जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ म्हणावा काय ?आरोप-एकाच रस्त्याची दोन्हीकडे काढली बीले- विनायक माळेकर. (क्रमश:) बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नासिक जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग नासिक चा सावळागोंधळ म्हणावा काय ?
आरोप-एकाच रस्त्याची दोन्हीकडे काढली बीले- विनायक माळेकर
नासिक::-एकाच रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद दोन्ही करतात व बीले काढतात हे कसे शक्य आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू शकतो ! मात्र विनायक माळेकर या नियोजन समिती सदस्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. नरेश गिते यांच्या कडे लेखी तक्रार करून सविस्तर चर्चा केली. लेखी तक्रारीत दि. १३ फेब्रुवारी रोजी उपोषण व धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
काल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर थोडक्यात सदर तक्रारीची दखल घेत कार्यकारी अभियंता सांगळे यांना आपल्या दालनांत पाचारण करून सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेत, तसेच सदर रस्ता हा जिल्हा परिषदेचा असुन सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा परिषदेची परवानगी न घेता बनविलाच कसा ? याबाबत तत्काळ सार्वजनिक विभागाकडून खुलासा मागवून व गुन्हा दाखल करण्यांत येईल असे आश्वासन देण्यांत आल्याची माहीती विनायक माळेकर यांनी दिली.
वरसविहीर ते बोरपाडा या रस्त्याचे काम सार्वजनिक विभागाने केले व बोरपाडा ते वरसविहीर हे काम जिल्हा परिषदेने केले व दोन्हीकडून मक्तेदारास बीले अदा करण्यांत आली आहेत, यांत दिसुन येत असलेली अनियमितता याबाबत आंदोलनाचा व घोटाळ्याच्या चौकशीचा अर्ज दिला असुन दोषींवर कारवाई करावी असेही निवेदनांत स्पष्ट केले आहे.
  आमच्या प्रतिनिधीने कार्यकारी अभियंता सांगळे, उप अभियंता कुमावत व शाखा अभियंता निळे (सर्व जिल्हा परिषद ) यांच्याशी भ्रमनध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया कऴू शकली नाही.
                   (क्रमशा:)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

समग्र वारली चित्रसृष्टी प्रकल्पालासर्वतोपरी सहकार्य -ना. डॉ. गावित