पोस्ट्स

साप्ताहिक न्यूज मसाला चा १६ जुलै २०२० अंक ! https://drive.google.com/file/d/1-1P2myIY46qogPirwQpPCiDnur0z7-KT/view?usp=drivesdk

इमेज
साप्ताहिक न्यूज मसाला चा १६ जुलै २०२० अंक, https://drive.google.com/file/d/1-1P2myIY46qogPirwQpPCiDnur0z7-KT/view?usp=drivesdk

छावा मराठा कृती समितीच्या वतीने एक हात मदतीचा उपक्रम तसेच महाराष्ट्रातील व परराज्यातील कोव्हिडं योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
छावा मराठा कृती समितीच्या अनिकेत पवार यांनी केला कोव्हिडं योद्धांचा सन्मान       नासिक::- कोरोना पार्श्वभूमीवर प्राथमिक सेवा देणारे डॉक्टर्स , नर्सेस, सफाई कर्मचारी , सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता सामान्य जनतेची सेवा केली.  या सेवकांचा, वीरांचा सन्मान छावा मराठा कृती समितीकडून करण्यात येत आहे. छावा मराठा कृती समितीचे संस्थापक चंद्रकांत भराट, उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रमोद बोरसे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अमोल निकम , उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत भामरे व नाशिक जिल्हाध्यक्ष राकेश खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोव्हिडं योद्धा २०२० हे सन्मानपत्र देऊन गौवरविण्यात येत आहे, यात संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील राज्य व शहरांमध्येही सन्मानपत्राचे ऑनलाइन वितरण करण्यात आले, तेलंगणा , गुजरात , दिल्ली , वडोदरा , हैद्राबाद , अहमदाबाद आदी ठिकाणच्या खऱ्या योद्ध्यांना प्रशस्तीपत्राद्वारे सन्मानित करण्यात आले. छावा मराठा कृती समितीच्या अंतर्गत २०० हुन अधिक सन्मानपत्रांचे क्रियाशील व्यक्तींना वाटप करण्यात आले, लाॅकडाऊनमुळे ऑनलाइन सन्मा

राजकारण विरहित वातावरणात यंदा बाॅयलर पेटणार की पेटवणार ! कृषीमंत्र्यांना घातलेले साकडे पूर्णत्वास जावे अशी शेतकऱ्यांची इच्छा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस "निसाका"साठी कृषिमंत्री दादा भुसे यांना गोदाकाठवासीयांचे साकडे नासिक::-निफाड तालुक्यातील जनतेच्या जीवन मरणाचा विषय असलेल्या निसाका-रासाका शासन दरबारी लवकर प्रयत्न करून कार्यान्वित करावा, या मागणीचे निवेदन देऊन आज गोदाकाठ वासीयांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना साकडे घातले. आढावा बैठकीसाठी आज सायंकाळी निफाडमध्ये आलेल्या कृषिमंत्री दादा भुसे यांची निफाड सेवा सहकारी सोसायटीच्या सभागृहात करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांच्या पुढाकाराने गोदाकाठच्या शिष्टमंडळाने माजी आमदार अनिल  पाटील कदम व जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या उपस्थितीत भेट घेऊन चर्चा केली.! यावेळी निसाकासाठी शासन दरबारी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दादा भुसे यांनी शिष्टमंडळाला दिले.!          करंजगावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपालिका सदस्य खंडू बोडके-पाटील यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज रोजी निफाड तालुक्यात साडेपाच हजार हेकटर पेक्षा अधिक ऊस उभा आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे उन्हाळ्यात रसवंतीगृहे बंद असल्

आढावा - टुकार नोकरशाही, सामान्यांचे कैवारी फक्त राजकारणी ! मुख्यमंत्र्यांनी यांत लक्ष द्यावे ! सविस्तर माहितीसाठी न्यूज मसालाचा स्पेशल आढावा बैठक रिपोर्ताजसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
टुकार नोकरशाही, सामान्यांचे कैवारी फक्त राजकारणी ! महाराष्ट्रातील नोकरशाही वर राजकारण्यांचा विश्र्वास नाही का ? असे चित्र सध्या दिसत आहे, सत्ताधाऱ्यांचा बैठका व विरोधकांचे दौरे यातून सामान्य जनतेला कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर किती दिलासा मिळतो हा प्रश्र्न उपस्थित होतो काय असे चित्र महाराष्ट्रात दिसत आहे !            सर्वसामान्य जनतेला कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेवरच अवलंबून राहावे लागणार हे सर्वज्ञात असताना प्रशासनावरील आणखी ताण वाढविण्यात राजकारणाचा हस्तक्षेप कितपत योग्य आहे ? जनतेने निवडून दिले तर जनतेची काळजी विश्वस्त या नात्याने राजकारण्यांवर येऊन पडते मात्र इतकीही काळजी घेणे आज योग्य वाटत नाही, ७५ वर्ष जुने प्रशासन आपत्कालीन परिस्थितीत आपले कौशल्य दाखवत आले आहे तेथे प्रशासनाच्या जीवनमरणाचा भाग नव्हता अशावेळी प्रशासनाकडून आणखी चांगले कार्य करुन घेण्यासाठीचा राजकीय हस्तक्षेप कौतुकास्पद असतो, विषाणू शी प्रशासनाने लढणे म्हणजे सीमेवरील जवानासारखे काम असते, स्वत:चां जीवही जाऊ शकतो तरीही जर प्रशासनिक सैन्य लढत असेल तर त्याचा आढावा किती प्रमाणात घ्यावा याचे

