करंजगाव येथे आज दि.१० विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण ! आमदार अनिल कदम यांच्या हस्ते, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या उपस्थितीत !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !! न्यूज मसाला सर्विसेस संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक 7387333801.

संतोष गिरी यांजकडून
न्यूज मसाला सर्विसेस
करंजगाव येथे आज दि.१० विविध विकासकामांचे भूमिपूजन व  लोकार्पण
        नासिक::-निफाड तालुक्यातील गोदाघाट परिसरात निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या विशेष प्रयत्नाने करंजगाव येथे साकारलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन आज सोमवार दि १० ऑगस्टला करंजगाव ग्रामपालिका पटांगणात सकाळी १० वाजता होणार आहे. माजी आमदार अनिल कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष  नामदार बाळासाहेब क्षीरसागर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती अनुसया जगताप, उपसभापती शिवा पाटील सुरासे, गट विकास अधिकारी संदीप कराड, शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड, पंचायत समिती सदस्या कमलताई शहाजी राजोळे, भास्करदादा राजोळे, कचरू राजोळे, सागर जाधव, रमेश राजोळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
             माजी आमदार अनिल कदम यांच्या विशेष प्रयत्नाने करंजगावी प्रगतीपथावर काम सुरू असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत एक कोटी ६८ लक्ष रुपयांच्या नळपाणीपुरवठा योजनेचे भूमिपुजन यावेळी करण्यात येणार आहे. तसेच माजी सरपंच खंडू बोडके पाटील यांच्या पाठपुराव्याने मा. अनिल  कदम यांनी मंजूर केलेल्या नागरी सुविधा योजनेच्या श्रीराम चौक अभ्यासिका (७ लक्ष), सिद्धेश्वर मंदिर रस्ता (७ लक्ष), डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रस्ता (१० लक्ष), ग्रामपालिका कार्यालय ते योगेश राजोळे घर रस्ता (८ लक्ष), व ग्रामपालिकेच्या १४ व्या वित्त आयोगातून पूर्णत्वास गेलेल्या योगेश राजोळे घर ते प्रभाकर मुळे घर रस्ता (१२ लक्ष), सोमनाथ भगूरे घर ते सुभाष राजोळे गिरणी रस्ता व काँक्रिटीकरण ८ लक्ष या  काँक्रिटकरण झालेल्या रस्त्यांचे लोकार्पण यावेळी करण्यात येणार आहे. करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके पाटील यांच्या गोदाकाठ जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही माजी आमदार अनिल कदम यांच्या हस्ते यावेळी करण्यात येणार आहे. लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच अनिता भगूरे, माजी सरपंच खंडू बोडके-पाटील, ग्रामविकास अधिकारी प्रमोद खैरनार यांनी केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!