महाराष्ट्रातील जाणकार मान्यवरांच्या उपस्थितीत सुतार जनजागृती सेवा संस्थेची स्थापना ! विश्वकर्मा पूजन दिनी तमाम समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्षांनी केले आहे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
सुतार जनजागृती सेवा संस्थेची स्थापना ! नासिक::- काळ बदलला तशी सामाजिक परिस्थिती बदलत गेली, बारा बलुतेदारांच्या व्यवसायात ही स्थित्यंतरे झाली, शिक्षणाचं विकेंद्रीकरण झाले परंतु सर्वांना वेळीच हा बदल आत्मसात करता आला नाही याचा परिणाम समाजावर कालानुरूप होत गेला. समाजातील अनेक जातीधर्माच्या कुटुंबांना पिछाडीवर टाकत असताना काही जाणकारांनी वेळीच लक्ष देऊन समाज संघटित करून भविष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी पुढाकार घेतला. तसाच सुतार समाज यांत्रिकीकरणाचा बळी पडून पारंपरिक व्यवसायासही मुकत चालला असून त्याला भेडसावणाऱ्या समस्यांपासून मुक्त करण्यासाठी नासिक मध्ये सुतार जनजागृती सेवा संस्थेची स्थापना सुतार समाजातील जाणकारांकडून करण्यात आली आहे. १७ सप्टेंबर रोजी विश्वकर्मा पूजन दिनी या संस्थेची स्थापना झाल्याचे जाहीर करण्यात येणार आहे, मे. धर्मादाय आयुक्त, नासिक येथे नोंदणी केली असून राजे छत्रपती संभाजी स्टेडियमजवळील मायको फोरम हाॅल येथे विश्वकर्मा पूजन दिनी सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याप्रसंगी सुतार समाजातील सर्वांना निमंत्रित करण्यात आले आहे अशी माह