जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा ! जनतेच्या आरोग्याची व शेतकऱ्यांची समस्याविरहित भरभराट होवो व सुखसमृद्धी लाभो - जिल्हा परिषद अध्यक्ष !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा !
         
नासिक (११)::- जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो, जिल्हा परिषदेतील सर्व पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, सर्व संवर्गातील कर्मचारी मोठ्या उत्साहात गणेशोत्सवात सहभागी होत असतात. सालाबादप्रमाणे अध्यक्षांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा करण्यात येते. याही वर्षी जिल्हा परिषद अध्यक्ष नाम. शितल ताई सांगळे सह श्री. उदय सांगळे यांच्या हस्ते पुजा करण्यात आली, यावेळी गणरायाच्या चरणी प्रार्थना करताना नाम. सांगळे यांनी जनतेच्या आरोग्याची व शेतकऱ्यांची समस्याविरहित भराभराट होवो व सुखसमृद्धी लाभो अशी भावना व्यक्त केली.
  यावेळी उपाध्यक्ष नयनाताई गावित, अर्थ व बांधकाम सभापती मनिषा ताई पवार, समाजकल्याण सभापती  सुनिता ताई चारोस्कर, सदस्य संजय बनकर, उदय जाधव, जिल्हा परिषद सरकारी व सहकारी बँकेचे अध्यक्ष विजयकुमार हळदे, जी. पी. खैरनार,  चंद्रशेखर वडघुले,  रविंद्र देसाई, सचिन पाटील, अनिल ससाणे, दत्तात्रेय मदने, अजित आव्हाड, मधुकर पुंड, तसेच  चेतन ठाकूर, सागर सोनवणे, आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल, मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड !

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)