कोरोनाला रोखण्यासाठी आमदार निधीतून १८ लाख ६० हजाराचा निधी ! तालुक्यातील सर्व शासकीय विभागांना पल्स अँक्सोमीटर व थर्मामीटरचे वाटप !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

संतोष गिरी यांजकडून,
न्यूज मसाला सर्विसेस,
कोरोनाला रोखण्यासाठी आमदार दिलीप बनकर यांच्या निधीतून १८ लाख ६० हजाराचा निधी...
निफाड  तालुक्यातील सर्व शासकीय विभागांना पल्स अँक्सोमीटर व थर्मामीटरचे वाटप.
नासिक ::- निफाड तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वत्र भीती पसरली असून कोरोना आजाराचे रुग्ण आढळल्या पासून या महामारीतून बाहेर पडण्यासाठी आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहे.  तालुक्यातील सर्व शासकीय विभागातील कर्मचारी सर्वसामान्य नागरिक यांच्या आरोग्य अबाधित राखण्यासाठी आमदार दिलीप बनकर यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत निफाड विधानसभा मतदार संघामध्ये कोविड - १९ चां मुकाबला करण्यासाठी १८ लाख ६० हजार रुपयांच्या निधीची तरतूद आमदार दिलीप बनकर यांनी करून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीना २०० नग, प्राथमिक आरोग्य केंद्र ३५ नग, ग्रामीण रुग्णालय  १० नग, पंचायत समिती १० नग, पोलीस स्टेशन १० नग, नगरपंचायत कार्यालय सर्व विभाग १५ नग व इतर शासकीय कार्यालय २० नग असे एकूण ३०० नग पल्स अँक्सोमीटर व ३०० नग थर्मामीटर साहित्याचे आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
  कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत चाललेला असल्यामुळे हा विळखा सर्वत्र पसरू लागल्याने गेल्या तीन महिन्यात संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा, सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा तर विविध सुविंधासाठी महसूल यंत्रणा कार्य मग्न आहे. यासाठी अनेक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बरोबरीने आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका गावपातळीवर घरोघर जाऊन सर्व्ह करत आहे या मध्ये थर्मामीटर मुळे प्रत्येक नागरिकाचा ताप व अँक्सोमीटर मुळे शरीरातील ऑक्सिजन तपासता येईन व यामुळे कोरोना संशयित रुग्ण शोधणे सुरळीत होईल  तसेच  शासकीय विभागत  येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची एक प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्याचा मुख्य उद्देश आहे. या अगोदर आमदार दिलीप बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत या अगोदर सॅनिटाइजर, मास्क, सोडियम हायपोक्लोराईड,  हॅन्डग्लोज, आशा अंगणवाडी सेविकांसाठी स्टोल, खाजगी व सरकारी डॉक्टरांसाठी फेस शिल्ड मास्क वाटप करण्यात  आलेले आहे. पल्स अँक्सोमीटर व थर्मामीटर हे साहित्य तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशन, महसूल विभाग, आरोग्य केंद्र उपकेंद्र, ग्रामपंचायती, पंचायत समिती कार्यालय, नगरपंचायत आदी ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध करून दिलेल्या वैद्यकीय साहित्यामुळे शासकीय कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. या आरोग्य साहीत्य वाटपा प्रसंगी निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे, नाशिक ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अरुंधती राणे, निफाडचे तहसिलदार दिपक पाटील, निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी माधव रेड्डी, निफाड पंचायत समितीचे गटविकास अधिकरी डॉ.संदीप कराड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चेतन काळे, पोलीस उपअधिक्षक सचिन थोरबोले, निफाड नगरपंचायत मुख्याधिकारी पंकज गोसावी, प्रकल्प अधिकारी अभिमान माने, पिंपळगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक  संजय महाजन,  ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, निफाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगराव सानप, सायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ आदी अधिकारी उपस्थित होते.
_________________________
दिलीप बनकर, आमदार निफाड
निफाड तालुक्यातील कोरोणा चे वाढते प्राबल्य बघता निफाड चार  लोकप्रतिनिधी या नात्याने कोरोणा चा अटकावासाठी निफाड  लोकप्रतिनिधी या नात्याने,  पिंपळगाव बाजार समिती सभापती ,पिंपळगाव ग्रामपंचायत ,अशोकराव बनकर पतसंस्था वा अन्य संस्थांच्या मदतीने जे जे तालुक्यातील जनतेसाठी करता येण्या जोग्य आहे  ते  करण्याचा सर्वांना  घेऊन प्रयत्न सुरू आहे लवकरात लवकर कोरोना रूपी या लढाईत  तालुक्यात आळा बसण्यासाठी लोकांनी शासकीय व प्रशासनाचे नियमांचे पालन करून सहकार्य करावे जनतेच्या या आरोग्याच्या लढाईत तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वप्रथम मी पुढे आहे व राहील यासाठी जनतेने केव्हाही माझ्याशी संपर्क करावा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

एकदा सर्वांनी कवयित्री फरझाना इकबाल यांची पंढरीच्या "विठ्ठलाच्या भेटीसाठी मन विठाई विठाई" रचना ऐकायला हवी !

महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड चे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते प्रदान ! "बातमी अशी कुठे असते का" ची घेण्यात आलेली दखल !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!