राजकारण विरहित वातावरणात यंदा बाॅयलर पेटणार की पेटवणार ! कृषीमंत्र्यांना घातलेले साकडे पूर्णत्वास जावे अशी शेतकऱ्यांची इच्छा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

संतोष गिरी यांजकडून
न्यूज मसाला सर्विसेस
"निसाका"साठी कृषिमंत्री दादा भुसे यांना गोदाकाठवासीयांचे साकडे
नासिक::-निफाड तालुक्यातील जनतेच्या जीवन मरणाचा विषय असलेल्या निसाका-रासाका शासन दरबारी लवकर प्रयत्न करून कार्यान्वित करावा, या मागणीचे निवेदन देऊन आज गोदाकाठ वासीयांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना साकडे घातले. आढावा बैठकीसाठी आज सायंकाळी निफाडमध्ये आलेल्या कृषिमंत्री दादा भुसे यांची निफाड सेवा सहकारी सोसायटीच्या सभागृहात करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांच्या पुढाकाराने गोदाकाठच्या शिष्टमंडळाने माजी आमदार अनिल  पाटील कदम व जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या उपस्थितीत भेट घेऊन चर्चा केली.! यावेळी निसाकासाठी शासन दरबारी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दादा भुसे यांनी शिष्टमंडळाला दिले.!
         करंजगावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपालिका सदस्य खंडू बोडके-पाटील यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज रोजी निफाड तालुक्यात साडेपाच हजार हेकटर पेक्षा अधिक ऊस उभा आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे उन्हाळ्यात रसवंतीगृहे बंद असल्याने उसाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.! त्यामुळे भविष्यात निफाडमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याही आत्महत्या होऊ शकतात.! त्यामुळे निसाका-रासाका कार्यान्वित होणे ही काळाजी गरज आहे. त्यासाठी शासन दरबारी आपण सहकार्य करावे. तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल पाटील कदम यांचेही या मुद्द्यावर एकमत असल्याने व राज्यात महाविकास आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही निसाका रासाका सुरू करण्याचा शब्द दिलेला असल्याने आपण नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र म्हणून पुढाकार घेऊन हे दोन्ही कारखाने चालू हंगामात सुरू करण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी केली आहे. तसेच अधिक गाळप क्षमतेच्या निसाकाची मालमत्ता जप्त असल्याने शासनाने खास बाब म्हणून निसाकाच्या कर्जाची थकहमी कार्यान्वित करावी, असे साकडे गोदाकाठवासीयांच्यावतीने बोडके यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना घातले आहे.! यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड, जेष्ठ नेते अनिल पाटील कुंदे, संजय कुंदे, विक्रम रंधवे, ललित गीते यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.! दादा भुसे यांना दिलेल्या निवेदनावर कोठूरेचे सरपंच आशिष मोगल, पिंपळस-निसाकाचे सरपंच तानाजी पुरकर, रसलपुरचे संपतराव डुंबरे, भुसेचे दत्तू भुसारे, करंजगावचे सागर जाधव, राजेंद्र राजोळे, शिंगवेचे रामदास गीते, बाळासाहेब कानडे, रतन डेर्ले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.!


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गटविकास अधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

एकदा सर्वांनी कवयित्री फरझाना इकबाल यांची पंढरीच्या "विठ्ठलाच्या भेटीसाठी मन विठाई विठाई" रचना ऐकायला हवी !