छावा मराठा कृती समितीच्या वतीने एक हात मदतीचा उपक्रम तसेच महाराष्ट्रातील व परराज्यातील कोव्हिडं योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

छावा मराठा कृती समितीच्या अनिकेत पवार यांनी केला कोव्हिडं योद्धांचा सन्मान
      नासिक::- कोरोना पार्श्वभूमीवर प्राथमिक सेवा देणारे डॉक्टर्स , नर्सेस, सफाई कर्मचारी , सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता सामान्य जनतेची सेवा केली.  या सेवकांचा, वीरांचा सन्मान छावा मराठा कृती समितीकडून करण्यात येत आहे. छावा मराठा कृती समितीचे संस्थापक चंद्रकांत भराट, उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रमोद बोरसे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अमोल निकम , उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत भामरे व नाशिक जिल्हाध्यक्ष राकेश खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोव्हिडं योद्धा २०२० हे सन्मानपत्र देऊन गौवरविण्यात येत आहे, यात संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील राज्य व शहरांमध्येही सन्मानपत्राचे ऑनलाइन वितरण करण्यात आले, तेलंगणा , गुजरात , दिल्ली , वडोदरा , हैद्राबाद , अहमदाबाद आदी ठिकाणच्या खऱ्या योद्ध्यांना प्रशस्तीपत्राद्वारे सन्मानित करण्यात आले. छावा मराठा कृती समितीच्या अंतर्गत २०० हुन अधिक सन्मानपत्रांचे क्रियाशील व्यक्तींना वाटप करण्यात आले, लाॅकडाऊनमुळे ऑनलाइन सन्मानपत्र देऊन गौवरविण्यात आले.
छावा युवा संघटना नाशिक जिल्हा उपाध्यक्ष
अनिकेत पवार, ओमकार दंडगव्हाळ , हर्षद सावळे , राकेश केदारे , कृष्णा मोंढे , गणेश गायकवाड , प्रफुल गायकवाड, दिनेश गोसावी, प्रवीण तोडके  आदींच्या सहकार्याने उपक्रम राबविण्यात येत आहे.
***************************************
                    एक हात मदतीचा
छावा मराठा कृती समिती ( छावा युवा संघटना महाराष्ट्र राज्य ) च्या अंतर्गत हातावरचे मोलमजुरी काम करणाऱ्यां , रिक्षाचालक  गरजु  कुटुंबांना शिधावाटप करण्यात आली, तांदूळ , साखर, चहापत्ती, बिस्कीट पुडा , गोडतेल , डेटॉल साबण यांचे वाटप करण्यात आले व कोरोना या विषाणू संदर्भात जनजागृती करण्यात आली
या उपक्रमात छावा युवा संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा उपाध्यक्ष , एम. एम. फाउंडेशन, अष्टविनायक मित्र मंडळाचे कु.अनिकेत पवार, सदस्य कु. कृष्णा मुंडे कु. हर्षल साबळे, कु. राकेश केदारे, कु. प्रवीण तोडके, कु. दिनेश गोसावी सहभागी झाले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल, मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड !

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)