प्लॅटून वन फिल्म्स निर्मित मराठी चित्रपट पिकासो चा फर्स्ट लूक लाँच! दशावताराची कथा आणि व्यथा प्रथमच रूपेरी पडद्यावर !! न्यूज मसालाच्या रसिकांसाठी पिकासो बाबतचे महेश भट्ट यांचे ट्वीट !!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

     'प्लॅटून वन फिल्म्स'निर्मित मराठी चित्रपट'पिकासो'चा फर्स्ट लूक लाँच!
·                पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दशावताराची कथा आणि व्यथा!
·                अभिनेता प्रसाद ओक यांचा विलक्षण भावमुद्राभिनय!
·                'पिकासो' चे फर्स्ट लूक पोस्टर जेष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट यांनी केले ट्विट!
मुंबई, २३ सप्टेंबर २०१९: 'बुटीक फिल्म स्टुडिओ' आणि 'प्लॅटून वन फिल्म्स' यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माण होणाऱ्या'पिकासो' या मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक आज खास प्रेक्षकांसाठी आज प्रदर्शित करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रसाद ओक यांच्या दशावतारातील मोहक छबीचा फर्स्ट लुक पाहून प्रेक्षकांची उत्कंठा कमालीची शिगेला पोहचली असून चित्रपटातील त्यांच्या भूमिकेविषयी विशेष कुतूहल निर्माण झाले आहे. अमराठी युवा निर्माते शैलादित्य बोरा यांची ही पहिली निर्मिती असून 'कोर्ट' या बहुचर्चित तसेच लोकप्रिय चित्रपटाच्या वितरण व मार्केटिंगचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. या चित्रपटाचे कथा व दिग्दर्शन अभिजीत मोहन वारंग यांचं असून हा त्यांचा हा पहिलाच चित्रपट जगभरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या '१० व्या जागरण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' व '७व्या ब्रह्मपुत्र व्हॅली फिल्म फेस्टिव्हल' करिता निवडला गेला आहे.  २८ सप्टेंबर रोजी मुंबईत 'जागरण फिल्म फेस्टिव्हल' तर २९ सप्टेंबर रोजी 'ब्रम्हपुत्र व्हॅली फिल्म फेस्टिव्हल', गुवाहाटी येथे  या चित्रपटाचे विशेष खेळ होणार आहेत.
तळ कोकणातील वावळ येथील लक्ष्मी - नारायण या पौराणिक मंदिरात दशावतार या लोककलेचा इतिहास व त्याविषयीचे दस्तऐवज उपलब्ध असून या लोककलेवर बेतलेला 'पिकासो' हा एकमेव चित्रपट आहे. योगायोग म्हणजे त्याचे चित्रीकरणही याच मंदिरात करण्यात आले आहे. या लोककलेला ८०० वर्षांचा प्रदीर्घ इतिहास असून राजाश्रय व सरकारी अनुदानाशिवाय ही लोककला जिवंत ठेवण्याचे कसब दशावतारी कलावंतांनी जोपासले असून त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. तीन लाख पन्नास हजार दशावतारी कलावंतांची उपजीविका या कलेवर असूनही सरकारने या कलावंतांच्या तसेच या लोककलेच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केल्याचे दिसत नाहीत. "आजतागायत या दशावतारी कलेसाठी प्रचंड आर्थिक संघर्ष करून, आपले कर्तव्य समजून तिला जिवंत ठेवण्याचे कार्य करणाऱ्या अगणित दशावतारी हयात व दिवंगत कलावंत,गायक  यांना हा चित्रपट आम्ही समर्पित करीत आहोत" असे या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग सांगतात.
या चित्रपटात बाल कलाकार समय संजीव तांबे याची प्रमुख भूमिका असून मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा तारा,लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक यांनी दशावतारी रंजल्यागांजलेल्या व्यसनाधीन पित्याची विलक्षण भूमिका साकारली आहे. प्रसाद ओक यांनी दिग्दर्शित केलेल्या'कच्चालिंबु' या चित्रपटासाठी त्यांना मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या किल्ला चित्रपटाचे लेखक तुषार परांजपे हे पिकासो साठी क्रिएटिव्ह दिग्दर्शक असून त्यांचे पिकासोच्या निर्मितीत विशेष योगदान आहे. या विषयी सांगताना ते म्हणतात "ही कला नेहमीच माझा उत्साह वाढवीत आली आहे. या चित्रपटात दशावतारी कलावंतांच्या दैनंदिन जीवनमान, त्यांचा अंतर्गत संघर्ष इत्यादी बाबींवर भाष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून स्वतःमधील सत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे."
‘प्लॅटून वन फिल्म्स’चे संस्थापक आणि‘पिकासो’चे निर्माते शिलादित्य बोरा सांगतात, “मराठी चित्रपटसृष्टी आज एक अत्यंत विकसित आणि अष्टपैलू कलेने समृद्ध आहे. अलिकडच्याकाळात कित्येक अत्याधुनिक, तांत्रिक सकस दर्जेदार सिनेमाची निर्मिती झाली आहे,जगभरातील समीक्षकांची प्रशंसा आणि बॉक्स ऑफिसवरील नोंदी पहाता हा मराठीचा सुवर्ण काळ आहे. आमची'प्लॅटून वन फिल्म्स' विविध विषयांवरील इतर दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यास विशेष उत्सुक आहे.  शिलादित्य बोरा यांनी यापूर्वी सोनी राझदान, पंकज त्रिपाठी आणि अहाना कुमरा अभिनित व राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संजोय नाग दिग्दर्शित ‘योर्स ट्रूली’ या नाटकाची निर्मिती केली असून मागील वर्षीच्या‘बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’या नाटकाचा ओपनिंग शो झाला होता आणि आता ते ‘झी5’ वर प्रदर्शित करण्यात आले आहे. निर्माते आणि वितरक,  अशी ओळख असलेले बोरा हे गेल्या दशकातील काही भारतीय चित्रपटांसोबत जोडले गेले असून 'कोर्ट', 'मसान', 'न्यूटन या चित्रपटांचा त्यात समावेश आहे. 'आप आजाने से' या त्यांच्या पदार्पणातील शॉर्ट फिल्मने नुकताच सिनसिनाटी येथील प्रतिष्ठित'सिंडिपेंडेंट फिल्म फेस्टिवल २०१९' मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म पुरस्कार पटकावला आहे.
       यावर्ष अखेरीपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस असल्याचे निर्माते शैलादित्य बोरा यांनी सांगितले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक