मविप्रच्या शाखांमध्ये शिक्षण घेत आहे. शंभर वर्षांपूर्वी रोपटे लावलेल्या मविप्रचा वटवृक्ष कर्मवीरांच्या त्यागातुनच बहरला आहे, असे प्रतिपादन जि.प अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. गोदाकाठच्या करंजगाव मविप्र जनता विद्यालयात  त्यांच्या अध्यक्षतेखाली समाजदिन उत्साहात साजरा करून कर्मवीरांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर मविप्र तालुका संचालक प्रल्हाददादा गडाख, शालेय समिती अध्यक्ष भास्करदादा राजोळे, पंचायत समिती सदस्य शहाजी राजोळे, सरपंच अनिता भगूरे, मा.सरपंच खंडू बोडके-पाटील, धोंडूमामा भगूरे, सुरेशबापू राजोळे, राजेंद्र राजोळे, नंदू राजोळे, सोमनाथ राजोळे, देवकर भाऊसाहेब, सोमनाथ भगूरे, वसंत राजोळे, संतोष पवार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन करून कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  बाळासाहेब क्षिरसागर यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. मुख्याध्यापक कदम सर यांनी प्रास्ताविक केले. सुनील जाधव सर यांनी कर्मवीरांच्या कार्याची माहिती यावेळी दिली. बाळासाहेब क्षीरसागर यांनी यावेळी मार्गदर्शन करून कर्मवीरांच्या आठवणींना उजाळा दिला. शालेय प्रांगणात बाळासाहेब क्षिरसागर यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी समाजदिन कार्यक्रमास अनिल जोगदंड, कारभारी राजोळे, दशरथ राजोळे, संतोष गायकवाड,  आदीसह मविप्र सभासद व शिक्षक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कृषि विभागाच्या सर्व योजना शेतक-यांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीने व्यापक कार्यक्रम हाती घ्यावा- जिल्हाधिकारी गंगाथरन, शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत लाभ घ्यावा- श्रीमती लीना बनसोड

पापडीवाल दाम्पत्याच्या अतूट श्रद्धेचा भक्तिमय प्रत्यय ! जयजयकारात महामस्तकाभिषेक संपन्न !

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी रथाची यात्रेदरम्यान रोज सजावट ! मुक्कामाच्या ठिकाणी रात्रीतून सजावट करण्याचे अवघड कार्य !