कुणाचे मन दुखावले असल्यास मी दिलगीरी व्यक्त करतो- सिद्धार्थ वनारसे

इमेज
कुणाचे मन दुखावले असल्यास मी दिलगीरी व्यक्त करतो- सिद्धार्थ वनारसे                 माझ्या शेतकरी बांधवांनो मी ही शेतकरी पुत्र आहे, चांदोरी गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या सहकार्याने काम करीत आहे, राजकारण करताना पक्षाशी व पक्ष नेत्यांबरोबरच्या बांधिलकीची जाण ठेवून काम करावे लागते, विकासाचे राजकारण करताना विरोधकांना विश्वासात घ्यावे लागते त्याप्रमाणे तालुक्यातील प्रश्नासाठी मी सदैव सर्वांसोबत आहे, पक्षनिष्ठेशी प्रामाणिक असताना रासाका व निसाका बातमी च्या माध्यमातून   कुणाचे मन दुखावले जाणारे शब्द वापरले गेले असतील तर मी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांप्रती दिलगीरी व्यक्त करतो. सदैव आपलाच सिद्धार्थ वनारसे, जिल्हा परिषद सदस्य चांदोरी गट,

संजय देवधर- काय विशेषणे लावावीत या नांवापुढे,. चित्रकार, कलासमिक्षक, वारली शैली अभ्यासक, वार्ताहर, उपसंपादक, मुक्त पत्रकार, सहकारी, गुरू, बांद्रा स्कूल आॅफ आर्टचा विद्यार्थी, जे जे स्कूल ऑफ आर्ट चा विद्यार्थी, कलाविषयक संस्थांचे विश्वस्त, वारली चित्रसृष्टी या मराठी पुस्तकाचे लेखक की वारली आर्टवर्ल्ड या इंग्रजी पुस्तकाचे लेखक, आदर्श पती, आदर्श पिता वगैरे अपुरी पडतील !! नासिकच्या कलाक्षेत्रातील एक सुवर्णाक्षरांनी कोरलेले नांव-अभिमान नासिककरांचा !!! आज वयाची एकसष्टी पुर्ण करीत आहेत, या व्यक्तिमत्वाला शब्दबद्ध केले अजय हातेकरांनी !!! प्रेरणेचा स्त्रोत वाचायलाच हवा, यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!! न्यूज मसाला परीवाराकडून नासिकच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा- संपादक, नरेंद्र पाटील

इमेज
अष्टपैलू व्यक्तिमत्व !   चित्रकार, कलासमीक्षक, वारली चित्रशैलीचे अभ्यासक, वार्ताहर, उपसंपादक आणि सेवानिवृत्ती नंतर आता मुक्त पत्रकार एवढे सगळे पैलू एकाच व्यक्तीत असणे विरळाच. सहकारी व गुरु या दोन्ही नात्यांनी आमचे ऋणानुबंध जुळले. ज्येष्ठ स्नेही, मार्गदर्शक संजय देवधर दि.१३ जुलै रोजी वयाची ६१ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांच्यातील मला भावलेल्या व्यासंगी व्यक्तिमत्वाचे हे शब्दचित्र...        नाशिकमध्ये मध्यमवर्गीय परिवारात संजय देवधर यांचा १३ जुलै १९५९ रोजी जन्म झाला. त्यांचे पणजोबा प्राणाचार्य कृष्णशास्त्री देवधर प्रख्यात वैद्य होते. त्यांची ख्याती सर्वदूर पसरलेली होती. रविवार पेठेतील त्यांचा वाडा असलेल्या गल्लीला तत्कालीन नगरपालिकेने सन्मानार्थ देवधर गल्ली असे नाव दिले. अशा घराण्यात जन्मलेल्या संजय देवधर यांना चित्रकलेची उपजत आवड होती. पेठे विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर चित्रकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याचे त्यांनी ठरवले. नाशिक कलानिकेतन या संस्थेत एक वर्षाचा फाउंडेशन कोर्स त्यांनी पूर्ण केला. नंतर उपयोजित कलेचे उच्चशिक्षण घेण्यासाठी मुंबईतील बांद्रा स्कुल ऑफ आर्ट व ज

हा घ्या पुरावा ! प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती ? पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे !! जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला !!! क्रियाशील कोण आमदार आहेत ? सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या  पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य  सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत  आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे ! परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती   ?? आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड !! नासिक: :- निफाड तालुक्यात सध्या  पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका  बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून  हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा   बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या  विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा,   "सब्र का फल मीठा होता है" अशा शब्दांत टिकाकारांना   चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांन

