रेडीमिक्स ची गुलाबी हवा ८ फेब्रुवारी पासून !!! एका दिवसात ३.५ लाखांहून अधिक लोकांची पसंती !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा‘रेडीमिक्स’ची गुलाबी हवा ८ फेब्रुवारी पासून!

एका दिवसात ट्रेलरला ३.५ लाखांहून अधिक लोकांची पसंती!!

प्रेमाचं जाळ विणण्यासाठी ‘हिवाळा’ म्हणजे प्रेमवीरांसाठी समृद्धीचा काळ’ आणि त्यात सोनेपे सुहागा म्हणजे फेब्रुवारी मधला व्हेलेंटाईन डे! प्रेमाची कोरी पाटी असलेल्या प्रेमवीरांच्या यशकिर्तीचे नवनवे सोपान गाठण्याचा सुवर्णदिन. हे औचित्य साधून या वर्षी खास युथसाठी प्रस्तुतकर्ते अमेय विनोद खोपकर, निर्माते प्रशांत घैसास, सुनिल वसंत भोसले, ख्यातनाम लेखक शेखर ढवळीकर आणि दिग्दर्शक जालिंदर कुंभार‘रेडीमिक्स’चं वेड लावणार आहेत. आणि हे सरप्राईज म्हणजे लव्हरबॉय वैभव तत्ववादी, गुलाबी क्वीन प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी यांचा ट्रिपल ‘रेडीमिक्स’ धमाका. तरुणाईला झिंग लावणारी प्रार्थना आणि वैभव तत्ववादीच्या जोडीला नेहा जोशीची बिनधास्त अदाकारी व्हेलेंटाईन डेच्या एक आठवडा आधीपासूनच म्हणजे ८ फेब्रुवारी पासून सर्वांना एन्जॉय करता येणार आहे.
           काही जण खूप विचार करून कृती करतात, पण विचार कुठे थांबवायचा आणि कृती कधी करायची हेच त्यांना कळत नाही. हे तर काहीच नाही, काही जण इतका विचार करतात कि विचारच करत राहतात. आणि काहीजण विचारही करतात आणि कृती सुद्धा करतात. पण कृती आधी करतात आणि विचार नंतर करतात अश्या भिन्न प्रवृत्तीच्या तीन व्यक्तिरेखा एकत्र आल्यानंतर जी धम्माल उडायला हवी तीच एन्जॉयमेंट हा चित्रपट देणार आहे. प्रेक्षकांची मस्त धम्माल करण्यासाठी या चित्रपटाचा फॉर्म खुसखुशीत रोमँटिक विनोदाचा असून वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी यांच्या जोडीला विनोदवीर सुनिल तावडे, आनंद इंगळे, नेहा शितोळे,गिरीश परदेसी, आशा पाटील, रमा नाडगौडा, अश्विनी कुलकर्णी, उदय नेने, राजू बावडेकर, आशिष गोखले अश्या हरहुन्नरी कलाकारांची साथ पोषक ठरली आहे.
         युवा सिनेमॅटोग्राफर संदिप पाटील यांच्या व्हिजनरी कॅमेऱ्यातून ‘रेडीमिक्स’चं हे सौंदर्य अधिकच खुललं आहे. या चित्रपटात एकूण चार गाणी असून ती गुरु ठाकूर, अश्विनी शेंडे, अभय इनामदार यांनी शब्दबद्ध केली आहेत. त्यावर रोमँटिक चित्रपटांच्या संगीत दिग्दर्शनात माहिर असलेले लोकप्रिय संगीतकार अविनाश – विश्वजित या जोडगोळीने प्रेक्षकांवर गारुड घालणाऱ्या संगीताची निर्मिती केली आहे. लोकप्रिय युवा गायिका आर्या आंबेकर, मुग्धा कऱ्हाडे, शिखा जैन,गायक आशिष शर्मा, फराद भिवंडीवाला, विश्वजित जोशी यांच्या मधाळ आवाजाला रसिकांची पसंती मिळाली असून ही गीते पसंतीस उतरली आहेत. कोरिओग्राफर दिपाली विचारे यांनी साजेशी नृत्यरचना केली आहे. संतोष गोठस्कर यांनी वेगवान संकलन केलं आहे तर कार्यकारी निर्मितीची सूत्रे प्रवीण वानखेडे यांनी सांभाळली आहेत. पूजा कामत यांनी केलेल्या वेशभूषेला अनुसरून सुहास गवते यांनी रंगभूषा केली आहे.
           प्रस्तुतकर्ते अमेय विनोद खोपकर, निर्माते प्रशांत घैसास,सुनिल वसंत भोसले, ख्यातनाम लेखक शेखर ढवळीकर आणि सर्जनशील दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांच्या‘रेडीमिक्स’ मध्ये प्रेमाचे रंग अधिक गहिरे आणि आकर्षक करणारी लोकेशन्स या चित्रपटात असल्याने चित्रपटाचा लुक फ्रेशनेस आणतो. यापूर्वी आपण पाहिलेल्या पुण्यापेक्षा या चित्रपटातील पुणे आपल्याला त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. चित्रपटातील गीते आणि पार्श्वसंगीत प्रेक्षकांना रोमँटिक झिंग आणण्यासाठी पूरक ठरले आहे. या गुलाबी मोसमात ही लज्जत बहारदार झाली असून तरुणाईचं हे सरप्राईज पॅकेज चित्रपट गृहातच एन्जॉय करायला हवं.
       'रेडीमिक्स’ मधील चार गीतांपैकी दोन गाणी सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आली आहेत. त्यात‘ठरवून कधी मन वेडे होते का?’  हे आशिष शर्माच्या आवाजातील आणि ‘का मन हे तरंग होऊनी पाण्यावर राहते.’  हे आर्या आंबेकरच्या आवाजातील गाणं सोशल मिडीयावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच चित्रपटाच्या ट्रेलरला एका दिवसात साडेतीन लाखांहून अधिक लोकांची पसंती मिळाली आहे. ही गाणी आणि ट्रेलर आपण खालील लिंक्सवर पाहू शकता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

एकदा सर्वांनी कवयित्री फरझाना इकबाल यांची पंढरीच्या "विठ्ठलाच्या भेटीसाठी मन विठाई विठाई" रचना ऐकायला हवी !

महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड चे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते प्रदान ! "बातमी अशी कुठे असते का" ची घेण्यात आलेली दखल !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!