हरहुन्नरी, समाजप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे एसकेडी ग्रुप चे अध्यक्ष संजय देवरे, समाजमनाचा आरसा व त्यातून निर्माण झालेली सामाजिक बांधिलकी चा वाढदिवसाच्या माध्यमांतून शैक्षणिक साहीत्य वाटप करून उतराई होणे पसंत करणारे, गरजू विद्यार्थ्यांना सढळ हस्ते मदत व आपुलकीचे दोन शब्द देणारे व्यक्तीमत्व......... व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

एसकेडी ग्रुप चे अध्यक्ष संजय कारभारी देवरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एसकेडी फाउंडेशन च्या माध्यमातुन जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा  वेळुंजे ता. त्रंबकेश्वर येथे
गरजु  विद्यार्थी मुले व मुलीं साठी शालेय  साहित्य व शालेय शुज तसेच
मिठाई, नास्ता वाटप करण्यात आले.
संजय देवरे हे व्यावसायिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तीमत्व असुन, समाजाकडे बघण्याचा त्यांचा द्रुष्टीकोण नेहमीच सकारात्मक दिसुन येतो, एसकेडी ग्रुप या नांवाला महाराष्ट्रासह इतर राज्यांत त्यांनी मानाचे स्थान निर्माण करून दिले आहे, नासिक, मुंबई, औरंगाबाद, पुण्यासह अनेक ठिकाणी नवतरूणांना रोजगार-नोकरी एसकेडी ग्रुपच्या माध्यमांतून उपलब्ध करून दिली आहे.
व्यवसायाबरोबर त्यांनी एसकेडी इंटरनँशनल (सीबीएससी बोर्ड) स्कुल भवाडे ता. देवळा येथील प्रसिद्ध विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील भावडबारीच्या पायथ्याशी निसर्गरम्य ठिकाणी जिल्ह्यासह इतर भागातील विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा सुरू केली, सदर स्कुलचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. सातत्याने विविध उपक्रम राबवित अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्याचे कार्य शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्याकडून केले जात असुन खेळ, विज्ञान, बौद्धिक क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांनी तालुकास्तर, जिल्हास्तरावर प्राविण्य मिळविले आहे.
             याचबरोबर त्यांनी गेल्या अनेक वर्षापासुन समाजसेवेसमवेत राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटविण्यास सुरूवांत केली असुन त्यात यशस्वी होत आहेत, ग्रामपंचायतीत त्यांच्या प्रयत्नाने एकहाती सत्ता मिळवत श्रीगणेशा केला, याचा जिल्ह्यातील मातब्बर समजल्या जाणाऱ्या राजकारण्यांनाही दखल घेण्यास भाग पाडले आहे,
            राजकारणावर प्रभाव पाडू शकणाऱ्या शिक्षक, पोलीस, व वकिल या तीन घटकांपैकी शिक्षक हा घटक महत्वाचा मानला जातो, तीच बाब हेरून त्यांनी महाराष्ट्रातील शिक्षकांच्या अडीअडचणी समजून घेत, उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी शिक्षकांसाठी मेळावे घेऊन एक सच्चा दिलदार मित्र शिक्षकांसाठी तयार असल्याचे सिद्ध करून दाखविले आहे, लवकरच ते अनेक संस्थाचालक व शिक्षक यांच्या संपर्कात येत असुन "समाज-शिक्षक-विद्यार्थी" या नात्याला नवा आयाम देण्यासाठी सज्ज होत आहेत.
            "मी समाजाचा व समाज माझा" या नुसार त्यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रात अनेक मित्र जोडले आहेत. फक्त सामाजिक कार्याचा परंपरागत चालत आलेला वारसा त्यांनी आज स्वत:च्या हिमतीवर सर्वच क्षेत्रांत उमटवीत वाटचाल सुरू केली आहे. या वाटचालीत त्यांच्या अनेक मित्र, आप्तेष्ट, पत्रकार, व कर्मचारी वर्गाची त्यांना साथ मिळत आहे, त्यांच्याशी एक कुटुंबघटक असे नाते निर्माण करून मीही तुमचाच आहे हा विश्वास प्राप्त केला आहे.
           अशा या हरहुन्नरी व्यक्तीमत्वास माझ्यासह न्यूज मसाला परिवाराकडून उदंड आयुष्यासाठी कोटी-कोटी शुभेच्छा व त्यांच्या भविष्यातील मनसुब्यांना आई तुळजाभवानी, आई सप्तश्रुंगी यांचा आशिर्वाद लाभत राहो या सदीच्छांसह !!!


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !