प्लॅटून वन फिल्म्स निर्मित मराठी चित्रपट पिकासो चा फर्स्ट लूक लाँच! दशावताराची कथा आणि व्यथा प्रथमच रूपेरी पडद्यावर !! न्यूज मसालाच्या रसिकांसाठी पिकासो बाबतचे महेश भट्ट यांचे ट्वीट !!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!
'प्लॅटून वन फिल्म्स'निर्मित मराठी चित्रपट'पिकासो'चा फर्स्ट लूक लाँच! · पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दशावताराची कथा आणि व्यथा! · अभिनेता प्रसाद ओक यांचा विलक्षण भावमुद्राभिनय! · ' पिकासो ' चे फर्स्ट लूक पोस्टर जेष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट यांनी केले ट्विट! मुंबई, २३ सप्टेंबर २०१९: 'बुटीक फिल्म स्टुडिओ' आणि 'प्लॅटून वन फिल्म्स' यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माण होणाऱ्या'पिकासो' या मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक आज खास प्रेक्षकांसाठी आज प्रदर्शित करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रसाद ओक यांच्या दशावतारातील मोहक छबीचा फर्स्ट लुक पाहून प्रेक्षकांची उत्कंठा कमालीची शिगेला पोहचली असून चित्रपटातील त्यांच्या भूमिकेविषयी विशेष कुतूहल निर्माण झाले आहे. अमराठी युवा निर्माते शैलादित्य बोरा यांची ही पहिली निर्मिती असून 'कोर्ट' या बहुचर्चित तसेच लोकप्रिय चित्रपटाच्या वितरण व मार्केटिंगचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. या चित्रपटाचे कथा व दिग्दर्शन अभिजीत मोहन वारंग यांचं असून ह