पोस्ट्स

विज वितरण कंपनीच्या सिव्हिल हाँस्पिटल सब स्टेशन मध्ये मातीचा डोंगर !! भिंत कोसळून होणाऱ्या अपघातास कोण राहणार जबाबदार !! सूज्ञ नागरिकांचा प्रश्न !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नासिक ::- सार्वजनिक बांधकाम विभागांतील  कार्यालयाच्या संरक्षक भिंतीजवळ भराव टाकून सुशोभीकरणाचे काम सुरू असताना जानेवारी २०१९ मध्ये संरक्षक भिंत कोसळून जीवितहानी झाली. त्याची माघ्यमांमधून बरीच चर्चाही झडली. अशाचप्रकारे पुन्हा तरणतलावाजवळील सिव्हिल हाँस्पिटल सबस्टेशन परिसरात अपघात घडू शकण्याची परिस्थीती निर्माण झाल्याची भावना रहदाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.        सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात सपाटीकरण व तत्सम कामे सुरू होती, त्यासाठी भराव टाकून आवारातील जमीनीची उंची वाढविण्याचे काम सुरू असतांना अपघांत झाला. ट्रक्टरची धडक, भरावाची माती, व जीर्ण भींत या कारणामुळे संरक्षक भिंत कोसळली.        सदर घटना ताजी असतांना महावितरण च्या सिव्हील हाँस्पिटल सब स्टेशन मध्ये संरक्षक जीर्ण भिंतीलगत भराव टाकण्याचे काम सुरू असुन मातीचा मोठा ढिगारा तयार झाला आहे, भरावाची उंची जवळजवळ पंधरा ते वीस फुटापर्यंत असुन भिंचीची उंची जेमतेम चार साडेचार फुटापर्यंत अाहे. संरक्षक भिंतीच्या आतबाहेर विद्युत जोडणीचे लोखंडी पोल उभारलेले आहेत,  भिंतीलगत तरणतलाव वाहतूक सिग्नल असल्याने वाहणे थांबलेली असतात, पादचारी मार्

भाग-२रा, ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या परिपत्रकाचा जिल्हा परिषद व सार्वजनिक विभाग कसा अर्थ काढते यांकडे सर्वांचे लक्ष ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
भाग २, नासिक::-जिल्हा परिषदांच्या ताब्यातील असलेल्या विविध ग्रामीण तसेच इतर जिल्हा मार्ग रस्त्यांचे बांधकाम, खडीकरण , देखभाल, दुरूस्तीची कामे जिल्हा परिषदेमार्फत केली जातात. अशी कोणतीही कामे राज्यक्षेत्राकडून जर करावयाची झाल्यास ८ आक्टों.१९९३ च्या शासन परिपत्रकान्वये जिल्हा परिषदेची रितसर परवानगी घ्यावी अशा सूचना निर्गमित केल्या होत्या त्यानुसार नासिक जिल्हा परिषदेकडून कथित वरसविहीर-बोरपाडा व बोरपाडा-वरसविहीर रस्त्यासंदर्भात अहवाल सादर करून नासिक सार्वजनिक बांधकाम विभागावर गुन्हा दाखल करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यकारी अभियंता (इवद१) यांना सूचित केले आहे.         तथापी लोकप्रतिनीधींनी मागणी केलेली रस्ते व पूल ही कामे रादज्यस्तरीय योजनेअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखाशिर्षाखाली विधानमंडळाच्या अर्थसंकल्पित झालेली असतात अशी कामे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यावर असले तर त्यांसाठी जिल्हा परिषदेची परवानगीची आवश्यकता नाही वा जिल्हा परिषदेने हरकत घेऊ नये अशा सूचना २मार्च २००९ च्या शासन परिपत्रकाने निर्गमित केलेल्या आहेत.  अशा परिस्थितीत सदर कामाबाबत जिल्हा प

