सुगरण, सुगरण नक्की कुणाला म्हणावे ? घरातील की रानावनातील ? खालील लिंकवर क्लिक करत सविस्तर वाचा रचनाकार प्रदीप पाटील यांची रचना





सुगरण:--
रचनाकार:-  प्रदीप पाटील
आहेत पक्षी अनेक
सुगरण हुशार एक
कुटूंब चालवते नेक
खोपा अविशकार एक....
वयात येता ही
पाहुन जोडीदार निवडते 
प्रेमात सुरवात करते
नवनिर्मिती कास धरते....
प्रजनन काळ जवळ
गोळा करती  पवने
जातीतील शोधुन गवत 
अथक परिश्रमाणे  रानीवने ....
शोधते काटेरी झुडूप  
लांब बारीक फांदी 
गुंफ़ते विणते खोपा
दुमजली वीण नजरबंदी....
एकात घालते अंडी 
दुसऱ्यात नरमादी स्वछंदी
धोरण दृष्टी कुटूंबाची
राहतात झाड फांदी...
द्रुष्ट प्राणी त्रास
बाळा साठी अट्टहास 
जपते त्यांना खास
सतत कुटूंबाचा सहवास....
  गुण असंख्य सुगरणीचे 
उपमा देतात इची 
पाककलेत घर सजावटीचे 
सुगरण माउली मानवाची....
प्रदीप पाटील

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल, मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड !

डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)