प्रशासन की ताकद !! बिगर मंत्री मंडल की सहायता के भी प्रदेश का शासन सफलतापूर्वक चलाया जा सकता है । प्रशासन को भी उन्होंने यह स्पष्ट संदेश दिया है कि मंत्रियों के बीच विभागों के बंटवारे के न हो पाने के बावजूद मुख्यमंत्री पूरे प्रदेश को ‘‘नौकरशाही‘‘ के माध्यम से आवश्यक कार्य निष्पादित (एग्जीक्यूट) कर संदेश देने में सक्षम हैं।

इमेज
शाबाश ! मध्य प्रदेश! मेरा प्रदेश! अपना प्रदेश !भारत देश!                               साभार-राजीव खंडेलवाल                                 (लेखक वरिष्ठ कर सलाहकार            एवं पूर्व नगर सुधार न्यास अध्यक्ष हैं)                                                                                                                                                                    वास्तव में देश के ‘‘मध्य‘‘ में होने के कारण मध्य प्रदेश देश का केंद्र बिंदु बना हुआ है। ‘‘ब्रिटिश इंडिया’’ का केंद्र बिंदु मध्य प्रदेश के मेरे अपने जिले बैतूल के ‘‘बरसाली‘‘ ग्राम में स्थित है। मुझे ऐसा लगता है कि जिस प्रकार  भौगोलिक दृष्टि से केंद्र बिंदु (सेंट्रल प्वाइंट)  मध्य प्रदेश मैं होने के कारण प्रदेश ‘‘देश’’ को लीड कर रहा है। ठीक उसी प्रकार राजनीतिक क्षेत्र में मध्य प्रदेश में ऐसा कुछ होता रहता है, जिससे मध्य प्रदेश की राजनीति का केंद्र बिंदु बना रहे।और वह कृतिपये राजनैतिक क्षेत्र में पूरे देश को लीड (नेतृत्व) कर अपने ‘‘केंद्र‘‘ में होने की सार्थकता, उपयोगिता को सिद्ध कर सके। बात ‘‘राजनीति‘‘ की क

जिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नासिक ::-  जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी वर्ग-२ भाऊसाहेब तुकाराम चव्हाण यांस काल लाचलुचपत विभागाच्या वतीने ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले. तक्रारदार यांची पत्नी जिल्हा.प. उर्दू प्राथमिक शाळा चांदवड येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून नेमणुकीस असतानाचे तत्कालीन कालावधीत भाऊसाहेब चव्हाण गटशिक्षण पदावर कार्यरत होता. त्यावेळी तक्रारदार यांच्या पत्नीची वेतन निश्चिती होवून ही डिसेंबर १९ पासून वेतन मिळाले नव्हते त्याबाबत तक्रारदाराने खात्री केली असता त्याच्या पत्नीचे सेवापुस्तकामध्ये तत्कालीन गट शिक्षणाधिकारी याची स्वाक्षरी नसल्याने वेतन काढून अदा करण्यात आले नव्हते. म्हणून माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांने सेवापुस्तिकेत सही करण्यासाठी १५०००/- रुपयांची लाचेची मागणी केली व तडजोडी अंती ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत विभाग नासिक कडून पंच साक्षीदारांसमक्ष पकडण्यात आले. सदर कारवाई जिल्हा परिषद नासिक येथील माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी कार्यालयात करण्यात आली.

कोरोनाला रोखण्यासाठी आमदार निधीतून १८ लाख ६० हजाराचा निधी ! तालुक्यातील सर्व शासकीय विभागांना पल्स अँक्सोमीटर व थर्मामीटरचे वाटप !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस, कोरोनाला रोखण्यासाठी आमदार दिलीप बनकर यांच्या निधीतून १८ लाख ६० हजाराचा निधी... निफाड  तालुक्यातील सर्व शासकीय विभागांना पल्स अँक्सोमीटर व थर्मामीटरचे वाटप. नासिक ::- निफाड तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वत्र भीती पसरली असून कोरोना आजाराचे रुग्ण आढळल्या पासून या महामारीतून बाहेर पडण्यासाठी आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहे.  तालुक्यातील सर्व शासकीय विभागातील कर्मचारी सर्वसामान्य नागरिक यांच्या आरोग्य अबाधित राखण्यासाठी आमदार दिलीप बनकर यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत निफाड विधानसभा मतदार संघामध्ये कोविड - १९ चां मुकाबला करण्यासाठी १८ लाख ६० हजार रुपयांच्या निधीची तरतूद आमदार दिलीप बनकर यांनी करून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीना २०० नग, प्राथमिक आरोग्य केंद्र ३५ नग, ग्रामीण रुग्णालय  १० नग, पंचायत समिती १० नग, पोलीस स्टेशन १० नग, नगरपंचायत कार्यालय सर्व विभाग १५ नग व इतर शासकीय कार्यालय २० नग असे एकूण ३०० नग पल्स अँक्सोमीटर व ३०० नग थर्मामीटर साहित्याचे आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.   कोरो