हरहुन्नरी, समाजप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे एसकेडी ग्रुप चे अध्यक्ष संजय देवरे, समाजमनाचा आरसा व त्यातून निर्माण झालेली सामाजिक बांधिलकी चा वाढदिवसाच्या माध्यमांतून शैक्षणिक साहीत्य वाटप करून उतराई होणे पसंत करणारे, गरजू विद्यार्थ्यांना सढळ हस्ते मदत व आपुलकीचे दोन शब्द देणारे व्यक्तीमत्व......... व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
एसकेडी ग्रुप चे अध्यक्ष संजय कारभारी देवरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एसकेडी फाउंडेशन च्या माध्यमातुन जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा  वेळुंजे ता. त्रंबकेश्वर येथे गरजु  विद्यार्थी मुले व मुलीं साठी शालेय  साहित्य व शालेय शुज तसेच मिठाई, नास्ता वाटप करण्यात आले. संजय देवरे हे व्यावसायिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तीमत्व असुन, समाजाकडे बघण्याचा त्यांचा द्रुष्टीकोण नेहमीच सकारात्मक दिसुन येतो, एसकेडी ग्रुप या नांवाला महाराष्ट्रासह इतर राज्यांत त्यांनी मानाचे स्थान निर्माण करून दिले आहे, नासिक, मुंबई, औरंगाबाद, पुण्यासह अनेक ठिकाणी नवतरूणांना रोजगार-नोकरी एसकेडी ग्रुपच्या माध्यमांतून उपलब्ध करून दिली आहे. व्यवसायाबरोबर त्यांनी एसकेडी इंटरनँशनल (सीबीएससी बोर्ड) स्कुल भवाडे ता. देवळा येथील प्रसिद्ध विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील भावडबारीच्या पायथ्याशी निसर्गरम्य ठिकाणी जिल्ह्यासह इतर भागातील विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा सुरू केली, सदर स्कुलचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. सातत्याने विविध उपक्रम राबवित अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्

जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ म्हणावा काय ?आरोप-एकाच रस्त्याची दोन्हीकडे काढली बीले- विनायक माळेकर. (क्रमश:) बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नासिक जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग नासिक चा सावळागोंधळ म्हणावा काय ? आरोप - एकाच रस्त्याची दोन्हीकडे काढली बीले- विनायक माळेकर नासिक::-एकाच रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद दोन्ही करतात व बीले काढतात हे कसे शक्य आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू शकतो ! मात्र विनायक माळेकर या नियोजन समिती सदस्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. नरेश गिते यांच्या कडे लेखी तक्रार करून सविस्तर चर्चा केली. लेखी तक्रारीत दि. १३ फेब्रुवारी रोजी उपोषण व धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. काल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर थोडक्यात सदर तक्रारीची दखल घेत कार्यकारी अभियंता सांगळे यांना आपल्या दालनांत पाचारण करून सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेत, तसेच सदर रस्ता हा जिल्हा परिषदेचा असुन सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा परिषदेची परवानगी न घेता बनविलाच कसा ? याबाबत तत्काळ सार्वजनिक विभागाकडून खुलासा मागवून व गुन्हा दाखल करण्यांत येईल असे आश्वासन देण्यांत आल्याची माहीती विनायक माळेकर यांनी दिली. वरसविहीर ते बोरपाड

मराठा आरक्षण-भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी आता उच्च न्यायालयात बाजू मांडणार ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
मराठा आरक्षणाला आव्हान देणार्‍या याचिकांवर उच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ व भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी शासनाची बाजू मांडणार…. मा. ना. चंद्रकांत दादा पाटील. मुंबई : ज्येष्ठ विधिज्ञ आणि देशाचे माजी अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी उच्च न्यायालयात शासनाची बाजू भक्कमपणे मांडणार असून काल शनिवार दि. २ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे या प्रकरणी शासनाकडील सर्व माहिती जाणून घेतली. ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. हरीश साळवे यांना माहे फेब्रुवारी–मार्च दरम्यान जागतिक स्तरावरील काही महत्त्वाच्या सुनावण्या असून त्यामुळे या कालावधीत ते इथे उपलब्ध नाहीत. मात्र, या याचिकांवर उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी बुधवार दि. ६ फेब्रुवारी पासून सुरू होणार असल्याने त्यावेळी शासनाची भूमिका भक्कमपणे मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ नियुक्त करण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. महाधिवक्ता अॅड. आशुतोष कुंभकोणी यांच्या बरोबर अॅड. विजय थोरात, अॅड. साखरे असे दिग्गज वकील या प्रकरणी संपूर्ण अभ्यास करून न्यायालयात शासनाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी या पूर्वीच नियुक्त करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ विधि

सुगरण, सुगरण नक्की कुणाला म्हणावे ? घरातील की रानावनातील ? खालील लिंकवर क्लिक करत सविस्तर वाचा रचनाकार प्रदीप पाटील यांची रचना

इमेज
सुगरण:-- रचनाकार:-  प्रदीप पाटील आहेत पक्षी अनेक सुगरण हुशार एक कुटूंब चालवते नेक खोपा अविशकार एक.... वयात येता ही पाहुन जोडीदार निवडते  प्रेमात सुरवात करते नवनिर्मिती कास धरते.... प्रजनन काळ जवळ गोळा करती  पवने जातीतील शोधुन गवत  अथक परिश्रमाणे  रानीवने .... शोधते काटेरी झुडूप   लांब बारीक फांदी  गुंफ़ते विणते खोपा दुमजली वीण नजरबंदी.... एकात घालते अंडी  दुसऱ्यात नरमादी स्वछंदी धोरण दृष्टी कुटूंबाची राहतात झाड फांदी... द्रुष्ट प्राणी त्रास बाळा साठी अट्टहास  जपते त्यांना खास सतत कुटूंबाचा सहवास....   गुण असंख्य सुगरणीचे  उपमा देतात इची  पाककलेत घर सजावटीचे  सुगरण माउली मानवाची.... प्रदीप पाटील

रेडीमिक्स ची गुलाबी हवा ८ फेब्रुवारी पासून !!! एका दिवसात ३.५ लाखांहून अधिक लोकांची पसंती !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

इमेज
‘रेडीमिक्स’ची गुलाबी हवा ८ फेब्रुवारी पासून! एका दिवसात ट्रेलरला ३.५ लाखांहून अधिक लोकांची पसंती!! प्रेमाचं जाळ विणण्यासाठी ‘हिवाळा’ म्हणजे प्रेमवीरांसाठी समृद्धीचा काळ’ आणि त्यात सोनेपे सुहागा म्हणजे फेब्रुवारी मधला व्हेलेंटाईन डे! प्रेमाची कोरी पाटी असलेल्या प्रेमवीरांच्या यशकिर्तीचे नवनवे सोपान गाठण्याचा सुवर्णदिन. हे औचित्य साधून या वर्षी खास युथसाठी प्रस्तुतकर्ते अमेय विनोद खोपकर, निर्माते प्रशांत घैसास, सुनिल वसंत भोसले, ख्यातनाम लेखक शेखर ढवळीकर आणि दिग्दर्शक जालिंदर कुंभार‘रेडीमिक्स’चं वेड लावणार आहेत. आणि हे सरप्राईज म्हणजे लव्हरबॉय वैभव तत्ववादी, गुलाबी क्वीन प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी यांचा ट्रिपल ‘रेडीमिक्स’ धमाका. तरुणाईला झिंग लावणारी प्रार्थना आणि वैभव तत्ववादीच्या जोडीला नेहा जोशीची बिनधास्त अदाकारी व्हेलेंटाईन डेच्या एक आठवडा आधीपासूनच म्हणजे ८ फेब्रुवारी पासून सर्वांना एन्जॉय करता येणार आहे.            काही जण खूप विचार करून कृती करतात, पण विचार कुठे थांबवायचा आणि कृती कधी करायची हेच त्यांना कळत नाही. हे तर काहीच नाही, काही जण इतका विचार कर