जिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

नासिक ::-  जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी वर्ग-२ भाऊसाहेब तुकाराम चव्हाण यांस काल लाचलुचपत विभागाच्या वतीने ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले.
तक्रारदार यांची पत्नी जिल्हा.प. उर्दू प्राथमिक शाळा चांदवड येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून नेमणुकीस असतानाचे तत्कालीन कालावधीत भाऊसाहेब चव्हाण
गटशिक्षण पदावर कार्यरत होता. त्यावेळी तक्रारदार यांच्या पत्नीची वेतन निश्चिती होवून ही डिसेंबर १९ पासून वेतन मिळाले नव्हते त्याबाबत तक्रारदाराने खात्री केली असता त्याच्या पत्नीचे सेवापुस्तकामध्ये तत्कालीन गट शिक्षणाधिकारी याची स्वाक्षरी नसल्याने वेतन काढून अदा करण्यात आले नव्हते. म्हणून माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांने सेवापुस्तिकेत सही करण्यासाठी १५०००/- रुपयांची लाचेची मागणी केली व तडजोडी अंती ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत विभाग नासिक कडून पंच साक्षीदारांसमक्ष पकडण्यात आले. सदर कारवाई जिल्हा परिषद नासिक येथील माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी कार्यालयात करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।